Dahi Handi 2023 LIVE: दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उत्साह, राजकीय नेत्यांची हजेरी

नेहा चौधरी Thu, 07 Sep 2023-7:18 pm,

Mumbai Dahi Handi 2023 LIVE: देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यात दहीहंडीचा उत्साह दिसून येतो आहे.

Janmashtami Dahi Handi 2023 in Mumbai : जन्माष्टमीचा शुभ सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणी दहीहंडीचा उत्साह रंगात आहे. पावसामुळे या उत्साहाला अजून रंगत चढली आहे. 

Latest Updates

  • मुंबईतील बोरीवली येथील मागाठाणे भागातही दहीहंडीचा उत्साह आहे.. तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे आणि राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दहीकाला उत्सवाचं आयोजन करण्यात आलेय. या उत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. 

  • पुण्यामध्ये देखील दहीहंडीचा उत्साह आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून मान्यता असलेला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ आणि पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणेशोत्सव मंडळ यांनी एकत्र येत दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेय. 

  • Dahihandi Viral Video : ढाक्कुमाकुम! नऊवारी साडी नेसून आजींची कमाल, दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

  • Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला गौतमी पाटील ही गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी आली आहे. तिने गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी डान्सचा जलवाही दाखविला. 

  • Thane Dahi Handi 2023 : ठाण्यातील मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी अभिनेते, फिल्म दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या कामाचं कौतुक केलं. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

  • Dadar Dahi Handi Live: मुंबईतील दादर परिसरात आयडिलने आयोजित केलेल्या सेलिब्रिटी दहीहंडी मराठी कलाकारांनी मोठ्या उत्साहात फोडली. ज्येष्ठ मराठी अभिनेता विजय पाटकर सह नवोदित कलाकारांनी उत्साहात दहीहंडी साजरी केली.

  • Thane Dahi Handi 2023 : ठाण्याच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकं येत आहेत. शिवप्रतिष्ठान गोविंदा पथकाने सात थर रचत या दहीहंडीला सलामी दिली. आहे. यावर्षी आठ थर कोण लावतं हे पाहण्यासाठी ठाणेकर उत्सुक आहेत. 

  •  Mumbai Dahi Handi 2023 LIVE : मुंबई, ठाण्यासह राज्यभरात गोविंदाचा दहीहंडी फोडण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अख्ख राज्य गोविंदामय झालं आहे. पावसासोबत दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यात येतो आहे. मागाठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

  • Vasai Dahi Handi Live : वसई विरार मीरा भाईंदरमध्ये पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 262 सार्वजनिक उत्सव तर एक हजार 216 खाजगी हंड्या आज दिवसभरात फुटणार आहेत. वसई विरारमध्ये सार्वजनिक 180 तर एक हजार 41 खाजगी दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत. आकर्षक बक्षिष, मानाची हंडीसह विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. डीजे आणि बँडच्या ठेक्यावर आज मोठ्या उत्सवात वसई विरारमध्ये गोविंदाचा उत्साह द्विगुणीत होणार आहे.सुरक्षेची काळजी घेऊन हा उत्सव पार पाडा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

  • Janmashtami Live : साईंच्या शिर्डीमध्ये कृष्णजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला.. साईबाबा समाधी मंदिरात गोकुळ अष्टमीनिमित्त  कृष्ण जन्म कीर्तन पार पडलं.. त्यानंतर 12 वाजता साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा यांच्याहस्ते श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाला.. कृष्णजन्मोत्सवानिमित्त मंदिरातील चांदीच्या पालखीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.. 

  • Thane Dahi Handi Live : मागाठाणे (Magathane Dahi Handi) तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे याच्या वतीने भव्य दिव्य दहीकाला आयोजन करण्यात आले आहे याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी कलाकार देखील उपस्थित राहणार

  • Dahi Handi Latest News : दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात 10, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात 07  रूग्णशय्या आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 4 रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच 16 उपनगरीय रूग्णालयातही 105 रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 5 ते  10 खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.

  • Dahi Handi Latest News : दहिहंडीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार संभाव्य गरज लक्षात घेऊन महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  

  • Mumbai Govinda : जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज झालीयेत. नायर, केईएम, सायन रुग्णालयात जखमी गोविंदासाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्यात. यावेळी त्यांना लागणारी औषधे रुग्णालयात उपलब्ध करण्यात आलीये.

  • Pune Traffic News Today : पुण्यात आज दहीहंडी उत्सव निमित्ताने प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय...शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक संध्याकाळी 5 ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात येणारंय.. 

  • Mumbai Best Bus News Today : मुंबईत साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. अंधेरी, रावळपाडा, कन्नमवार नगर, मानखुर्द अशा अनेक दहीहंडीचे मंडप बांधल्यामुळे बेस्टचे मार्ग वळवण्यात आलेत.

  • Thane Dahi Handi Live : ठाण्यात आज दहीहंडीनिमित्त वाहतूक मार्गात मोठे बदल केले आहेत. शहरात संपूर्ण दिवस जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणाराय. तर सर्व मुख्य दहीहंडीच्या ठिकाणची वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात येणाराय. 

  • Nagpur Dahi Handi Live : नागपुरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय.... बडकस चौकामध्ये गोकुळाष्टनिमित्त आयोजित दहीहंडी स्पर्धेत 8 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता..6 थरावर ही दहीहंडी फोडण्यात आली...यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते..

