लाल महल : `लावणी`वरुन छत्रपती उदयनराजे भोसले संतापले
Udayan Raje Bhosale got angry : पुण्यातील ऐतिहासिक लाल महलमधील लावणी प्रकारावरुन छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे.
सातारा : Udayanraje Angry On Lal Mahal Lavani : पुण्यातील ऐतिहासिक लाल महलमधील लावणी प्रकारावरुन छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराला कोणत्या अटी शर्तींवर परवानगी दिली गेली, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. या वास्तूत कोणत्या हेतूने चित्रीकरण झाले, असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे. दोषींवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Udayan Raje Bhosale got angry)
लाल महल हा नाचण्याच्या चित्रिकरणासाठी नाही. या वास्तूचा व्यावसायिक वापर खपवून घेणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी दिला. लाल महल ही शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रिकरण करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
लावणी केली म्हणून लाल महलचं शुद्धीकरण
लाल महलमध्ये लावणी नृत्याचे शूट झाल्याचा विविध पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे. आता जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेख घालण्यात आला आहे. पुण्यामध्ये मराठा महसंघातर्फे ज्या ठिकाणी शूट झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी इथल्या जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. त्यांनतर सभामंडपात गोमूत्र तसेच गुलाबपाणी शिंपडून हा परिसर शुद्ध केला.
ऐतिहासिक लाल महलात डान्स करणाऱ्या वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vaishnavi Patil dance in Lal Mahal at Pune) चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिच्या तीन साथीदारांनी लाल महालात डान्स करत शूटिंग करुन व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल केले होते. वैष्णवीच्या डान्सनंतर समाज माध्यमातून टीका झाली. तर संभाजी ब्रिगेड सह पुरोगामी संघटनेने या घटनेविषयी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.