बिबट्याच्या हल्ल्यात बालक दगावला
नरभक्षक बिबट्याने अडीच वर्षाच्या बालकावर हल्ला करून तिचा जीव घेतल्याची हृद्यद्रावक घटना
सटाना : नरभक्षक बिबट्याने अडीच वर्षाच्या बालकावर हल्ला करून तिचा जीव घेतल्याची हृद्यद्रावक घटना सटाना तालुक्यातील तळेगाव भामेर गावात घडली.
कोमल आई-वडीलांच्या मध्ये झोपला असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.
मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. बिबट्याने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि धड उचलून नेले. घटनास्थळाजवळ बालकाचे शीर सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोमलच्या रडण्याच्या आवाजाने त्याचे आई-वडील जागे झाले मात्र तोपर्यंत बिबट्याने कोमलला उचलून नेले होते. शेजारी असलेल्या उसाच्या शेतात कोमलचे शीर आढळून आले. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा वावर होता. अनेक शेळ्या-मेंढ्या त्याने फस्त केल्यात.
वारंवार तक्रारी करूनही वनविभागाच्या दुर्लक्षामुळे एका चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.