पुणे : पुण्यातल्या कोरोनाची परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठका आणि पाहणीनंतर मुख्यमंत्री माध्यमांशी न बोलताच मुंबईला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचून दाखवला.


कोणत्या लोकप्रतिनिधींनी काय तक्रारी केल्या?


चंद्रकांत पाटील - भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पुण्यात वाढते रुग्ण पाहता वैद्यकीय सुविधा वाढवल्या पाहिजेत


- बेड व्हेंटिलेटर वाढले पाहिजेत


- प्रशासन तीन जम्बो हॉस्पिटल बांधणार त्याला वेळ जाईल, मात्र त्यामूळे आहे त्या हॉस्पिटलमध्ये बेड वाढवले पाहिजेत ही मागणी


- लेखी मागणी केलीय की पीपीइ किट,औषधे इतर साहित्य सरकारी रेट ने खाजगी रुग्णालयाला द्यावे, त्यामुळे रुग्णाला बिल कमी येईल


मुरलीधर मोहोळ - महापौर, पुणे 


- महापालिका जम्बो हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारला पैसे देईल,सरकारनेही महापालिकेच्या पाठीशी उभे राहावे


- खाजगी हॉस्पिटलबाबत सरकारने असे आदेश दिले तरीही बेड ताब्यात नाहीत,त्यांना कडक आदेश दिले पाहिजेत,ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर कमतरता आहे


- शासनाने महापालिकेलाही आर्थिक मदत केली पाहिजे


- दर महिन्याला पाचशे कोरोनाचे मृत्यू होताय, मात्र त्याची नोंद होत नाही, याबाबत चौकशी आणि निर्णय घेण्याची मागणी


नीलम गोऱ्हे - शिवसेना आमदार


- पुणे, पिंपरी - चिंचवडसह ग्रामीण भागात एकत्रित कामे व्हावी 


- त्यासाठी जिल्हास्तरावर समिती नेमावी


- डॉक्टर, नर्स यांच्यावरील हल्ले रोखण्यासाठी पोलिसांमार्फत टास्क फोर्स स्थापन करावा


भीमराव तापकीर - भाजप आमदार


- खाजगी हॉस्पिटलसाठी जे अधिकारी नेमले त्यांचे मोबाईल नंबर जनतेला द्या


- प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टर नर्स नाहीत 


- आठ आठ दिवसांनी नर्स आरोग्य केंद्रावर येतात


अशोक पवार - राष्ट्रवादी आमदार  


- ग्रामीण भागात व्हेंटिलेटर, खाटा उपलब्ध होत नाही 


- वाघोली सारख्या शहराला स्वतंत्र आरोग्य व्यवस्था द्यायला पाहिजे


अतुल बेनके - राष्ट्रवादी आमदार


- ग्रामीण भागातील कोव्हीड सेंटर ला निधी द्यावा


- ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह खाटा उपलब्ध करून द्याव्या


दिलीप मोहिते - राष्ट्रवादी आमदार


- अनेक कंपन्यांनी सीएसआर निधी खर्च केला नाही


- याबाबत आढावा घेतल्यास मोठा निधी उपलब्ध होईल 


- आमदार निधीतून रुग्णवाहिका खरेदीची परवानगी द्यावी 


संग्राम थोपटे - काँग्रेस आमदार 


- सिम्बयोसिस रुग्णालयात सुविधांसाठी पैसे भरावे लागतात
 
- या रुग्णालयाची नोंदणी महात्मा फुले योजनेत केली तर ग्रामीण भागात मोठा फायदा होईल 


- ज्या रुग्णालयांची नोंदणी झालीय त्यास तातडीनं मंजुरी द्यावी 


महेश लांडगे - भाजप आमदार 


- थायरोकेअर बाबत अनेक तक्रारी आहेत त्यात लक्ष घालावे 


शरद रणपिसे - काँग्रेस आमदार 


- सर्वसामान्य जनतेपर्यंत जास्तीत जास्त सुविधा पोहचवा 


- कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक धोरणाचा अवलंब करा


 सुनील टिंगरे - राष्ट्रवादी आमदार 
 


- कोरोनासाठीच्या इंजेक्शनला ५५ हजार रुपये मोजावे लागतात 


- खाजगी रुग्णालयात ७ ते ८ लाख रुपये मोजावे लागतात 


- लहान मोठ्या व्यापाऱ्यांवर संकट आहे


राहुल कुल - भाजप आमदार


- ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळणे अजूनही कठीण आहे


- त्यावर लवकरात लवकर तोडगा काढा