Girna River Drug : ललित पाटील ड्रग्स माफिया प्रकरणात (Lalit Patil Case Update) आता नवनवीन खुलासे होत आहेत. नाशिकच्या (Nashik News) देवळा तालुक्यातील लोहणेर- ठेंगोडा गावांना जोडणाऱ्या पुला खालून वाहणाऱ्या गिरणा नदीत ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचा चालक सचिन वाघ याने ड्रग्जचे पाकिटे फेकल्याची कबुली दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी 5 दिवसापूर्वी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे. त्यामुळे मोठा वाद उद्भवल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच दुष्काळी परिस्थिती असताना पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न उद्भवलेला असताना कोणाच्या परवानगीने पाणी सोडलं? असा सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित करत जिल्हाधकाऱ्यांची परवानगी घेतली का? याची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांपासून ललित पाटीलकडील ड्रग्सचा (Lalit Patil Drug Case) साठा शोधण्यासाठी पोलिसांकडून नाशिकमध्ये ऑपरेशन राबवलं जात होतं.


मुंबई पोलिसांच्या टीमने 4 तास स्कुबा डायव्हरच्या मदतीने अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केलं. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) एक टीम एक स्थानिक पथकाच्या मदतीने पाण्याच्या खाली शोध घेत आहे. गिरणा नदीत कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा असल्याचं समोर आल्याने नाशिकमध्ये मुंबई पोलीस मोठ्या ताकदीने काम करत असल्याचं समोर येत आहे.


Pune News | ललित पाटील प्रकरणी मोठा खुलासा; कोण आहे प्रज्ञा कांबळे?


दरम्यान, ललित पाटील याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे हिला पुणे पोलिसांनी आरोपी केले. त्यानंतर आता ललित पाटील याचे आर्थिक कनेक्शन शोधले जात आहे. ललित पाटील आणि भूषण पाटील यांनी सराफ व्यावसायिकाकडून आठ किलो सोनं खरेदी केली केलं होतं. ललित पाटील याच्याकडून ड्रग्सच्या पैशातून हे सोनं खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा खरा सुत्रधार कोण? राजकीय नेत्यांचा यात हस्तक्षेप आहे की काय? असा सवाल आता नागरिक विचारत असल्याचं पहायला मिळतंय.