Latur Earthquake Village: भूकंपाने ओसाड पडलेल्या गावठाणाला आलेले स्मशानाचे स्वरूप अन् दुर्लक्षित झालेल्या भागात काहीतरी भयंकर घडत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. लातूरच्या औश्यातील लामजना गावातील ओसाड जुन्या गावठाणात शंकास्पद घटना निदर्शनास आल्या.  गुप्तधनासाठी खड्डे पाडल्याचा संशय निर्माण होत आहे. हा गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा तर प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1993 च्या प्रलयंकारी भूकंपात किल्लारीसह परिसरातील जमिनीखाली गाढल्या गेलेल्या गावांचे नव्याने पुनर्वसन करण्यात आले. असे असले तरी ओसाड गावठानातील  ढिगाऱ्याखाली गुप्तधन आहे अशी अंधश्रध्दा आजही लोक बाळगून आहेत. याच अंधश्रद्धेतून या परिसरात रात्री अपरात्री खोदकाम सुरु असते. लोक गुप्तधनाच्या अंधश्रद्धेतून खोदकाम करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. 


एकास जिवंत गाडण्यात आल्याची अफवा


पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त लामजना गावात अशाच प्रकारे गुप्तधन मिळवण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे.त्यात एकास जिवंत गाडण्यात आल्याची अफवा या भागात परसली आहे. ही चर्चा समजताच किल्लारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तो खड्डा परत एकदा बुजवण्यात येत आहे. दरम्यान खड्ड्याच्या बाहेर हिरवे ताजे गवत आढळून आले आहे. यावरून खड्डा नुकताच खोदल्याचे समोर येत आहे.


भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?


गुप्तधनासाठी हे खड्डे पाडत असल्याचा गावकऱ्याचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संशय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. हा खड्डा नेमका कोणी पाडला ? कशासाठी पडला ? खड्डा पडण्यामागचा उद्देश काय ? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.


...तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल - लक्ष्मण हाके