  • Mumbai Rain : दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन झालंय. मुंबईतल्या दादर परिसरात पावसानं हजेरी लावली. एकीकडे दहीहंडीचा उत्साह आणि दुसरीकडे पाऊस...असा आनंद इथं जमलेले नागरिक घेतायत. 

  • Dadar Dahi Handi Live: मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय. दादरमध्ये साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडीला महिला गोविंदा पथकाने 5 थर लावत सलामी दिली. 

  • Dadar Dahi Handi Live: मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय. दादरमध्ये साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडीला महिला गोविंदा पथकाने 5 थर लावत सलामी दिली.

  • Thane Dahi Handi Live : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनीदेखील दहीहंडीचे आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे या दहीहंडीला हजेरी लावणार आहेत. 

  • Thane Dahi Handi Live : ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान ही प्रसिद्ध दहीहंडी आहे. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्याशिवाय अभिनेता सुनिल शेट्टी, चंकी पांडेसह अनेक बॅालिवुड स्टार, अवधुत गुप्ते आणि मराठी सिने सृष्टीमधील कलाकार गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी येणार आहे. 

  • Thane Dahi Handi Live : ठाणे शहरात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. या दहीहंडीला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे संध्याकाळी या दहीहंडीचा उत्साह पाहण्यासाठी येणार आहेत. जो गोविंदा पथक 10 थर यशस्वी रचेल त्याला 11 लाखाच पारितोषिक देण्यात येणार आहे. 

  • Thane Dahi Handi Live :  वर्तक नगरमध्ये प्रो गोविंदाचं आयोजन करण्यात आलं आहे. विश्व विक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते वरूण धवन, विकी कौशल, आयुष्यमान खुराणा यांच्यासह इतर सेलिब्रिटीची गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी येणार आहेत. 

  • Thane Dahi Handi Live : ठाण्याच्या टेंभीनाक्यात दहीहंडीचा (Tembhi Naka Dahi Handi) उत्साह आहे.. रात्रीपासूनच टेंभीनाक्यात गोविंदा पथकं दाखल होऊ लागलीत.. धर्मवीर आनंद दिघे यांनी या उत्सवाला सुरुवात केली होती. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा साजरा होतोय. रात्रीपासूनच टेंबीनाक्यावर गोपाळकाला उत्सव सुरु झालाय. टेंभीनाक्याची हंडी ही ठाण्यातील मानाची हंडी असते... मुंबईतील गोविंदा पथकासाठी आणि ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी 1 लाख रुपयांचं, सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12 हजार, सहा थरांसाठी 8 हजार, पाच थरांसाठी 6 हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. 

  • Mumbai Dahi Handi Live : मुंबईतील अजून प्रसिद्ध दहीहंडी आहे ती म्हणजे दादर शिवसेना भवनासमोर आयोजित करण्यात येणारी. युवा सेनेकडून निष्ठा दहीहंडी दरवर्षी आयोजित करण्यात येते. यंदा दहीहंडीतून एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांचा उत्साह वाढविण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. 

  • Mumbai Dahi Handi Live : घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांची मुंबईतील प्रसिद्ध दहीहंडी आहे. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयोगमंत्री उदय सामंत हजेरी लावणार आहेत. तर राम कदम यांची दहीहंडी ही बॉलीवूड कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी रोहित शेट्टी, विकी कौशल, कटरीना कैफ, शक्ती कपूर, असराणी, जितेंद्र आदी सेलिब्रेटी हजर राहणार असल्याचं समजतं. 

  • Janmashtami Live : पंढरपुरात विठ्ठल मंदिरात मध्यरात्री कृष्णजन्म सोहळा साजरा झाला. देवाला गोपाळ रूपातील पोशाख केला होता. हातात चांदीची काठी, अंगावर शाल, डोक्यावर पागोटे असा सुंदर पोशाख करण्यात आला होता. कृष्ण जन्म पाळणा म्हणत मोठ्या उत्साहात साजरा झाला..

  • Mumbai Dahi Handi Live : मुंबईतील प्रसिद्ध वरळी जांबोरी मैदानातील दहीहंडी ही आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील आहे. यंदा भाजपकडून भ्रष्टाचाराची हंडी इथे फोडली जाणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. तर आदित्य ठाकरेही यावेळी येणार आहे. 

  • Mumbai Dahi Handi Live : दादर आयडीयल दहिहंडी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयोजित केली जाते. गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी इथे दरवर्षी मराठी कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि दिव्यांग दहीहंडीचं इथे आयोजन केलं जातं. 

  • Mumbai Dahi Handi Live : दादर आयडीयल दहिहंडी ही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून आयोजित केली जाते. गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी इथे दरवर्षी मराठी कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि दिव्यांग दहीहंडीचं इथे आयोजन केलं जातं. 

  • Janmashtami Dahi Handi Live :  जन्माष्टमीनिमित्त नोएडामधील इस्कॉन मंदिरात मंगल आरती करण्यात आली.

  • Janmashtami Dahi Handi Live : भगवान कृष्णांच्या भक्तांनी मंदिरांमध्ये एकच गर्दी केली. मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आले. मंदिरासोबत घरोघरी जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात आला. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link