Election Results : लातूर जिल्ह्यात काँग्रेसची या ठिकाणी सत्ता तर प्रहार संघटनेची जोरदार मुसंडी
Latur district Municipal Council Results 2022 : लातूर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे चाकूर नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
शशिकांत पाटील / लातूर : जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे चाकूर नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. चाकूरमध्ये 17 पैकी 6 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नायगाव नगर पंचायतीत काँग्रेस सर्व 17 जागांवर विजय मिळवत भाजप आमदार राजेश पवार यांना दे धक्का दिला आहे. तर शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीत भाजपने बहुमत मिळवले आहे.
लातूर जिल्हा - एकूण नगरपंचायत चार निकाल
लातूरचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या जिल्ह्यात चार पैकी देवणी आणि जळकोट या दोन नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. तर शिरुर अनंतपाळमध्ये भाजप तर चाकूरमध्ये त्रिशंकू स्थिती दिसून येत आहे.
Election Results : जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निकाल LIVE
देवणी - नगरपंचायत - अंतिम निकाल
एकूण जागा - 17
घोषित निकाल - 17
देवणी नगर पंचायतीत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत
-काँग्रेस - 12
- राष्ट्रवादी काँग्रेस - 2
- शिवसेना - 0
-भाजप - 1
- अन्य - 2
जळकोट - नगरपंचायत - अंतिम निकाल
एकूण जागा - 17
घोषित निकाल - 17
जळकोट नगर पंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता आली असून राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा मतदारसंघ आहे.
- काँग्रेस - 7
- राष्ट्रवादी काँग्रेस - 4
- शिवसेना - 2
- भाजप - 1
- अन्य - 3
शिरुर अनंतपाळ नगरपंचायत - अंतिम निकाल
एकूण जागा - 17
घोषित निकाल - 17
भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे वर्चस्व दिसून येत आहे.
- काँग्रेस - 1
- राष्ट्रवादी काँग्रेस - 3
- शिवसेना - 4
- भाजप - 9
चाकूर नगरपंचायत अंतिम निकाल
एकूण जागा - 17
घोषित निकाल - 17
चाकूर नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने चाकूरमध्ये मुसंडी मारत 17 पैकी 6 जागा मिळवत बनला सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
- काँग्रेस - 3
- राष्ट्रवादी काँग्रेस - 5
- शिवसेना - ००
- भाजप - 3
- प्रहार संघटना - 6