Live Updates : नवी मुंबईतील नाराज भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश

Mon, 06 May 2024-10:04 pm,

Loksabha Election 2024 Live Updates : पाहा सर्व राजकीय अपडेट्स एका क्लिकवर... कुठे होणार मतदान, विरोधी गटाकडून कोणावर होणार प्रहार... पाहा सविस्तर वृत्त...

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ज्यानंतर 12 राज्यांतील 94 जागांसाठी मंगळवारी 7 मे रोजी देशभरात मतदान होणार आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत मातब्बर नेत्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. 


एकिकडे राज्यात प्रचारतोफाची धग कमी झाली असली तरीही दुसरीक़डे मात्र राजकीय वर्तुळात चाललेली उलथापालथ आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र मात्र क्षणाक्षणाला वेगळी रुपं दाखवताना दिसत आहे.  

Latest Updates

  • प्रकृती अस्वस्थमुळे ब्रेक घेतलेल्या शरद पवारांचा पुन्हा झंजावाती दौरा सुरू होणारेय. आठ तारखेपासून शरद पवार अहमदनगर, पुणे, सातारा, बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या मतदान केल्यानंतर ते प्रचाराचा धडाका लावणार आहेत. उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतील. काल प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी ब्रेक घेतला होता.

  • उद्धव ठाकरे यांचा उद्या  धुळे व जळगाव दौरा...दुपारी तीन वाजता धुळे येथे  महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ सभा घेणार..तर सायंकाळी 7 वाजता  महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाची उमेदवार करन पवार यांच्या प्रचारार्थ जळगावमध्ये सभा

  • माढा लोकसभेत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी दिला मोहिते पाटील यांना पाठिंबा..माढा लोकसभा मतदारसंघात भालके यांना समर्थन करणारे कार्यकर्ते महा विकास आघाडी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना करणार मतदान..शिवतेज मोहिते पाटील आणि भगीरथ भालके यांची झाली भेट.

  •  सोलापुरात मराठा समाजात वाद, पैसे घेऊन लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना मदत करत असल्याचा मराठा समन्वयकावर आरोप

  • विरोधकांच्या रेल्वेला फक्त इंजिन आहेत. एक राहुल गांधी यांचे इंजिन, शरद पवार यांचे इंजिन, उद्धव ठाकरे यांचे इंजिन, स्टॅलिनचे इंजिन...हे सगळे वेगवगळ्या बाजून जात आहेत त्यामुळे इंजिन जगेवरच आहे.- देवेंद्र फडणवीस 

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारी करणारे अनिल जाधव यांनी अखेर माघारी घेतली आहे. रविवारी संध्याकाळी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण मागे हटणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पक्षाची शिस्त आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पार लक्ष साध्य करण्यासाठी समजूत घातल्यानंतर अनिल जाधव यांनी शरणागती पत्करली आहे.

  • जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सकाळपासून कार्यकर्त्यांसोबत बंद द्वार बैठकांचा धडाका..तब्बल तीन ते चार तासापासून मंत्री गिरीश महाजन व नेत्याकडून जळगावातील लाडवंजारी सभागृहात बंद द्वार तालुका निहाय कार्यकर्त्यांच्या बैठका..अवघ्या सात दिवसांवर मतदानाची तारीख असल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून बंद द्वार बैठकीत कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची उजळणी. गाफील राहू नका.कामचुकार पणा करू नका या शब्दात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कार्यकर्त्यांना सूचना.

  • नाशिकमधून भाजपच्या अनिल जाधवांची माघार,शांतिगीरी महाराज काय भूमिका घेणार? याकडे लक्ष

  • धाराशिव महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर उद्या आठ वाजता गोवर्धन वाडी तालुका जिल्हा धाराशिव येथे मतदान करणार आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत उद्या साडेसात वाजता मुगाव तालुका परंडा येथे मतदान करणार आहेत. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील ,भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील ,डॉक्टर पदमसिंह पाटील हे उद्या सकाळी 7 वाजता तालुका जिल्हा धाराशिव येथे सकाळी सात वाजता मतदान करणार आहेत. उबाठा गटाचे आमदार कैलास पाटील हे उद्या साडेसात वाजता सांजा तालुका धाराशिव येथे मतदान करणार आहेत.

  • Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईतल्या खारदांडा इथे ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने आले. ठाकरे गटाचे शाखाप्रमुक चिंतामणी निवटेंनी गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केल्याने दोन्ही गटात वाद निर्माण झाला. महायुतीच उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचार रॅलीवेळी हा प्रकार घडला. यावेळी भाजप नेते आशिष शेलारही उपस्थित होते. आशिष शेलार यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला

  • चित्रपटात जे दाखवल ते खोटं दाखवल आम्ही दुसऱ्या चित्रपटात खर दाखवणार. आनंद दिघे यांना नको नको ते राजन विचारे बोलत होता. दिघे यांचा असली शिष्य कोण तर नरेश आणि नकली शिष्य राजन. आनंद दिघे गेल्यानंतर उध्दव ठाकरे यांना भेटलो तेव्हा मला त्यांनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टी विचारली तेव्हा खूप वाईट वाटलं- मुख्यमंत्री

  • मोदींच्या सभेच्या गर्दीसाठी 300 रुपये 500 रुपये पुण्यात तर माणसाचा 4 हजार भाव होता.. खोटं बोलणे रेटून बोला असे आमच्या फडणवीस साहेबांचे म्हणणे आहे.- नाना पटोलेंचा आरोप 

  • Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमधून मोठी बातमी 

    दिंडोरीतून जे पी गावितांची माघार. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला दिलासा

  • Loksabha Election 2024 Live Updates : मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर 

    मुंबई, ठाणे लोकसभेसाठी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर. पक्षातील अनेक कार्यकर्ते नाराज असल्यामुळं त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू. माझ्यातला कार्यकर्ता जीवंत असल्याचं म्हणत कार्यकर्त्यांना हमी. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : बारामतीत मतदानासाठी जय्यत तयारी

    तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रकिया पार पडणार आहे यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघात उद्याच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर मतपेट्या ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी बारामती येथील एमआयडीसी येथील वखार महामंडळ या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जय तयारी करण्यात आली आहे.

  • Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवार यांच्या आरोग्यासंदर्भात मोठी अपडेट 

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सततच्या सभा आणि दौऱ्यांमुळे दगदग सहन करावी लागली आणि यातून त्यांच्या घशाला त्रास होत असल्याने त्यांचे आज म्हणजे सोमवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी रविवारी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. दरम्यान आज सकाळी गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी एक रुग्णवाहिका आली होती. डॉक्टरांनी त्यांची आवश्यक अशी तपासणी देखील केल्याचे सांगितले जात असून उद्यापासून शरद पवार हे नियोजित सभा घेऊ शकतील असे सांगितले जात आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांचा आवाजही बसलेला होता.

  • Loksabha Election 2024 Live Updates : भारताची लोकसभा निवडणूक पाहण्यासाठी आले परदेशी पाहुणे 

    भारतीय निवडणूक प्रक्रियेची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी श्रीलंका, झिंबाब्वे, कझाकिस्तान आणि बांगलादेश या 4 देशांचे 7 प्रतिनिधी भारताच्या दौऱ्यावर आहेत. आज हे प्रतिनिधी मंडळ रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांचे पारंपारिक भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले. अलिबाग येथील मतदान साहित्य वितरण केंद्राला त्यांनी भेट देवून पाहणी केली आणि माहिती घेतली. उद्या जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर भेटी देवून हे प्रतिनिधी मंडळ मतदान प्रक्रियांची पाहणी करणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतर राष्ट्रीय सहभाग आणि सहकार्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला

    घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जा करण्यात आलाय. या उलट मिहीर कोठेचा यांच्या पॅम्प्लेट्स या सोसायटीत वाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत रंगताना दिसतोय.

