Lok Sabha Election 2024 LIVE: धाराशिवमध्ये काँग्रेसला बसणार मोठा धक्का? या बड्या नेत्याची पवारांच्या सभेला अनुपस्थिती

Wed, 24 Apr 2024-8:39 pm,

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी बड्या नेत्यांच्या सभांची गर्दी... पाहा कोणत्या नेत्याची कुठं असेल सभा... राज्याच्या राजकारणात आजचा दिवस नेमकं कोण गाजवणार...

Lok Sabha Election 2024 LIVE Updates : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वीच्या प्रचारतोफा आज, बुधवारी थंडावणार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हातात असणाऱ्य़ा अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंक पोहोचण्यासाठी म्हणून राज्यात अनेक ठिकाणी प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी इथं मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्र गाठला आहे. 

Latest Updates

  • मधुकर चव्हाण भाजपच्या वाटेवर?

    धाराशिवमध्ये काँग्रेस ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण शरद पवार यांच्या सभेला गैरहजर राहिल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे. मधुकर चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.  मधुकर चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता मधुकर चव्हाण यांच्या उपस्थितीने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

  • मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत खालावली

    धाराशिव येथे दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल केलं गेलंय. अशक्तपणा आणि उष्णतेचा त्रास जाणवल्याने धाराशिव वरून थेट संभाजीनगर इथे आणून गॅलक्सी रुग्णालयात दाखल केलं. दौरा अर्धवट सोडून मनोज जरांगे पाटील संभाजीनगरला येऊन उपचार घेत आहेत.

  •  दक्षिण मुंबईच्या जागे संदर्भात उद्या महाराष्ट्र भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा उद्या घेणार दक्षिण मुंबई भाजपची मॅरेथॉन बैठक घेणार आहेत.  शिवडीतील होणाऱ्या बैठकीत तिढा सुटणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  उद्या संध्याकाळी 5 वाजता शिवडी येथे भाजपच्या दक्षिण मुंबईतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 

  • Lok Sabha Elections Voting Live Updates:   आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभेत वंचितचे राहुल गायकवाड यांची उपस्थिती 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेला सुरुवात 

    - मुख्य व्यासपीठावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह सोलापुरातून वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरलेले राहुल गायकवाड देखील उपस्थित 

    - अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल गायकवाड यांनी पक्षातील प्रमुखांना विश्वासात न घेता वंचितची उमेदवारी मागे घेतली होती 

    - वंचितच्या माघार मुळे आमदार प्रणिती शिंदे यांना याचा फायदा होईल असे बोलले जात असतानाच राहुल गायकवाड यांची काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी

  • आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बद्दल धक्कादायक गोप्यस्फोट  केला आहे. 22 जुन 2022 रोजी वाय बी सेंटरला शरद पवार साहेबाकडे कोण घेऊन चालले होते. आमच्या सर्व आमदारांचा म्होरक्या कोण होतं की जे सांगत होते की भारतीय जनता पक्षासोबत जायला पाहिजे. आपण सत्तेत जायला पाहिजे तेच रोहित पवार आज निष्ठेची भाषा बोलतात. आपण पहिला टर्मचे आमदार आहात थोरात यांचा आदर केला पाहिजे. आपल्या भावना जरूर मांडला पाहिजे परंतु आपण देखील किती पाण्यात आहात हे जनतेला माहित आहे अधिक खोलात न जाता योग्य वेळ आपल्या तोंड बंद करावा अन्यथा आम्ही या आठवड्यात तोंड उघडणार आहोत असा सुनील शेळके यांनी रोहित पवार यांना इशारा दिला आहे.

  • Lok Sabha Elections Voting Live Updates:  वर्धा लोकसभा मतदार संघात आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. ही निवडणूक ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद किंवा महानगर पालिकेची नाही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशात दोनच पर्याय आहेत . राहुल गांधी यांच्या सोबत 26 पक्षांची खिचडी आहे  राहुल गांधींच्या यांच्यात सगळे डब्बे लागले आहे, राहुल गांधींची खिचडी कशी आहे सगळे बोगीच आहे. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे,ममता ,लालू म्हणतात आम्ही इंजिन आहे , आता 26 तारखेला बटन दाबलं की रामदासची यांची बोगी डायरेक्ट मोदींच्या इंजिन मध्ये जाईल.

