विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजी नगर:  घरातून रागाने, कौटुंबिक कारणातून, पती-पत्नी विसंवाद, अनैतिक संबंधातून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 5 महिन्यांत  संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 मध्ये संभाजीनगरातून 490 महिलानी घर सोडले तर गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी घर सोडले. ही आकडेवारी पाहून नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही... कारण गेल्या 17 महिन्यात एकट्या संभाजी नागरातून 646 महिला घर सोडून बेपत्ता झाल्या आहेत यातील तब्बल  540 महिला पोलिसांना सापडल्या तर काही घरीही परत आल्या मात्र महिला घर सोडून का जात आहेत हे मात्र गंभीर आहे...


महिला घर सोडून जाण्याची प्रमुख कारणं


पती-पत्नी मधील भांडणं


इच्छेविरुद्ध विवाह


कौटुंबिक हिंसाचार


अनैतिक संबंध


भौतिक सुखाची महत्वाकांक्षा


यासह काही ठिकाणी काही वेगळी कारणंसुद्धा सापडतात .. पोलिसांनी पती-पत्नीत भरोसा राहावा, त्यांनी सौख्य राहावे म्हणून 'भरोसा सेल'ची स्थापना केली आहे. मात्र तिथंसुद्धा गेल्या 5 महिन्यात पती पत्नीनी एक महिन्यात 546 तक्रारी दाखल केल्या आहेत..


समुपदेशक या अशा जोडप्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात,  मात्र काही ठिकाणी कुणीही ऐकून घेण्याचा मनस्थितीत नसते. त्यामुळं घर सोडून निघून जाणे किंवा विभक्त होण्यापर्यंत निर्णय घेतला जातो. 


महिलांची निघून जाण्याची,  रागातून अचानक गायब होण्याची ही आकडेवारी धक्कादायक आहे.  यातून गुन्हेगारांचे सुद्धा फावते, त्यामुळं वाद होतात. मात्र त्यातून इतक्या टोकाला जाताना किमान 100 वेळ विचार करावा हीच अपेक्षा आहे. गायब होणाऱ्या  अनेक महिला सोबत वाईट घटना घडल्या आहेत, संसारात थोडं समांज्यासने महिला आणि पुरुष दोघांनीही घेतले तरच नांदा सौख्यभरे या शब्दांचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.