मुंबई : धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने विधानपरिषदेवर रिक्त झालेल्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राष्ट्रवादीच्या गटात चर्चा सुरु होती. त्यावर राष्ट्रवादीकडून संजय दौंड अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. त्यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले असून1992 पासून ते जिल्हा परिषद सदस्य आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता विधानपरिषदेवर संधी देण्यात आल्याचे कळते.



विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात.भाजपाकडून या जागेसाठी राजन तेली यांचे नाव आहे. पहिली सीट निघेल ती मिटकरींना देण्याचं अजित पवारांनी पुण्यात जाहीर केलं होतं. महाराष्ट्र विकास आघाडीकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दौंड यांचा विजयाचा मार्ग सोपा आहे.