Maharashtra APMC Election Results LIVE Updates : अजित पवारांचा दबदबा! पुणे जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ
Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची निकाल हाती येत आहे. हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra APMC Election Results Updates : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सरशी तर 5 बाजार समित्या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. दिग्रस बाजार समितीवर मविआचं वर्चस्व, मंत्री संजय राठोडांना धक्का. तर पुण्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय.
Latest Updates
पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी कार्यक्षेत्र असलेल्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीने 18 जागांवर विजय संपादन करत बाजार समितीवर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्याने पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. शिंदे गटाच्या शिवसेनेचे गटनेते माजी राज्यमंत्री पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांना मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय. काँग्रेस राष्ट्रवादी ला 15 जागांवर विजय मिळालाय. काँग्रेस ने 13 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवला. भाजपने 3 जागा खेचून आणल्या. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. अशोक चव्हाणांनी या बाजार समितीसाठी पूर्ण वेळ देत व्युव्हरचना आखली होती. बी आर एस ने निवडणुकीत एंट्री घेत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. अखेर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी च्या पॅनल ने 15 जागा मिळवत बाजार समितीवर झेंडा फडकावला. भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले. नवख्या असलेल्या बी आर एस ला एकही जागा मिळाली नाही. विजयानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
वाशिम बाजार समितीवर काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, भाजपा,वंचित बहुजन आघाडी यांच्या शेतकरी विकास पॅनलची सत्ता स्थापन करणार असल्याचा निकाल समोर आला आहे. 18 पैकी 12 जागेवर विजय मिळवला आहे. तर, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जी प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी याच्या पॅनल 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवता आला असल्याने भाजप आमदार लखन मलिक व खासदार भावना गवळी याना धक्का मानला जात आहे.
Baramati APMC Election Results : बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत रयत पॅनल
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
कृषी पतसंस्था महिला सर्वसाधारण मतदार संघ
1) विनायक महादेव गावडे-1178
2) सतीश सर्जेराव जगताप-1143
3)रामचंद्र शामराव खलाटे-1153
4)बापूराव दौलतराव कोकरे-1166
5)दयाराम सदाशिव महाडिक-1148
6)सुनिल वसंतराव पवार -1131
7)दत्तात्रय शंकरराव तावरे-1116
08) शुभम प्रताप ठोंबरे 1210
09) सौ.शोभा विलास कदम- 1109
10) सौ.प्रतिभा दिलीप परकाळे-1229ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
11) विशाल ज्ञानदेव भोंडवे - 449
12) विश्वास तानाजी आटोळे -419
13) युवराज कैलास देवकाते -447
अनु.जाती / जमाती मतदार संघ
14) अरुण गणपत सकट -448
15) नितीन शंकर सरक 141अनुज्ञप्तीधारक व आडते
16) संतोष पांडुरंग आटोळे-204
17) मिलिंद अशोक सालपे-220Pandharpur APMC Election Results : पंढरपूर विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल
APMC संख्या - 4
भाजप - 3
राष्ट्रवादी काँग्रेस - 1मंगळवेढा - 18 जागा
भाजप - 18 ( आमदार समाधान आवताडे पॅनल)पंढरपूर - 18 जागा
भाजप - 18( माजी आमदार प्रशांत परिचारक पॅनल)
अकलूज - 18 जागा
भाजप - 17 जागा ( आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पॅनल)
राष्ट्रवादी काँग्रेस - 1कुर्डूवाडी - 18 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस. 18 ( आमदार बबनराव शिंदे पॅनल)थोरात यांचा दणदणीत विजय, विखे पाटील यांचा धुव्वा
Sangamner APMC Election Results : संगमनेर बाजार समितीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची सत्ता आली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाला खातेही उघडता आले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवल्या. प्रतिष्ठेच्या लढतीत थोरातांची सरशी झाली आहे. विखे पाटील यांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. संगमनेरातील जनता थोरातांच्या पाठिशी आहे. संगमनेर बाजार समितीवर थोरातांनी फडकवला झेंडा. संगमनेरात थोरातांच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष केला आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती भाजप-सेना-रिपाईचे वर्चस्व
Chalisgao APMC Election Results : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे, शिवसेना, रिपाई पुरस्कृत पॅनलची आघाडीचे वर्चस्व. कार्यकर्त्यांनीं फटाके फोडून गुलाल उधळत केला एकच जल्लोष केला. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वर्चस्व कायम होते. 18 पैकी 15 जागांवर भाजप शिवसेना पॅनलचा विजय झाला. आमदार मंगेश चव्हाण यांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी धरला ढोल ताशाचा तालावर ठेवा धरला. मंगेश चव्हाण समर्थकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
कर्जतमध्ये मोठी चुसर; रोहित पवार गट, राम शिंदेना समान जागा
Karjat APMC Election Results : अहमदनगरमधील कर्जत बाजार समिती निवडणुकीचा 18 जागेचा निकाल हाती आला आहे. याठिकाणी मोठी चुरस पाहाला मिळाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांना समान कौल मिळाला आहे. भाजप आमदार राम शिंदे गटाला 9 तर रोहित पवार यांच्या गटाला 9 जागा मिळाल्या आहेत.
