Maratha Aarakshan : जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे अंतरावली सराटी इथं हा प्रकार घडला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय. यात काही आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले आहेत. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. 


ग्रामस्थ आक्रमक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतरावली सराटी येथे पोलीस, ग्रामस्थ, आंदोलक यांचात वाद पेटला आहे.  गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या व्हॅन  गावाबाहेर काढल्या. 



अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज - सुप्रिया सुळे


चार दिवसांपासून आंदोलन सुरु होते. मग गृहमंत्रालय नेमकं करत काय होते? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेला पोलिस नाही तर मंत्रीच जबाबदार आहेत. अत्यंत क्रूरपणे यांना मारहाण करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाचा, गृहमंत्र्यांच्या जाहीर निषेध करतो. हे गृहमंत्रायलाचे अपयश आहे. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे.  


कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई


अनेदा मराठा आंदोलांकसह  बैठका घेतल्या आहेत. अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. अनेक सवलती तसेच मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य करण्याबाबात सरकार सकारात्मक आहे. पोलिसांनी लाठीचार्ज का केला हे माहित नाही. आंदोलकांनी शांतेतेच्या मार्गाने जावे.  


मराठा आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना हिंसक वळण का लागले? पोलिसांनी लाठीचार्ज का केला? 


चार दिवसांपासून मराठा आंदोलक आंदोलन करत होते.  यावेळी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात आली.  गुरुवारी रात्री जरांगे यांना उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. यानंतर  5 ते 10 हजार कार्यकर्ते येथे जमा झाले.  5 ते 10 हजार कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. यावेळी या आंदोलना हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे हे आंदोलन चिघळले आहे.