पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द
![पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2021/05/31/432607-bank-licence.jpg?itok=T6w-N4Im)
शिवाजीराव भोसले बँक आर्थिक दिवाळखोरीत
पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बॅंक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने आज हे आदेश काढले आहेत.
शिवाजीराव भोसले बँकेने पैसे थकवले आहेत. बँकेने 400 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. या प्रकरणी आमदार अनिल भोसले व इतर संचालक अटकेत आहेत.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने केलेल्या आर्थिक अनियमिततेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधी गंभीर ताशेरे ओढले होते. तसेच दिवाळखोरीची कारवाई का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच आर्थिक निर्बंध देखील घातले होते.
बँकेकडे किमान भांडवल देखील नव्हते. त्यामुळे आपल्या ठेवीदारांने पैसे देण्याच्या स्थितीतही बँक नव्हती. १९९६ मध्ये बँकींग व्यवसायाचा परवाना दिला होता. जो आता रद्द करण्यात आला आहे.