Gudi Padwa Celebration LIVE : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार?

Tue, 09 Apr 2024-6:31 pm,

Gudi Padwa Celebration LIVE : आज चैत्र प्रतिपदा...मराठी नूतन वर्ष...आज घरोघरी विजयाचं प्रतिक गुढी उभारण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि नागपुरात गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभा यात्रा निघाल्या आहेत.

Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय.. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत... या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.. 

Latest Updates

  • 'राज ठाकरे वाघ माणूस, दिल्लीपुढे झुकणार नाहीत',विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettivar on Raj Thackeray : राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत.. मात्र त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलीय.. राज ठाकरेंना पिंज-यात अडकवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होतोय. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीला साथ देणार का.. राज ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याआधीच विजय वडेट्टीवारांनी टीका केलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • Gudi Padwa Celebration LIVE :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या दादरमधील शिवतीर्थावर गुढी उभारली. यावेळी सहकुटुंबानं मिळून गुढीचं पूजन करून मराठी नववर्षाचं स्वागत केलं. दरम्यान मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होणारेय. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.. स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात खुर्च्याही शिवाजी पार्कात मांडण्यात आल्यात. या मेळाव्यातून राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय.  

  • Gudi Padwa Celebration LIVE :  परभणी जिल्ह्यातही नवं वर्ष स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय. पूर्णा तालुक्यातील लिमला, जिंतूर तालुक्यातील पाचेगाव आणि सोनपेठ तालुक्यातील नरवाडी गावात तांब्याच्या गुढी ऐवजी भगवी पताका लावून गुढी पाडवा सण साजरा करण्यात आलेला दिसतोय. सरळ ताब्यांत नारळ ठेऊन भगव्या पताक्याची गुढी उभारून पाडवा सण साजरा केला जातोय...

  • Gudi Padwa Celebration LIVE :  धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर नवचैतन्याची गुढी उभारण्यात आली. हजारो वर्षांपासून तुळजाभवानीच्या मंदिरात ही परंपरा चालत आलीये. मंदिरातील गुढी उभारल्यानंतरच तुळजापूरमध्ये सर्व गुढ्या उभारल्या जातात.

  • Gudi Padwa Celebration LIVE :  गुढी पाडव्यानिमित्त माणगाव शहरात नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. सद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाने या यात्रेचं आयोजन केलं होतं. ढोल ताशा आणि खालुबाजाच्या गजरात पारंपरिक लेझिम खेळत हातात भगवे झेंडे घेत तरुण-तरुणी यात सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतला होता. विविध चित्ररथांवर छत्रपती शिवाजी महाराज, राम लक्ष्मण, वासुदेव अशा वेशभूषा करणा-यांनी लक्ष वेधून घेतलं.

  • Gudi Padwa Celebration LIVE :  चंद्रपुरातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. हिंदू नववर्षाच्या निमित्ताने चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेने गुढी उभारली. . जुना वरोरा नाका चौकात गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं. आरती -पूजन करत मिठाई वाटप करून उत्साहात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यासोहळ्यात  ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आणि समाज सदस्य सहभागी झाले 

  • Gudi Padwa Celebration LIVE :  लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर नव वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय.गुढीपाडव्यानिमित्त पहाटे देवीची महाआरती आणि अभिषेक करण्यात आला. आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली.  मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने देवीचं रूप खुलून दिसतंय.

  • Gudi Padwa Celebration LIVE :  गुढी पाडव्यानिमित्त  कार्ला गडावर गुढी उभारण्यात आली. गुढीची विधीवत पूजा एकविरा देवस्थानच्या विश्वस्तांकडून करण्यात आली. यानंतर गुढी उभारून आजपासून कार्ला एकविरा देवीच्या चैत्र  उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

  • Gudi Padwa Celebration LIVE :  पुण्यात गुढीपाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होतेय. मंदिराच्या दर्शनी भागावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. उत्साह आणि भक्तिमय वातावरणात मराठी नव वर्ष पुण्यात साजरा होतंय

  • Gudi Padwa Celebration LIVE :  साईनगरी शिर्डीतही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. साई मंदिराच्या कळसावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आलीये. तर साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आलीय. 

  • Gudi Padwa Celebration LIVE : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेले गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा शुभारंभ असतो. आज सर्वत्र हा सण जल्लोषात साजरा होणार. या शुभ मुहर्तावर जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. 

