उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील मजहर पठाण यांनी २४ तारखेच्या रात्री स्विगी अप्लिकेशनवरून चिकन लॉलीपॉप ऑर्डर केलं. या ऑर्डरनंतर त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. स्विगीवरुन ऑर्डर केलेल्या चिकन लॉलीपॉपमध्ये अळ्या सापडल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पाहताच पठाण यांनी अळ्या असलेल्या चिकनचा व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर स्विगीवरून जेवण ऑर्डर करावी की नाही, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. या किळसवाण्या प्रकारावर सडकून टीका होत आहे.