विकास भोसले, झी मिडीया, सातारा : १९९९ साली सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर ५.८५ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याचा निर्णय झाला. २१ गावे विस्थापित झाली. प्रत्यक्षात २०१३ साली धरण पूर्ण झाले. ७७० कोटी खर्च झाला. परंतु तारळी धरणाच्या मुख्य भिंतीतुन गळती सुरु झाली. गंभीर बाब म्हणून हि गळती काढण्याचे काम गेली ३ वर्षे सुरु आहे. मात्र अजूनही हि गळती पूर्ण पणे निघाली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळी खटाव, माण, जत, आटपाडी या भागाला पाणी देण्यासाठी ५.८५ टीएमसी एवढी क्षमता असणाऱ्या तारळी धरणाची निर्मिती झाली. परंतु गेली १८ वर्षे अजुनही कालव्याची कामे झाली नसल्याने धरणातील मृत साठा झाला आहे.  त्यातच तारळी धरणाचे पाणी तारळे खो-यातील मरळोशी,कोंजवडे,नुने,वजरोशी,कडवे,बांबवडे सह २२ गावाना पाणी अजुनही मिळाले नाही. 


जलसंपदा विभागाच्या निकृष्ट कामाबाबत कार्यकारी अभियंता पांढरे यानी तारळी धरणाचाही समावेश केला होता. निकृष्ट कामामुळे धरणाला अजूनही १० टक्के गळती असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे 


कोटयावधी रुपये खर्च करुन व अनेक गाव विस्थापित करुनही दुष्काळी भागाला अजूनही पाणी मिळू शकलं नाही. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे हा आणखी किती वर्षे त्रास सहन करावा लागणार आहे ?हाच खरा प्रश्न आहे.