नाशिकमधून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मजूर विशेष रेल्वेने रवाना
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत. अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना करण्यात आले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत.
नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत. अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना करण्यात आले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत.
१६ बोगी असलेली विशेष गाडी या प्रवाशांना रवाना करण्यात आले आहे. एका बोगीत ५४ लोक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कालच मध्य प्रदेशच्या ३४५ लोकांची पहिली विशेष रेल्वे रवाना झाली आहे. लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार व नागरिकांना काल श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले.
या रेल्वेमधील नागरिकांशी अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला तसेच ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.