पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलींद एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एकबोटेंना नोटीस बजावली होती. त्यानुसार आज सकाळी ११ च्या सुमारास एकबोटे चौकशीसाठी हजर  झाले. 


१ जानेवारीला कोरेगाव भीमा दंगल झाली त्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाजीनगर न्यायालयानं आणि मुंबई उच्च न्यायालयानं एकबोटेंचा जामीन फेटाळलाय. तर सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना १४ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलंय. 


सोबतच सर्वोच्च न्यायालयानं इतक्या दिवसात एकबोटेंची चौकशी का केली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी नोटीस बजावून एकबोटे यांना चौकशीसाठी बोलावल्याची चर्चा आहे.