अलिबाग बाजार समितीवर महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता
Raigad APMC Election Results : रायगड जिल्ह्यातील अलिबाग बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली असून सर्व 18 जागांवर मविआचे उमेदवार विजयी झालेत. 7 जागा यापूर्वीच मविआने बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित 11 जागांसाठी निवडणूक झाली होती. अलिबाग बाजार समितीत प्रवेश करण्याचा शिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न असफल
भुजबळ समर्थकांकडून येवल्यात फटाक्यांची आतिषबाजी
Yewla APMC Election Results : येवला बाजार समितीवर भुजबळ गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा झेंडा. 18 पैकी 13 जागेवर उमेदवार विजयी झालेत तर दराडे गटाच्या शेतकरी समर्थक पॅनलचा धुवा. अवघ्या तीन जागेवरच उमेदवार विजयी झाल्याने समाधान मानावे लागले. दोन जागेवर अपक्ष उमेदवार विजयी असून भुजबळ समर्थकांकडून येवल्यात फटाक्यांची आतिषबाजी गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला आहे.
बीडमध्ये 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात दंड थोपटले होते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड केले. या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय. मागील 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते. आता यावरूनच संदीप क्षीरसागर यांनी काकांना निवडणुकीमध्ये धोबीपछाड केले आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटासह काँग्रेसला धक्का
संपूर्ण राज्याचे रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकालाकडे लक्ष लागले असताना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी एकत्रित युती करत सहकार पॅनल उतरवलं होतं. मात्र त्यांना जोरदार धक्का देणारा निकाल समोर आला आहे. काँग्रेस मधून बाहेर पडलेले सचिन किरपान यांनी शेतकरी सहकार पॅनल मैदानात उतरवलं होतं. किरपान यांनी 14 जागेवर विजय मिळवला आहे. तर भाजपच्या शेतकरी विकास सहकार पॅनलने चार जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे केदार आणि आमदार जयस्वाल गटाला जोरदार धक्का मिळाला आहे. एकूण 18 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत दोघांच्याही पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही.
रोहित पवार यांनी मोठा धक्का
Karjat Ahmednagar APMC Election Results : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकालात भाजपच्या राम शिंदे यांची सरशी झाली आहे. 18 पैकी 11 जागेसाठी निकाल हाती आले असून भाजप आमदार राम शिंदे गटाला 7 तर
रोहित पवारांच्या गटाला 4 जागा मिळाल्या आहेत. भाजप आमदार राम शिंदे यांचा पॅनल आघाडीवरसांगलीमध्ये महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता
Sangli APMC Election Results : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली असून भाजपचा धुव्वा उडाला आहे. 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजयी झालाय. तर 1 जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी. भाजपाचे कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील ,माजी आमदार विलासराव जगताप यांची लागली होती प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माज, मंत्री विश्वजीत कदम काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती
Chhatrapati Sambhajinagar APMC Election Results : छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 18 जागांसाठी काल झाले तर आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरुवात झाली यात महाविकास आघाडीचे तीन तर भाजपचा एक व हमाल मापाडी मतदारसंघातून एक व व्यापारी मतदारसंघातून दोन असे सात जागेचे निकाल जाहीर झालेत. हमाल मापाडी तोलारी मतदारसंघातून देविदास कीर्तीशाहीहे विजयी ठरले तर व्यापारी मतदारसंघातून कन्हैयालाल जयस्वाल व निलेश सिठी हे विजयी ठरले.
