मुंबई : देशी कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती. यानंतर देशभरातील शेतकऱ्यांकडून याचा निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान कांदा निर्यात बंदी उठवण्याची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. कांद्याचे भाव कोसळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी निर्यात बंदी उठवण्याची राज्य सरकारची मागणी आहे. निर्यातबंदी लादल्याने कांद्याचे भाव आणखी कोसळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.


कांदा निर्यातीवर पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. 


कांद्याचे भाव वाढू लागल्याने सरकारने कांदानिर्यातबंदी जाहीर केली. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.