पुणे : कोरेगाव भीमा इथे झालेल्या दंगलीत राहुल फटांगरे या तरूणाचा मृत्यू झाला. आता राहुलच्या मृत्यूवरून महाराष्ट्र बंद करण्याचे मेसेजेस सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. मात्र त्या दिवशी बंद न पाळता राहुलचं मूळ गाव कान्हूर मेंसाई इथे शोकसभेत सहभागी व्हावं, असं आवाहन राहुलचे नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुलच्या मृत्यूसाठी दोषी असलेले कोणत्याही समाजाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी राहुलच्या नातेवाईकांनी केलीय. राहुलच्या कुटुंबियांना मदत लवकरात लवकर मिळावी, उज्ज्वल निकम यांनी ही केस लढवावी, आणि राहुल फटांगरेच्या नावे व्यायामशाळा बांधावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केलीय.