Maharashtra Breaking News LIVE Updates: धनंजय महाडिकांविरोधात काँग्रेसच्या महिलांची तक्रार

Sun, 10 Nov 2024-8:37 pm,

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

Latest Updates

  • बोरीवलीनंतर राज ठाकरेंची माहिममध्ये सभा 

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज बोरिवली, वर्सोवा आणि माहीम मध्ये सभा पार पडणार आहेत. मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा पार पडणार आहेत. मात्र आज सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे माहीम इथल्या सभेकडे या सभेमध्ये राज ठाकरे काय भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण माहीम मधून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहीमची ही लढत चुरशीची आहे. कारण माहीम मध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पार पडणार आहे. 

  • धनंजय महाडिकांविरोधात काँग्रेसच्या महिलांची तक्रार 

    खासदार धनंजय महाडिक यांना लाडक्या बहिणीं संदर्भात केलेले वक्तव्य भोंवण्याची  शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसच्या महिलांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.यापूर्वी निवडणूक आयोगाकडून देखील महाडिक यांना बजावली होती नोटीस.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : मनसे भाजपची बी टीम : आदित्य ठाकरे

    मनसे ही भाजपची बी टीम आहे.  तुम्ही भाजपच्या बी टीमला मतदान करणार का? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भाजपचे लोक गुजरातच्या लोकांसाठी काम करतात : आदित्य ठाकरे

    मी कधी भाजपवर वैयक्तिक बोललो नाही. पण आम्ही आमच्या स्वत: साठी लढत आहोत. आमच्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत. त्याच ठिकाणी भाजपचे लोक गुजरातच्या लोकांसाठी काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

  • धनंजय महाडिक यांना निवडणूक विभागाकडून नोटीस 

    विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता 15 ऑक्टोंबर, 2024 पासून लागू झालेली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - 2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.

  • विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

    विक्रोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडलेल्या आहेत. या विटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत. करोडोंमध्ये यांची किंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतुन ठेवण्यासाठी नेल्या जात होत्या. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : 'फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात'

    देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं भाकित राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात केलंय.. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाची चांगली जाण असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून मनसे किंगमेकर असणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.. 

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : घराणेशाहीवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला 

    शरद पवारांनी सुप्रिया सुळेंऐवजी अजित पवारांना नेता केलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसता.. तसंच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना संधी दिली असती तर शिवसेना फुटली नसती अशी प्रतिक्रीया अमित शाह यांनी दिलीये.. मुंबईत अमित शाह यांच्या हस्ते भाजपच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं.. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतत्यांनी घराणेशाहीवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. 

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेल्या चिखलाचं कारण उद्धव ठाकरेच 

    महाराष्ट्राच्या राजकारणात आज झालेल्या चिखलाचं कारण उद्धव ठाकरेच असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय...झी 24 तासच्या टू द पॉइंट या खास मुलाखतीत राज ठाकरेंनी हा आरोप केलाय...

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणार, काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर

    महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु करणार. शिवाय लाडक्या बहिणीला महिन्याला 3 हजार रुपये देणार आहे, अशी घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करण्यात आलीय.  25 लाखांची विमा कवच देणार आणि मोफत औषधं देणार, अशी घोषणाही मल्लिकार्जून खरगे यांनी केली. 

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : वृद्धांसाठीच्या पेन्शनमध्ये वाढ, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध 

    प्रत्येक गरीबांना अन्न व निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्ध पेन्शन योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार आहोत. आम्हीच ते 1500 रुपये केले होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासाठी मार्केट इंटरवेन्शन करणार आहोत. महाराष्ट्रात २५ लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. त्यासोबत 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून लाभ देऊ. सरकार स्थापनेच्या 100 दिवसात व्हिजन डॉक्यूमेंट तयार करू. मेक इन महाराष्ट्राचं धोरण प्रभावीपणे राबवू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध 

    आजचं संकल्पपत्रात अनेक गोष्टी आहेत. ज्या २५ गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील 10 मुद्दे जो आम्ही महायुतीचा दहाकलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध 

    भाजपच्या नेतृत्वाखाली राज्याची वेगाने वाढ होत आहे. दरडोई उत्पन्न वाढत आहे. महाविकास आघाडीच्या काळात दरडोई उत्पन्न 6 हजार रुपयांनी कमी झाले होते. पायाभूत सुविधांमध्ये डबल इंजिन सरकारमुळे झपाट्याने वाढ झाली. 10 वर्षांत 13 हजार 60 किलोमीटरहून अधिक वाढ झाली आहे. 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे भाजपचे संकल्प पत्र महत्त्वाचे आहे. हे संकल्पपत्र म्हणजे अलमारीत बंद करण्याचे डॉक्युमेंट नाही. तर अंमलबजावणी करण्याचे डॉक्युमेंट आहे. त्यासाठी एक अंमलबजावणी समिती नेमली असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी 

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पत्रकार परिषद घेत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार तसेच भाजपचे इतर दिग्गज नेते उपस्थित आहेत.

