`लिटल चॅम्प` मुग्धा वैशंपायनला बारावीच्या परीक्षेत `फर्स्ट क्लास`
रायगड जिल्ह्यातील मुग्ना वैशंपायन `लिटल चॅम्प` या गायन स्पर्धेत चमकली आणि ती प्रसिद्धीला आली. या मुग्धाने बारावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केलेय. तिने `फर्स्ट क्लास` मिळवलाय.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुग्ना वैशंपायन 'लिटल चॅम्प' या गायन स्पर्धेत चमकली आणि ती प्रसिद्धीला आली. या मुग्धाने बारावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केलेय. तिने 'फर्स्ट क्लास' मिळवलाय.
झी मराठीवरील 'लिटल चॅम्प' या कार्यक्रमातून मुग्धा नावारुपाला आली. तिने आपल्या आवाजाने सर्वांना मोहून टाकणाले होते. या कार्यक्रमात अलिबाग येथील लहानग्या मुग्धाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. तिने बारावीच्या परीक्षेत ६३ टक्के गुण मिळवलेत.
'लिटल चॅम्प' च्या अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या मुग्धाने याआधी दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण अलिबाग येथे घेतले. त्यानंतर तिने मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
अभ्यासात हुशार असलेल्या मुग्धाने दहावीच्या परीक्षेत ९४.२०टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर विज्ञान विषयाची आवड असल्याने मुग्धाने हट्टाने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. यापुढेही विज्ञान शाखेतूनच पदवी परीक्षा देण्याचा मानस असून, तिला शास्त्रीय संगीतात करियर करायचे आहे, असे ती सांगते.