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर बाजार समितीवर भाजप शिंदे गटाची सत्ता
15 पैकी 10 जागा भाजप शिंदे गटाला तर जागा महाविकास आघाडीला
विजयी उमेदवार - वैजापूर बाजार समितीवर भाजप-शिंदे गटाची सत्ता
1 अविनाश गलांडे (महाविकास आघाडी)
2 संजय निकम (महाविकास आघाडी)
3 ज्ञानेश्वर जगताप (महाविकास आघाडी)
4 अनिता वाणी (महाविकास आघाडी)
5 प्रशांत सदाफळ (महाविकास आघाडी)1 रामहरी बापू (भाजप-शिवसेना)
2 काकासाहेब पाटील (भाजप-शिवसेना)
3 कल्याण दागोडे (भाजप-शिवसेना)
4 कल्याण जगताप (भाजप-शिवसेना)
5 शिवकन्या पवार (भाजप-शिवसेना)
6 नजन रजनीकांत (भाजप-शिवसेना)
7 इंगळे गणेश पोपटराव (भाजप-शिवसेना)
8 पवार प्रवीण लक्ष्मण(भाजप-शिवसेना)
9 आहेर गोरख प्रल्हाद (भाजप-शिवसेना)
10 त्रिभुवन प्रशांत उत्तमराव (भाजप-शिवसेना)इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
Islampur APMC Election Results : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची पुन्हा एकहाती सत्ता. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार विजयी.विरोधी सर्वपक्षीय आघाडीला हमाल तोलाईदार गटातून मिळाली केवळ 1 जागा. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा बाजार समितीवर राखलं आपलं वर्चस्व.
पुणे बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला
Baramati APMC Election Results : बारामतीत राष्ट्रवादीने गड राखला, राष्ट्रवादीचे 17 उमेदवार आघाडीवर आहेत. पुरंदर नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत महविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दौंड मध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणबाजी दिसून येत आहे. राहुल कुल यांच्या समर्थकांनी केली घोषणाबाजी. आमदार राहुल कुल यांचे पॅनल आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष. इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे पॅनल आघाडीवर
नागपुरात महाविकास आघाडीला मोठा विजय
Nagpur APMC Election Results : नागपूर बाजार समिती निवडणुकीत मोठी चुसर पाहायला मिळाली आहे. पारशिवनी बाजार समिती निवडणुकीत सुनील केदार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. संपूर्ण 18 उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी झालेत. तर मांढळ बाजार समिती निवडणुकीत 18 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत. रामटेक बाजार समिती निवडणुकीत आमदार सुनील केदार आणि आमदार आशिष जयस्वाल गटाचा धुव्वा उडाला आहे. काँग्रेसचा तिसरा गट असलेल्या शेतकरी सहकारी पॅनलचे 14 उमेदवार तर भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेस गज्जू यादव यांच्या शेतकरी विकास सहकारी सहकारी पॅनलचे 4 उमेदवार विजयी झालेत.
पाथर्डी बाजार समिती निवडणुकीत भाजपची सरशी
Ahmednagar APMC Election Results : अहमदनगर पाथर्डी बाजार समिती निवडणुकीचा निकाल हाती, 18 पैकी नऊ जागांचा निकाल आहे. 18 पैकी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या गटाला 9 जागा तर पाथर्डी बाजार समितीत मोनिका राजळींच वर्चस्व दिसून येत आहे.