     

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : माढ्यात पवारांचा मोदींवर घणाघात 

    पंतप्रधान मोदींचं एक काही वर्षांपूर्वीचं भाषण ऐकवत पवारांनी उचलून धरला देशातील वाढत्या महागाईचा मुद्दा. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशा शब्दांत टीकेचा सूर आळवत त्यांनी आपला मोर्चा इंधन दरवाढीकडेही वळवला. यावेळी शरद पवारांनी एक ऑडिओ क्लिक लावली आणि उपस्थितांनीही ती लक्षपूर्वक ऐकली. शरद पवार सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सक्रिय झाले असून, पुराव्यांनिशी ते भाजपाला निशाण्यावर घेताना दिसत आहेत. 

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : अजित पवार यांच्याशी निगडित कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा नाही

    अजित पवार यांच्याशी निगडित कोणत्याही व्यवहारात फौजदारी गुन्हा होत नसल्याचा EOW चा क्लोजर रिपोर्टमध्ये निर्वाळा करण्यात आला आहे. क्लोजर रिपोर्टमध्ये सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांना देखील क्लीन चिट मिळाल्याचं सांगण्यात आलं असून, बँकेला कोणतंही आर्थिक नुकसान झालं नसून आत्ता पर्यंत 1343.41 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. 

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : पुण्यात आदित्य ठाकरेंचा होणार रोड शो..

    लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा पुण्यात रोड शो होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा रोड शो होणार असून, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात असतील. दरम्यान, मंगळवारी काँग्रेसचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी रोड शोसंदर्भात चर्चा केली होती. 

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

    भाजप नेत्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महा रॅली काढण्यात येणार असून बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या पारस नगरीच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला छत्रपती उदयनराजे भोसले देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : राहुल गांधी आज कॉंग्रेसच्या न्यायपत्रावर संवाद साधणार

    समृद्ध भारत फाउंडेशनच्या वतीन सामाजिक न्याय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीच्या जवाहर भवन या ठिकाणी असलेल्या संमेलनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात काँग्रेसचे अनेक नेते चर्चा करणार आहेत. देशभरातील OBC, SC, ST यांच्या विविध प्रश्नांवर या संमेलनात चर्चा होणार आहे. 

    काँग्रेसचा जाहीरनाम्याला न्यायपत्र असं नाव देण्यात आलं आहे. या न्यायपत्रात सामाजिक न्यायाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. सामाजिक न्यायासाठी जातनिहाय  जणगणने सोबतच अनेक आश्वासन देण्यात आली आहेत. या सर्व विषयावर या सामाजिक न्याय संमेलनात विविध सत्रात चर्चा होणार आहे. 

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : सुनील तटकरेंकडून शरद पवारां बाबत मोठा गौप्यस्फोट

    सुनील तटकरेंकडून शरद पवारां बाबत मोठा गौप्यस्फोट. 2016 मध्ये भाजप सोबत सत्ता स्थापनेचा आदेश देण्यात आला. मंत्रीपदं ठरली, खाते वाटपही झाले होते, लोकसभेच्या जागाही ठरल्या होत्या. त्या काळात अमित शहां सोबत दिल्लीत बैठक झाली आणि त्या बैठकीला साहेबही उपस्थित होते अशा खळबळजनक गौप्यस्फोट तटकरेंनी केला. 

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मैदानात 

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरलेत. वयाचा विचार न करता लागोपाठ ते उममेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतायत. आज शरद पवारांच्या माढा लोकसभा मतदारसंघात सभा होतेय. उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मोडनिंब इथे जाहीर सभा होणारेय. सभनंतर शरद पवार संत सावता माळी यांच्या समाधीचे अरण इथे जाऊन दर्शन घेणार आहेत. 