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकमधून कोण माघार घेणार?

    नाशिक आणि दिंडोरीत आज कोण माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. हेमंत गोडसेंविरोधात शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. शांतीगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र माघार घेण्यास शांतीगिरी महाराजांनी नकार दिलाय. तर भाजपचे बंडखोर अनिल जाधव यांनी हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढवलंय. समर्थकांचा मेळावा घेत आपण लढण्यावर ठाम असल्याची त्यांनी सांगितलंय.

  • Loksabha Election 2024 Live Updates : अनिल देसाई यांचा मॉर्निंग वॉक करण्यासोबत 

    महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांनी त्यांच्या मतदार संघात असलेल्या शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासोबत संवाद साधला.यात युवक,ज्येष्ठ नागरिक महिला,पुरुष यांच्याशी संवाद साधला.शिवाजी पार्क परिसरात माती,धूळ जास्त उडत असल्याने श्वसनाचे विकार होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून निवडून आल्यावर कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढणार तसेच कोकणातील निवडणुकीत विनायक राऊत हे च निवडून येतील असा दावा त्यांनी केला आहे.राहुल शेवाळे हे एकेकाळचे सहकारी होते पण त्यानी वेगळा मार्ग निवडला असला तरी जनताच ठरवणार आहे त्यांना कोण पाहिजे, असं देसाई म्हणाले. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : मतदानाच्या दिवशी बाजारपेठा बंद

    निवडणूक प्रक्रिया लक्षात घेता मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद राहणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हे निर्देश देण्यात आल्यामुळं आता तिसऱ्य़ा टप्प्यातील मतदानादरम्यान पुणे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : आज चौथ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस 

    पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 पर्यंत अर्ड माघारी घेता येणार आहे. शिरुर, अहमदनगर, बीडसह 11 मतदारसंघांमध्ये 13 तारखेला होणार चौथ्या टप्प्यातील मतदान. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : महायुतीला घरचा आहेर 

    नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपा तून बंडखोरी केलेले अनिल जाधव अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात निवडणूक लढवत आहे त्यांनी रविवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा घेत गेल्या दहा वर्षात झालेल्या कामांवर टीका टिपणी केली नाशिक जिल्ह्यातील आर्थिक करणे असलेला शेतकरी नाराज असल्याचाही त्यांनी म्हटल्याने महायुतीला घरातूनच आहेर मिळत आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का 

    निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे नाराज असलेले विजय कंरजकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विजय करंजकर यांनी पक्षप्रवेश केला. विजय करंजकर नाशिकमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. यावेळी माझ्याशी विश्वासघात करून गद्दारी झाल्याचं करंजकरांनी म्हटलंय. विजय करंजकर यांच्या प्रवेशाने मविआचे म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवारांनी कोणाला भरला दम? 

    पुण्यातील इंदापूरमधल्या सभेत शरद पवारांनी इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दम भरला. दुसऱ्यांना निवडणुकीत सहकार्य केलं तर तुमच्या शेतीचं पाणी बंद करु अशी दमदाटी भरणे करत असल्याचं, शेतक-यांनी आपल्याला सांगितल्याचं पवार म्हणाले. यावर तुला सरळ करायला वेळ लागणार नाही अशा इशाराही, पवारांनी भरणेंना दिला. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : भाजप म्हणजे बेअकली- उद्धव ठाकरे

    भाजप म्हणजे बेअकली, भेकड जनता पार्टी आहे; अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. नवी मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. तसंच शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हाच्या निकालावरुन त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उडवली. तर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शाब्दिक फटकारे लगावले.

  • Loksabha Election 2024 Live Updates : तिसऱ्या टप्प्यात कुठेकुठे होणार मतदान? 

    रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले इथं मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link