विजयकुमार गावित यांना मोठा धक्का
Nandurbar APMC Election Results : नंदुरबार बाजार समितीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का. डॉ. गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांच्या बाजार समितीत पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विक्रम वळवी यांनी प्रकाश गावित 84 मतांनी पराभव केला. प्रकाश गावित यांनी रिकॉर्डिंग मागणी केल्यानंतर देखील विक्रम वळवी यांच्या विजय झाला.
Ahmednagar Karjat APMC Election Results : पुणे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला ते सुरुवात झाली असून मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट शिवसेना विरुद्ध बंडखोर राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती
Ahmednagar Karjat APMC Election Results : अहमदनगर कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपचे राम शिंदे यांच्या पॅनलला सर्वसाधारण गटामध्ये आघाडी. भाजपच्या राम शिंदे गटाच्या 7 पैकी 5 जागा आघाडीवर तर राष्ट्रवादीच्या रोहित पवार गटाच्या 2 जागा आघाडीवर
चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल
Chandrapur Chimur APMC Election Results : चंद्रपूरमधील चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. 18 पैकी भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास पॅनलला 17 जागा तर काँग्रेस समर्थित महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलला एक जागा मिळाली. भाजप आमदार बंटी भांगडिया यांचा मोठा विजय झालाय.
Amgaon APMC Election Results : आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप, राष्ट्रवादीचा विजय झाला. 18 पैकी भाजप, राष्ट्रवादी 12 जगात विजय आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वर भाजप राष्ट्रवादीचे कब्जा केला आहे.
गोंदिया
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा
बिनविरोध -
भाजप - राष्ट्रवादी - 1
काँग्रेस - चाबी - 6
इतर - 1अर्जुनी मोरगाव
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा
बिनविरोध -
भाजप - 9
महाविकास आघाडी - 4आमगाव
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा
बिनविरोध -
भाजप - राष्ट्रवादी - 12
काँग्रेस - 05तिरोडा
निवडणूक निकाल जाहीर - 18 जागा
बिनविरोध -
भाजप - 4
महाविकास आघाडी - 1केज निवडणुकी मुंदडा-आडसकर गटाला यश
Beed APMC Election Results : बीड केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी मुंदडा-आडसकर गटाला यश. केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात. ग्रामपंचायत मतदार संघातील 4 पैकी 4 जागा बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे तर केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 14 जागा मुंदडा-आडसकर गटाचे सर्व उमेदवार विजयी.
Ramtek APMC Election Results : रामटेक भाजप प्रणित शेतकरी विकास सहकार पॅनल 4 जागांवर विजयी. शेतकरी सहकार पॅनल 7 जागांवर विजयी. सुनील केदार आणि आशिष जयस्वाल यांच्या सहकार पॅनल एकही जागा मिळालेली नाही.
गोंदिया आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल
Gondia Mango APMC Election Results : आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि राष्ट्रवादी कॉगेस पक्ष युतीत लढले असून या ठिकाणी भाजपचे 5 उमेदवार तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे 4 भारतीय कॉग्रेस चा 1 असे एकूण 18 पैकी 10 निकाल आता पर्यंत हाती आले असून यात आमगाव कृषी उत्पन्न बजार समितीत भाजप जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर हे स्वतः या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल
Chandwad APMC Election Results : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था भटक्या जमाती प्रवर्गात लोकमान्य परीवर्तन पॅनलचे विक्रम मार्कंड हे 515 मते मिळवून विजयी. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी संस्था महिला राखीव गटात लोकमान्य परीवर्तन पॅनलचे वैशाली जाधव व मिना शिरसाठ विजयी तर ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात शेतकरी विकास पॅनलचे वाल्मिक वानखेडे विजयी
Pandharpur APMC Election Results : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणीमध्ये विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनलचे वर्चस्व. सोसायटी मतदारसंघात 10 जागेवर परिचारक पॅनलचे उमेदवार विजयी. अद्याप तीन जागांची मतमोजणी सुरु । 18 जागा पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या 13 जागा साठी आज मत मोजणी सुरु आहे. 13 पैकी 10 जागेवर भाजप माजी आमदार परिचारक पॅनल विजयी
Sangli APMC Election Results : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती 18 जागांचे निकाल. 18 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडी तर 1 अपक्ष उमेदवार विजयी.
