Maharashtra Breaking News Today LIVE Updates: उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढली

तेजश्री गायकवाड Fri, 01 Nov 2024-12:35 pm,

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.

Latest Updates

  • उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढली

    राज्याचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षितेत फोर्स वनचे सहा कमांडो  (गन घेऊन) आणि प्रोटेक्शन टीम (CPT) जोडली गेली आहे. 

  • राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय बनसोडे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय बनसोडे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले होते. फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी संजय बनसोडे सुमारे एक तास होते. उदगीर मध्ये महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाजप बंडखोर विश्वजित गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  महायुतीतील बंडखोर उमेदवारांना महायुतीतील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशात संजय बनसोडे हे नागपूरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले होते. 

     

  • बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रचाराचा धडाका

    Ajit Pawar: बारामतीमधून विधानसभेचा अर्ज भरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून प्रचार सुरु करणारा आहेत. आज ते बारामतीमध्ये 9 गावांना भेट देणार आहे. उमेदवारांसंदर्भात 4 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होईल अशी माहिती अजित पवारांची दिली. 

     

  • ऐन दिवाळीत नवी मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हची घटना 

     

    ऐन दिवाळीत नवी मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे.  सानपाडा यथे रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.  दारुच्या नशेत एका कार चालकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या तघांना उडवलं. या दुर्गटनेत तिघे जखमी झाले आहे. दारुच्या नशेमुळे कारचालकाला गर्दीचा अंदाज आला नाही. दरम्यान नागरिकांनी या कारचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link