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करताय का? मग वाचा ही महत्त्वाची बातमी

  • Stock Market Updates : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर आज शेअर बाजार नवा विक्रम रचला गेला. सेन्सेक्सनं मोठी झेप घेत पहिल्यांदाच 75,000 चा टप्पा पार केल्याच पाहिला मिळालं. तर निफ्टीने 22,700 च्या नव्या शिखर गाठले

  • Gudi Padwa Celebration LIVE :  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या संभाजी नगरच्या घरी गुढी उभारली. नववर्ष परिवर्तनाचे होऊ दे ,लोकशाहीच राज्य येऊ दे अशी मनोकामना यावेळी करत असल्याचा अंबादास दानवे यांनी सांगितलं.

  • Gudi Padwa Celebration LIVE :  डोंबिवलीत शोभायात्रेतही राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याच्या मुद्द्यावरुन कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याण लोकसभेच्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात जुंपली.. 

  • Kolhapur Gudi Padwa Celebration LIVE : कोल्हापुरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे.. पाडव्यानिमित्त कोल्हापुरात भव्य शोभायात्रा काढण्यात आलीये.. या शोभायात्रेत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली.. तलवारबाजी, दांडपट्टा यासह विविध मर्दानी खेळांनी सा-यांचं लक्ष वेधून घेतलं.. 

  • Nashik Shobha Yatra Live : नाशिकमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. काळाराम मंदिरापासून सुरू झालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं नाशिककर सहभागी झालेत. महिला आणि मुलांनी केलेला शंखनाद या शोभायात्रेतील आकर्षण ठरलं.

  • MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार? 

    आज मनसेचा भव्य गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कात होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • Gudi Padwa Celebration In Spain : आज भारतामध्ये हिंदू नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जात आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या मराठी बांधवांकडूनही ते राहत असलेल्या ठिकाणी आपली संस्कृती आणि परंपरा कायम ठेवत हे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. स्पेनमधील माद्रिदमध्ये कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला याची खास झलक

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा -  स्पेनमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनचे Photos पहिलेत का? शिवरायांचा जयघोष, लेझीम, शोभायात्रा अन्...

  • Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्या हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे मराठी नूतन वर्षांची सुरुवात असते. अशामध्ये मुंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी केल्याच पाहिला मिळालं. 

  • Gudi Padwa Celebration LIVE : गिरगावातल्या शोभायात्रांना आगळंवेगळं महत्त्व असतं... मराठी अस्मितेचा, नववर्षाचा जल्लोष याठिकाणी दिसून येतोय. पारंपरिक वेशभूषेत गिरगावकर या शोभायात्रेत सहभागी झालेत.

  • Gudi Padwa Celebration LIVE : ठाण्यात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. ढोल ताशांचा नाद आणि शोभायात्रेतील तरुणाईंचा उत्साह बघण्यासारखा होता.

  • Gudi Padwa Celebration LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • Gudi Padwa Celebration LIVE : राहुल गांधी यांनीही देशवासियांना गुढीपाडवा, चैत्र नवरात्री आणि हिंदू नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • Gudi Padwa Celebration LIVE : आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हिंदू नवं वर्ष आणि चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • Gudi Padwa Celebration LIVE : आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हिंदू नवं वर्ष आणि चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • Gudi Padwa Celebration LIVE : नवआकांक्षा आणि नवसंकल्पांनी आजचा गुढीपाडव्याचा सण उत्साहाने साजरा करूया. सुख, समृद्धी व नवचैतन्याची गुढी उभारूया. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..,या शब्दात शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • Janhvi Kapoor Gudi Padwa Celebration LIVE : हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्री जान्हवी कपूर पहाटे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. 

  • Thane Shobha Yatra Live : ठाण्यातही गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय.. ठाण्यातील 'श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास' ही संस्था दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नववर्ष शोभायात्रेचं आयोजन करते...यंदाचं नववर्ष शोभायात्रेचं आणि पालखी सोहळ्याचं २४वं वर्षं आहे.. ठाण्यातील तरुणाई पारंपारिक वेषभूषेत या शोभायात्रेत सहभागी झालीये..

  • Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत... या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.