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : प्रचार सभा घेण्यासाठी ठाकरे बंधू आमने-सामने 

    मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शेवटची प्रचार सभा घेण्यासाठी ठाकरे बंधू आमने-सामने आलेत. 17 नोव्हेंबरला शिवाजीपार्कमध्ये शेवटची प्रचार सभा घेता यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं अर्ज केला होता. मात्र सुरुवातीला या दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली होती. वर्षाला 45 दिवस मैदान वापरण्याची मर्यादा संपल्याने ही परवानगी नाकारण्यात आली होती. आज शिवसेनेला शिवाजी पार्कात सभा घेण्याची परवानगी देण्यात आलीये.मात्र आज शिवसेनेची शिवाजी पार्कात सभा होण्याची चिन्ह कमी असल्याने आजचा एक दिवस बाद होऊ शकतो. आणि त्यामुळेच मनसे आणि शिवसेना UBT पैकी एकाला परवानगी मिळू शकतेय. या दोन्ही पक्षांचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : रामराजेंवर अजित पवारांचं टीकास्त्र

    अजित पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांचा चांगलाच समाचार घेतलाय.. तुम्ही श्रीमंत राजे आहात.. त्यामुळे बंद दाराआड चर्चा कशी करता असा चिमटा अजित पवारांनी साताऱ्यातील सभेतून रामराजेंना काढलाय.. तसेच रामराजे तुम्ही दीपक चव्हाण यांचा उघड उघड प्रचार करा मग बघतो तुम्ही आमदार कसे राहता. असा थेट इशाराच अजित पवारांनी भरसभेतून दिलाय.. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : मनसे भाजपची बी टीम-आदित्य ठाकरे

    मनसे भाजपची बी टीम, असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी शिवडीच्या सभेत साधला. भाजपच्या बी टीमला मतदान करणार का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी जनतेला विचारला. एकनाथ शिंदेंना मतदान करणार का?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.  

     

  • ...बारामती, मढा मतदारसंघात आमची वाट लागली- अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : लोकसभेत फेक नरेटिव्हमुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केलं.. त्यामुळे बारामती, माढा मतदारसंघात आमची वाट लागली... साता-यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला असं वक्तव्य अजित पवारंनी जाहीर सभेत केलंय.. फलटण येथील साखरवाडीच्या सभेत ते बोलत होते.. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक

    भाजप खासदार धनंजय महाडिकांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेस नेते सतेज पाटलांनाही त्यांच्यावर टीका केलीये. धनंजय महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे त्यामुळेच त्यांनी महिलांचा अपमान केला.  भाजपच्या खासदाराच्या या विधानावरून त्यांचा खरा चेहरा समोर आला, असं पाटील म्हणालेत. तर काँग्रेसचे नेते फेक नरेटीव्ह पसरवत आहेत, असा आरोप धनंजय महाडिकांनी केलाय.
    लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणा-या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, असं वादग्रस्त विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी केलं होतं.

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : खडकवासलात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका 

    खडकवासलात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होणार आहे. 13 तारखेला मयुरेश वांजळेंसाठी राज ठाकरेंची सभा असणार आहे. सचिन दोडकेंसाठी शरद पवारांची 14 तारखेला तर 15 तारखेला भीमराव तापकीरांसाठी फडणवीसांची खडकवासलात सभा होणार आहे. 

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात आजही प्रचाराचा धुरळा 

    राज्यात आजही प्रचाराचा धुरळा उडणारेय. अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्र दौ-यावर आहेत. बुलढाण्यातील मलकापूर, मोर्शीमध्ये त्यांची सभा होणारेय. तर जळगावच्या फैजपूरमध्येही ते प्रचार सभा घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस धामणगावमध्ये प्रताप अडसड यांच्या प्रचारार्थ सभा घेणारेत. शरद पवार आज राहुल मोटेंसाठी परंडा आणि राजेश टोपेंसाठी घनसावंगीमध्ये सभा घेणारेत. उद्धव ठाकरेंची तोफ आज सांगोल्यात धडाडणारेय. दीपक साळुंखेंसाठी प्रचार सभा होणार आहे. नितीन गडकरीही आज उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरणारेत. उमरखेड, राळेगाव आणि यवतमाळच्या अकोलाबाजार अशा तीन ठिकाणी ते सभा घेतील. वंचितचे प्रकाश आंबेडकर आज लातूर, धाराशिवमध्ये सभा घेणार आहेत. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link