Loksabha Election 2024 Live Updates: आज सभांचा सुपर शनिवार! राज ठाकरे नारायण राणेंसाठी घेणार सभा

Surabhi Jagdish Sat, 04 May 2024-1:56 pm,

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...

Lok Sabha Elections Live Updates 4 May 2024: लोकसभा निवडणुकीची तिसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेले असतानाच निवडणुकीचा प्रचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींचा जोर वाढू लागला आहे. आजही राज्यासहीत भारतामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून...

Latest Updates

  • प्रसिद्ध गायक नंदेश उमप हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून बसपातर्फे निवडणूक रिंगणात उतरलेत. आज ते चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेत.

  • उत्तर पूर्व मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या नावाशी मिळते जुळते चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. संजय पाटील यांना शह देण्यासाठी हे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

  • रोहित पवारांना धक्का

    रोहित पवार यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. 2019 च्या निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांना समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राम शिंदे यांचे समर्थक असलेल्या अक्षय शिंदे यांनी 2019 मध्ये रोहित पवारांना समर्थन दिल्याने कर्जत जामखेड मतदार संघात चर्चा झाली होती.

  • सांगलीत वाघावरुन मविआत डरकाळ्या, पाहा नेमकं काय सुरूये?

  • बाळासाहेब तुमच्या वर्गात होते का? उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत मोदींना सवाल

    महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये आपल्या खास शैलीत भाषण करताना उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. मात्र याचबरोबर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या विधानांवरुनची त्यांच्यावर टीका केली. भाषणामध्ये राम मंदिराचा उल्लेख केल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे तुमच्या वर्गात होते का? असा खोचक सवाल विचारला. उद्धव ठाकरे असं का म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन.

  • करमाळ्यामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द झाली आहे

  • नवगणेंच्या गाडीवर झालेल्या हल्लाप्रकरणी विकास गोगावलेंचा खुलासा

    शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणेंच्या गाडीवर झालेल्या हल्लाप्रकरणी विकास गोगावलेंनी खुलासा केलाय...ही घटना घडली तेव्हा मीच काय माझा कुठलाही कार्यकर्ता तिथं नव्हता. आम्ही तिथं असल्याचे समोर आलं तर राजकारणातून संन्यास घेऊ असं गोगावले यांनी सांगितलं...यंत्रणेने माझी आणि अनिल नवगणे दोघांचीही नार्कोटेस्ट करावी...या निवडणुकीनंतर अनिल नवगणेंचं पद जाणार असल्याने त्यांनीच हे षडयंत्र रचल्याचा आरोप विकास गोगावलेंनी केलाय...

  • नाशिकमध्ये महायुतीत नाराजी नाट्य सुरुच

    नाशिकमध्ये महायुतीत नाराजी नाट्य सुरुच आहे. नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच भाजपच्या अनिल जाधवांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महायुतीच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली होती. नाशिक जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असताना खासदारकीसाठी भाजपचा उमेदवार का नाही असा सवाल अनिल जाधवांनी केलाय. 

  • प्रचाराचा आज सुपर सॅटर्डे

    बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी मविआची सभा होणार आहे. शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव उपस्थित राहणारेत. सुप्रिया सुळेंची इथं सुनेत्रा पवारांशी लढत होतेय. अजित पवारांनी देखील बारामतीत प्रचाराचा धडाका लावलाय. त्यांच्या आज चार सभा होणारेत. डोर्लेवाडी, उंडवडी कडेपठार, लोणी भापकर आणि वडगाव निंबाळकर इथं सभा होणारेत. साता-याच्या वाईमध्येही ते उपस्थित राहणारेत. शरद पवारांची आज अकलूज आणि साता-यामध्येही सभा होतेय. तर सिंधुदुर्गात काका-पुतण्याची सभा असणारेय. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कणकवलीत तर विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सावंतवाडीत सभा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करमाळ्यात असतील. तर देवेंद्र फडणवीसांची साता-यात उदयनराजेंसाठी प्रचार सभा आहे. तर गडकरींची पंढरपूरमध्ये सभा होणारेय. 

  • महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा 11 वाजता वाई येथे होणार आहे

  • आज साताऱ्यात देंवेंद्र फडणवीसांच्या 2 सभा

    महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांची पाटण येथे 3 वाजता तर सातारा शहरातील तालीम संघावर 6 वाजता जाहीर सभा होणार आहे.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात काका पुतण्याच्या सभा

    कणकवलीत नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे सावंतवाडीत विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link