     

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते- बच्चू कडू 

    अमरावतीत हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते असा खळबळजनक दावा बच्चू कडूंनी केला आहे. 26 तारखेपर्यंत निवडणुकीत काहीही होऊ शकतं असं कडूंनी म्हणत, त्यामुळेच आम्ही एक पाऊल मागे घेतलं असा दावाही केला. गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, त्यांनी सभा घ्यायला नको होती... या सर्व घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आला. मात्र, मी त्यांचा उचलणार नाही असं कडूंनी म्हटलं आहे. 

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : देवाच्या यात्रेत पवार एकत्र... 

    राजकारणामुळे कौटुंबिक दुरावा आला असला तरीही हिंजवडीतल्या म्हतोबा यात्रेत पार्थ पवार आणि रोहित पवार एकाच बगाड्यावर दिसले. इतकंच नाही तर देवाच्या बगाड्यावर चढताना रोहित पवारांना पार्थ पवारांनी हातही दिला. गर्दी असल्यामुळे दोघेंही जण एकमेकांना आधार देत होते. पक्ष फुटीनंतर दोन्ही भावांची अशी एकत्र भेट चर्चेचा विषय ठरतेय. 

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : सुनेत्रा पवार यांना क्लिनचिट

    महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चिट दिली आहे.

     

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची लगबग 

    चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची लगबग दिसून येतेय. मराठवाड्यातील हायहोल्टेज सीट असलेल्या बीड मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. मोठं शक्तिप्रदर्शन करत त्या अर्ज भरतील. जालन्याचे मविआचे उमेदवार कल्याण काळे हे सुद्धा आज उमेदावारी अर्ज दाखल करणार आहेत. तर संभाजीनगरमध्ये MIMचे उमेदवार इम्तियाज जलली रॅली काढून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. शिर्डीतही उत्कर्षा रुपवते वंचित कडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील यावेळी वंचितकडून भव्य रॅली काढण्यात येणार असून सुजात आंबेडकर रॅलीत उपस्थीत असतील. तर जळगावात मविआचे उमेदवार करण पवार आणि रावेरचे श्रीराम पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह मविआचे नेते सोबत असतील.

     

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : जितक्या जास्त धमक्या येतील तितका... 

    जितक्या जास्त धमक्या येतील तितका जास्त लीड सुप्रिया सुळेंना मिळणार असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय. बारामतीत काही कार्यकर्त्यांना धमकीचे फोन येतायत. मात्र, काहीही करू नका आम्ही काय उत्तर द्यायचंय ते दिलंय. असं रोहित पवारांनी म्हटलंय.

     

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : अमरावतीत आज अमित शाह आणि राहुल गांधींची सभा 

    अमरावतीत आज अमित शाहा आणि राहुल गांधींची सभा होणार आहे. दुस-या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारासाठी अमित शाहांची सभा होतेय. अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावर दुपारी 12 वाजता सभा होणाराय. तर याच मैदानावर बच्चू कडू हे सुद्धा सभा घेण्यासाठी ठाम आहेत. तर दुसरीकडे मविआच्या बळवंत वानखडेंसाठी राहुल गांधींची परतवाडामध्ये सभा होणार आहे.

     

  • Lok Sabha Election 2024 LIVE Updates : दिग्गज नेत्यांच्या आज राज्यात सभा 

    दिग्गज नेत्यांच्या आज राज्यात सभा होतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभा होतेय. काँग्रेस नेते राहुल गांधीही आज अमरावतीत मविआ उमेदवार बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी सभा घेणारेत. सोलापुरात प्रणिती शिंदेंसाठीही ते आज सभा घेतायत. शरद पवार आज माढामध्ये असणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी ते मैदानात उतरले असून, उद्धव ठाकरेंची हिंगोलीच्या हादगावमध्ये नागेश आष्टीकरांसाठी सभा होईल. तर नांदेडमध्ये मविआ उमेदवार वसंतराव चव्हाणांसाठी पत्रकार परिषद घेणारेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रामदास तडस यांच्या प्रचारासाठी वर्ध्यात सभा होतेय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंगोलीतील शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कोहळीकरांसाठी सभा होणार आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link