...तर आज मी भाजपचा प्रचार केला असता - उद्धव ठाकरे
वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात प्रचारासाठी दाखल झालोय
वसई : भाजपनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली असती तर आज मी भाजपचा प्रचार करण्यासाठी इथे आलो असतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणात मतदारांना भावनिक साद घातलीय. वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात प्रचारासाठी दाखल झालोय, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
काय म्हणाले उद्धव ठाकरे...
- बऱ्याच वर्षांनंतर या परिसरात आलो पण या निमित्ताने यावे लागेल असे वाटले नव्हते, मात्र काही परिस्तिथीत मार्ग काढावे लागतात... राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र तुम्ही जनतेला काय दिले हे महत्वाचे...
- मुख्यमंत्री इथे येऊन कुत्रा मांजर म्हणाले, कुणाला म्हणाले माहित नाही. ते त्यांना उत्तर देतील, मात्र एक खरे कि कुत्रा मांजरेही कपाळाला हात मारत असतील..
- आता लोक पुढच्या निवडणुकीची वाट पाहतायत, आता अबकी बार नाही यांचा फुसका बार..
- मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेने पाठीत वार केला पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच येणार हे माहित असतानाच त्यांनी गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा यांना का सांगितले नाही, मुख्यमंत्री म्हणतात आमच्या मनात होते मग तुम्ही मोदींसारखे रेडिओवर का नाही बोलत
- मुख्यमंत्री महोदयांना बेईमानीची काही उदाहरणे देतो, १५ लाख बँकेत जमा होणार, अछे दिन येणार हे सांगणे आणि प्रत्यक्षात काही न देणे याला म्हणतात बेईमानी..
- वनगा कुटुंबाला विचारा आम्ही त्यांना काही लालूच दिले का... तो परिवार माझ्याकडे आला आणि आम्ही त्यांचे अश्रू पहिले, आम्ही अश्रूंची किंमत केली ...तुम्ही त्यांना काय दिले त्यांनी कधी स्वतःकडे पहिले नाही, ३५ / ४० वर्ष वनगा यांनी केवळ भगवा हातात धरला मात्र तुम्ही त्यांना त्यांच्या परिवाराला काहीच दिले नाही, तुम्ही वनगाच्या दुःखद निधनांनंतर त्यांना वाऱ्यावर सोडले ते बिचारे रडले तरी तुम्ही दाखल घेतली नाही...
- आमच्या कृष्ण घोडा यांच्या मृत्यूनंतर मी लगेच अमित ला बोलावले आणि विचरले तुम्ही का नाही तसे केले, आम्ही गिरकर ताई भाजपच्या नगरसेविका होत्या त्याच्या दुःखद निधनानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबियांना मदत केली, पतंगराव कदम यांचे निधन झाले आम्ही विश्वजित ला पाठिंबा दिला, मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून आम्हाला शिकायची गरज नाही
- आमच्यावर बेछूट आरोप करण्यापेक्षा एकदा समोर समोर या माझी तयारी आहे...छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे हे लक्षात ठेवा, तुमच्या सारखे आम्ही त्यांना केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही
- देशाचे पंतप्रधान सारखे विदेशात असतात...आणि मेरा देश बदल राहा है ...कारण हे सतत विदेशात केवळ निवडणुकी पुरते येतात...निवडणूक झाली कि लगेच विदेशात पाळतात...बरोबर रोज देश बदलणारच...
- इथली माणसे रोज लोकलने प्रवास करून मुंबईला येतात आणि परत रात्री येतात..हाडामांसाची माणसे त्यांना इथले कोणी त्रास देत असतील तर मला बळाचा वापर करावा लागेल, इथे कोणी सामान्य माणसांना बळाचा वापर करून त्रास देत असेल तर मग मलाही त्यांना काल रिटा बहुगुणा म्हटल्या त्या प्रमाणे वागावे लागेल.
- प्रकल्प सगळ्यांना हवेत... मात्र जर प्रकल्पामुळे आमच्या माय भगिनींची चूल विझणार असेल तर मी ती विझू देणार नाही...सगळ्यांना मी सांगतोय सगळ्यांनी एकत्र या...
