Shantabai Kopargaonkar : सौंदर्याची खाण, जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्म मोअर, टाळ्या, शिट्यांनी दणाणून जायचं...महाराष्ट्राच्या रसिकांना तिच्या लावणीने वेड लावलं होतं. अशी ही रसिकांना घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी नगरच्या बस स्थानकावर भीक मागताना दिसली. शांताबाई कोपरगावकर यांच्या हलाखीचं जीवन जगत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. (Shantabai Kopargaonkar Viral Video)


अनेक मदतीचे हात सरसावले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कलाकाराची अशी अवस्था पाहून अनेकांचे डोळे पाणावले. एवढंच नाही तर या व्हिडीओनंतर त्यांच्या मदतीसाठी अनेक लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी यांची भेट घेत विचारपूस केली. तसंच शांताबाई कोपरगावकर यांचं शिर्डीतील वृद्धाश्रमात त्यांची राहण्याची सोय केली. 


स्नेहलता ताईंच्या भेटीदरम्यान शांताबाईंच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी उभा राहिल्या. आपल्या अश्रूंना मोकळं करत त्यांनी स्नेहलता ताईंजवळ आपली व्यथा मांडली. स्नेहलता कोल्हे यांनी शांताबाईंना दोन साड्या आणि खर्चासाठी काही पैसेही दिलेत. 



दरम्यान शांताबाई लोंढेसह अनेक वयोवृद्ध कलावंतांना सरकारच्या वतीने मगत मिळवून देण्यासाठी आपण सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलू असं आश्वासनही स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी दिले. 



महिला आयोगाकडूनही दखल 


शांताबाईंचा व्हिडीओ हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.  या व्हिडीओची दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली. त्यांनी ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत अहमदनगरमधील महिला आणि बाल कल्याण विभागाला त्यांना मदत करण्याची सूचना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 



 


त्यांच्यावर अमहदनगर कोपरगावातील रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. 



राष्ट्रवादीकडूनही पुढाकार


राष्ट्रवादी पक्षाच्या सांस्कृतिक विभागानेही त्यांच्या आयुष्याची जबाबदारी उचलली आहे. सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी शरद पवारांकडे त्यांची व्यथा मांडली. त्याशिवाय लोंढे यांना एक लाखाची मदत आणि घरकुल देण्याची विनंती केली आहे. 


''ओळख जुनी धरुन मनी''


शांताबाई कोपरगावकर या उत्तर महाराष्ट्रातील एकेकाळच्या लावणी नृत्यांगणा होत्या. कला, सौंदर्य आणि लोकप्रिय अशा त्या लावणी कलावंत अख्खा महाराष्ट्राला त्यांनी घायाळ केलं होतं. 40 वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी 'शांताबाई कोपरगावकर' हा तमाशा सुरु केला. यात्रे-जत्रेत त्यांचे तमाशा गाजायला लागले. बक्कळ पैसा त्यांचा पदरी पडत होता. (lavani samradni shantabai kopargaon Many helping hands by rupali chakankar old age home shirdi at ahamadnagar viral video )


नियतीचा खेळ काही औरच होता...शांताबाई महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात नाव कमवत असताना क्षणात त्याच्या मालकीचा तमाशा त्यांचा राहिला नाही. अत्तार भाई यांनी त्यांची फसवणूक करत सर्व तमाशा विकून टाकला. 



पती नाही, जवळचं कोणी नाही...तमाशाच त्यांचा श्वास तोही राहिला नाही...अशात त्यांना मानसिक आजाराने गाठलं. ज्या कोपरगाव बस स्थानकातून तमाशाची सुरुवात झाली आज तिथेच त्यांच्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली होती. त्यांची प्रसिद्ध लावणी ''ओळख जुनी धरुन मनी'' ही गात त्या बसस्थानकावर हताश बसलेल्या असतात. आज त्यांचा मदतीला असंख्य हात पुढे सरसावले आहेत.