  • Kalyan Celebration LIVE : हिंदू नववर्ष स्वागतताचा जल्लोष अख्खा महाराष्ट्रात दिसतोय. कल्याणमध्ये हिंदू नववर्षाचं स्वागतासाठी चौका चौकात भव्य रांगोळी काढण्यात आलीय. 

  • Nagpur Shobha Yatra Live : हिंदू नववर्ष स्वागतताचा जल्लोष नागपुरातही दिसून येतोय. तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत अभिनेत्री प्राजक्ता माळी सहभागी झाली होती. 

  • Dombivali Shobha Yatra Live : डोंबिवलीतल्या स्वागत यात्रेचं विशेष आकर्षण असतं. स्वागत यात्रेची मुहुर्तमेढ रोवणा-या डोंबिवलीत यंदाही सळसळत्या तरुणाईचा उत्साह पाहायला मिळतोय. स्वागत यात्रेनिमित्त विविध चित्ररथ आणि सामाजिक संदेश देतायत.  

  • Gudi Padwa Celebration LIVE : मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून होते. यादिवशी महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. पण गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी का खातात माहितीय?

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा -  गुढीपाडव्यादिवशी का खातात श्रीखंड-पुरी? 'हे' आहेत आरोग्यवर्धक फायदे!

     

  • Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ खातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? सणाच्या दिवशी कडू प्रसाद का खाल्ला जातो? 

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा -  Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण

     

  • Kalyan Shobha Yatra Live : कल्याणमध्येही हिंदू नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येतंय.. ढोल ताशाच्या गजरात कल्याणमध्ये शोभायात्रा काढण्यात आलीये... यंदा इंडियन मेडिकल असोशिएशननं या शोभायात्रेचं आयोजन केलंय....चौका चौकात काढलेल्या भव्य रांगोळ्या हे या शोभायात्रेचं विशेष आकर्षण ठरतंय..

  • Nagpur Shobha Yatra Live : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नागपुरातील शोभायात्रेत

    हिंदू नववर्ष स्वागतताचा जल्लोष नागपुरातही दिसून येतोय. तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात येतेय. नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झालेत. विजयाची उंच उंच गुढी उभारणार अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी झी24तास शी बोलताना दिली. तर या गुढीपाडव्याला प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येत निर्मित झालंय, त्यामुळे अतिशय आनंदाचा गुढीपाडवा आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय.

  • Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय.. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत... या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.. 

  • Gudi Padwa in Maharashtra : चैत्र पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास 

    साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवाचा हा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येतोय. अशा या शुभ मुहूर्तावर चैत्र पाडवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आलीय. संपूर्ण मंदिर फुलांमध्ये खुलून निघालेय.

  • Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल, कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, पर्यायी मार्गांवर कसं जावं? पाहा सविस्तर वृत्त...   

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - Gudi Padwa 2024: एकिकडे स्वागत यात्रा, दुसरीकडे पाडवा मेळावा; गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत बदल

     

  • Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जाणार आहे. पण तुम्हाला गुढी उभारवी अन् कधी उतरवावी याबद्दल शास्त्रोद्ध पद्धत माहिती आहे का? 

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?

     

  • Gudi Padwa Celebration LIVE : आला सण गुढीपाडव्याचा...हिंदू नवं वर्ष म्हणजेच मराठी नूतन वर्ष...हिंदू नवं वर्षाचं स्वागत भारतात वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतं. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षाचं स्वागत हे गुढी उभारुन करण्यात येतं. यंदा गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधीसह कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं जाणून सर्व माहिती एका क्लिकवर 

    अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - Gudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर

     

  • Thane Shobha Yatra Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपीश्वर शोभायात्रेत सहभागी 

    ठाण्यातील ''श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास'' ही संस्था दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नववर्ष शोभायात्रेचं आयोजन करते. यंदाचं नववर्ष शोभायात्रेचं आणि पालखी सोहळ्याचं २४वं वर्षं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शोभा यात्रेत सहभागी झाले होते. 

  • Dombivali Shobha Yatra Live : सळसळत्या तरुणाईचा उत्साह, डोंबिवलीतील फडके रोडवरील शोभायात्रा

    डोंबिवलीत स्वागत यात्रेला सुरुवात होतेय. स्वागत यात्रेची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या डोंबिवलीत यंदाही सळसळत्या तरुणाईचा उत्साह पाहायला मिळतो. स्वागत यात्रेनिमित्त विविध चित्ररथ आणि सामाजिक संदेश देतायत.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link