Pune Live in Relationship Crime: सध्या चर्चा आहे ती लिव्ह इन रिलेशनशिप्सची. आफताब आणि श्रद्धा वालकरच्या प्रकरणावरून लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) हा शब्द सर्वात जास्त चर्चेत होता. याचे फायदे आणि तोटे यांवर आता सगळीकडे बोललं जात आहे. माध्यमांमध्ये सध्या यावर भरपुर चर्चा होत आहेत. सध्या याच पार्श्वभुमीवर आता एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा लिव्ह - इन - रिलेशनशिपच्या सुरक्षतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकरणात गर्लफ्रेंड (Girlfriend) प्रेमानं आपल्या प्रियकराला उठवायला गेला आणि चक्क त्याच्या हातून ती मारच खाऊन आली. पण नक्की असा काय प्रकार घडला जाणून घेऊया. या प्रकरणात तरूणीनं आपल्या पार्टनरवर गुन्हा दाखल केला आहे. (live in partner beats her girlfriend because she awaken him from sleep)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिव्ह-इन- रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वादाच्या अनेक घटना आपण यापूर्वी ऐकले असतील. दिल्लीतील आफताब आणि श्रद्धा या प्रकरणानंतर तर या नातेसंबंधावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यात हाणामारीचा प्रकार घडला. गाढ झोप येत असणाऱ्या आपल्या पार्टनरला (partner) उठवण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर तिनं थेट पोलीस स्टेशन गाठत आपल्या जोडीदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कोण होते हे दोघं? 


या प्रकरणी अधिक माहिती अशी की हे दोघंही पार्टनर अडल्ट होते. 34 वर्षाची तरुणी आणि 38 वर्षाचा तरुण होता. दोघेही उच्चशिक्षित (highly educated) होते. कोरेगाव पार्क परिसरातील एका आलिशान जागेत हे दोघंही राहत होते. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर होते. नामांकित कंपनीत हे दोघंही कामाला आहेत. एकत्र काम करत असतानाच या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मागील वर्षभरापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (love) राहत आहेत.


दरम्यान 19 डिसेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी गाढ झोपेत असलेल्या आपल्या पार्टनरला उठवण्यासाठी गेली होती. मात्र तरुण काही उठत नव्हता. पुन्हा पुन्हा ती त्याला जबरदस्तीने झोपेतून उठवत असल्यामुळे तरुणाला राग आला आणि त्याने चिडून हाताने मारहाण केली. मारहाण झाल्याने चिडलेल्या तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि जोडीदारा विरोधात तक्रार दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी (Police) या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. याबद्दल आता पुढील तपास सुरू आहे. 


सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत आहेत त्यामुळे यामध्ये आता पालकांनी लक्ष देणे गरजेचे झाले असून आता याबद्दल प्रौढ जोडप्यांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.