शहीद रवींद्र धनावडेंवर अंत्यसंस्कार
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सातारा जिल्हयातले रवींद्र धनावडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सातारा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सातारा जिल्हयातले रवींद्र धनावडे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
साता-यातल्या जावळी तालुक्यातल्या मोहाट गावी हे अंत्यविधी झाले. रवींद्र धनावडे हे 38 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. धनावडे यांची केवळ 14 महिन्यांची सेवा शिल्लक होती. धनावडे यांना वीरमरण आल्याची माहिती कळताच मोहाट गावामध्ये शोककळा पसरली.