Pimpalgaon Nashik APMC Election Results : नाशिकमधील पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलने खाते उघडले. शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या परिवर्तन विकास पॅनेलची सध्या पीछेहाट हमाल गटातून 1 - नारायण काशिनाथ पोटे 211मतांनी विजयी, मापारी गटातून 2 - सोहन भंडारी 429 मतांनी विजयी, शंकरलाल ठक्कर यांचा विजय निश्चित तर अपक्ष यतीन रावसाहेब कदम हे सातव्या फेरीत आघाडीवर
Nashik APMC Election Results : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या अनुसूचित जाती जमाती गटातून भास्कर गावित 361 मतांनी विजयी झालेत. माजी खासदार देविदास पिंगळे गटाच्या आपलं पॅनलने पहिले खाते उघडले. शिवाजी चुंबळे गटाच्या शेतकरी पॅनलच्या यमुना जाधव यांचा केला पराभव तर अपक्ष उमेदवार आणि बाद मतांची संख्या मोठ्या प्रमाणात
पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, राष्ट्रवादीचे वर्चस्व
Beed APMC Election Results : बीड जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीचे 18 पैकी 18 सदस्य निवडून आले आहेत. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडाला आहे. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने वडवणी बाजार समितीवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
Yeola APMC Election Results : येवला बाजार समितीचा व्यापारी गटाचा निकाल हाती आला आहे. छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनलचा व्यापारी गटातील नंदकिशोर शिवनारायण अट्टल यांचा विजय झाला. 301 मते मिळवत विजयी झालेत तसेच अपक्ष उमेदवार भरत समदडिया विजयी झाले असून त्यांना 250 मते मिळाली आहेत.
Dharashiv APMC Election Results : धाराशिव जिल्ह्यातील भूम कृषी उत्पन्न बाजार समिती निकालात भाजप-शिवसेना युतीची आघाडी. एकूण जागा 18 पैकी 7 जागेचा निकाल घोषित. युतीला 6 जागा तप महाविकास आघाडी एका जागेवर विजयी
अमरावती-भातकुली बाजार समिती निवडणूक निकालाची उत्सुकता
Amravati-Bhatkuli APMC Election Results 2023 : अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजनीला सुरुवात झाली आहे. 9 टेबलवर मतमोजणीला सुरुवात व्हिएमव्ही कॉलेजमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेय. 18 जागेसाठी मतमोजणी सुरु आहे. नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती बाजार समिती आहे. आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. आमदार रवी राणा यांचे बंधु सुनील राणा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आमदार रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीची बाजी
Yavatmal APMC Election Results 2023 : यवतमाळ जिल्ह्यातील एपीएमसी निकाल.
यवतमाळ - महाविकास आघाडी
दिग्रस - महाविकास आघाडी
पुसद - महाविकास आघाडी
बाभूळगाव - महाविकास आघाडी
वणी - भाजप -शिवसेना युती
महागाव - भाजप -शिसेना युती
नेर - शिवसेना (शिंदे गट)संजय राठोड यांच्या पॅनलचा निसटता विजय
Yavatmal Ner APMC Election Results 2023 : यवतमाळ नेर कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेकडे (शिंदे गट) गेली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेला - 10 जागा तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळाल्या आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांच्या पॅनलचा निसटता विजय झाला आहे.
