प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आता कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कडक नियमावली (corona guidlines) अंमलात आणली जात आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांना मंदिरात (mask in temple) मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्क शिवाय मंदिरात कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही आहे. त्यामुळे देशभरातील कोरोनाच्या वाढत्या भीतीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर विमानतळावर देखील मास्क सक्ती करण्यात आली असून प्रत्येक कर्मचाऱ्याला येथे मास्क वापरण्यास सांगण्यात आले आहे तर प्रत्येक प्रवाशाची टेस्टिंग देखील केली जात आहे. जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा अद्याप भारतात आणि कोल्हापुरात (kolhapur news) दाखल झाला नसला तरी काळजी घेणे महत्त्वाचं असल्याचं कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. (latest corona guidlines for ambabai darshan at kolhpur sanitizer mask)


दररोज हजारो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून चीनमध्ये सुद्धा पूर्वीप्रमाणे करोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सगळ्या जगाचीच चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतात सुद्धा आता काळजी घेण्याचे आवाहन केले असून याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात नियम कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला उद्या पासून मंदिरातील (ambabai mandir) कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली असून येणाऱ्या काळात करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांना सुद्धा मास्क सक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. 


हेही वाचा - डोकेबाज बाई; सोनं असं लपवलं की, Pune Airport वरील अधिकारी झाले Confuse


कोल्हापूर विमानतळावर देखील मास्क सक्ती 


कोरोनाचा नवीन व्हेरियनट चीन, जपान, अमेरिका यांसारख्या (new corona varient) अनेक देशांमध्ये पुन्हा धुमाकूळ घालत असल्याने भारत सरकार पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना तपासणी करण्यात येत असून प्रत्येक विमानतळांवर ही तपासणी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळावर देखील कोरोना प्रतिबंधात्मक नियमाची अमलबजावणी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. येथे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी होत असून सर्वांना मास्क सक्ती देखील करण्यात आली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले आहे. तसेच मास्क सॅनिटायझरचा वापर करा तसेच ज्यांचे लसीकरण अद्याप अपूर्ण आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावे व गरज वाटल्यास स्वॅब तपासणी करून घ्यावी असे आवाहनही संजय शिंदे यांनी केले आहे.