माझ्यावर मा चे संस्कार आहेत, मातोश्रीचे दरवाजे वनगा यांच्यासाठी कधीच बंद होणार नाहीत
- यांच्याकडे उमेदवार नाही, माणसे नाही, उत्तर प्रदेश मधून माणसे आणतात, एका आदिवासी मुलाला पाडण्यासाठी तुम्ही बापजाद्यांना बोलावता, मात्र निष्ठेचा पराभव तुमचे भाडोत्री माणसे करू शकत नाहीत...
- गावित यांची आयात उमेदवार आणि वाढवणं बंदर यावरचे विचार एका व्यासपीठावर घेऊ परवा माझी सभा आहे तिथे घेऊ , आज पर्यंत आम्ही या मतदारसंघाकडे पहिले नव्हते
- अखिलेश यादव परवा म्हणाले, जो मुख्यमंत्री भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नाही ते लोकांना काय मदत करणार, आज ते पलीकडे आलेत , त्याच्या राज्यात मुलांना ऑक्सिजन मिळत नाही ते इथे आलेत, शिवसेनेची दंडेलशाही चालू राहणार
- भाजपकडे आयात केलेली माणसे, तुमचा पक्ष आहे कुठे, चिंतन शिबीर इथेच चालते ना, कुठे गेले ते, आयात केलेले नेते आयात केलेले उमेदवार आयात केलेले श्रोते एका निष्ठावान माणसाला पराभूत करू शकणार नाहीत, आम्ही कधीही त्यांच्या शी बोललो नाही, आम्ही त्याला फोडले नाही ते स्वतःहून आले, आता आज तुम्ही निरंजन डावखरे याना घेतले नव्हे फोडले...निवडणूक जाहीर झाली नाही, राष्ट्रवादीने अजून त्याला उमेदवारी नाही देणार असे सांगितले नाही मात्र तुम्ही त्याला घेतला ...तुम्ही करता ते राजकारण आणि आम्ही करतो ते काय...
- भाजपने या मतदार संघात नंदुरबारचे पार्सल आणले आणि जो भगव्याचा विचार घेऊन जगाला त्याला तुम्ही विसरला,, याला मुख्यमंत्री बेइमानी म्हणतात..
- वनगा हा वणवा आहे, तुम्ही त्यांना साधे उमेदवारी देऊ शकले नाही, गावित जिंकले तर वनगा याना श्रद्धांजली आणि त्यांचा मुलगा जिंकला तर त्यांना काय दुःख होईल का... मी त्यांच्या अश्रुंना न्याय मागायला आलोय... बुलेट ट्रेनमध्ये वनगा परिवाराची जमीन जातेय...
- पोलिसांना हात जोडून सांगायचे आहे...वर्ष दोन वर्ष पूर्वी पोलिसांच्या माता भगिनी मातोश्रीवर न्याय मागायला आले होते मी स्वतः त्यांना घेऊन मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो होतो... अजून काही झाले नाही...
- मुख्यमंत्र्यांना अजून ४ वर्षात २९ गावांचा प्रश्न सोडवता आले नाही ...कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत असाच प्रकार झाला होता, आमचे दात मोजायला निघाले होते... ते तेव्हाही हि म्हणाले २७ गवे निवडणुकीनंतर घेतो...अजून काही नाही...मुख्यमंत्री म्हणजे आश्वासनग्रस्त किंवा थापा ग्रस्त असा एक प्रकार सुरु करायला हवा...कल्याण डोंबिवली मध्ये ६५०० कोटी देणार होते...अजून काही नाही...
- आज योगींना आणलंय. तिथे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे गेलेल्या बालकांचे शाप लागले आहेत योगींना... अनेक प्रश्न तसेच आहेत केवळ आश्वासन देतात... आदित्यनाथांच्या येण्यामुळे जर प्रश्न सोडवणार असतील तर आम्ही निवडणुकीतून माघार घेतो... आयात नेत्यांच्या जोरावर तुम्ही निवडणूक लढताय तुम्हाला याची जाणीव लक्षात यायला हवी कि तुमचा पक्ष संपत चाललंय...
- मतदार संघातले सर्व प्रश्न आमच्या समोर आहेत...श्रीनिवास खासदार झाल्यावर पुन्हा येईन...आज पर्यंत येथील मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही आता देणार....
श्रीनिवास खासदार होणार म्हणजे सामान्य आदिवासी माणूस खासदार होणार...साधा माणूस म्हणूंन तो निवडून येईल ...वनगा कुटुंबाच्या अश्रुना न्याय मिळेल याची मला खात्री आहे