Bhandara Gondia APMC Election Results 2023 : भंडारा गोंदिया जिल्ह्यात आज सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात भंडारा, लाखनी, तर गोंदिया जिल्हयात गोंदिया, तिरोडा, आमगाव, अर्जुनी मोरगाव या बाजार समितीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
1 ) भंडारा - काँग्रेसची सत्ता
2) लाखनी - भाजपा राष्ट्रवादी युती1) गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस
2) तिरोडा - भाजप
3) अर्जुनी मोरगाव - भाजपNandurbar APMC Election Results 2023 : नंदुरबार जिल्ह्यातील तीन बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतपेट्या मतमोजणी कक्षाकडे करण्यात आल्या आहेत. नंदुरबार आणि शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
लातूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची आघाडी
Latur APMC Election Results 2023 : लातूर जिल्ह्यातील चार बाजार समित्यांपैकी दोन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. लातूर आणि उदगीरवर मविआने आघाडी घेतलीय. तर चाकूर आणि औसामध्ये भाजपनं मविआला धक्का देत दोन्ही बाजार समित्या ताब्यात घेतल्यात. याठिकाणी आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली होती.
6 बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात
Maharashtra APMC Election Results 2023 : भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 6 बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गोंदिया जिल्ह्यात 4 तर भंडारा जिल्ह्यात 2 बाजार समितीची निवडणूक पार पडली. भंडाऱ्यातून नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली. त्यांना रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गटानं एकत्र पॅनल उभारलंय. तर काँग्रेस स्वबळावर लढत आहे. निवडणुकीत कोण बाजी मारेल हे मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठे यश
Maharashtra APMC Election Results 2023 : अमरावती जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडी मिळवलीय. तिवसा बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात 18 पैकी 18 उमेदवार निवडून आलेत. चांदूर रेल्वेत 18 पैकी 17 उमेदवार निवडून आलेत. या ठिकाणी भाजपला एका ठिकाणी समाधान मानावे लागले. मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पॅनलचा पराभव झालाय. इथं मविआचे 10 उमेदवार विजयी झालेत. नांदगाव खंडेश्वरमध्ये अपक्ष अभिजित ढेपे यांच्या गटाचे 18 पैकी 11 उमेदवार निवडून आलेत. अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेसनं विजय मिळवलाय...((असून 18 पैकी 17 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत. तर 1 जागेवर भाजपला समाधान मानावे लागले. इथं भाजप, शिंदे गट, प्रहार पॅनलचा पराभव झाला. भातकुली बाजर समितीचा निकाल येणार असून यामध्ये आमदार रवी राणा यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.))
काँग्रेसला मोठे यश, 18 पैकी 18 जागांवर विजय
Maharashtra APMC Election Results 2023 : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसनं 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवलाय. काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी भाजप, शिवसेना दोन्ही गट, भाजपला धोबीपछाड दिला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी भोरमध्ये मोठा जल्लोष साजरा केला.
Maharashtra APMC Election Results Updates : राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी काल निवडणूक झाली आहे. तर 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. राज्यात काल 147 बाजार समित्यांची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे. ( APMC Elections News)
बाजार समितीच्या निवडणूक निकालात सुरुवातीला 9 ठिकाणी महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. तर, 4 बाजार समित्या भाजप-सेना युतीच्या ताब्यात आल्या आहेत. एक बाजार समिती इतरांच्या ताब्यात गेली आहे. 147 पैकी 14 बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहे. दिग्रसमध्ये मंत्री संजय राठोडांना धक्का बसलाय तिथं मविआची सत्ता आलीय. यवतमाळ, लातूर, तिवसा, पुसद, भोर, सिन्नरमध्ये मविआची विजयी झालीय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मंगळवेढा, यवतमाळ जिल्ह्यातील महागाव या बाजार समित्या भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत.
यवतमाळच्या बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे माजी मंत्री आमदार अशोक उईके यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांना फक्त 4 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीने माजी मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट युतीने आपला गड कायम ठेवला आहे. तब्बल अकरा जागा जिंकित महाविकास आघाडीने भाजप शिवसेना युतीला धोबीपछाड दिला आहे. भाजपचे माजी मंत्री मदन येरावार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात युतीने मविआ पुढे सर्व शक्ती पणाला लावून आव्हान उभे केले होते. परंतु भाजप शिवसेना युतीला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले. तर तीन जागावर अपक्षांनी विजय मिळविला.