Maharashtra Breaking News LIVE Updates: महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

नेहा चौधरी Sun, 03 Nov 2024-8:02 pm,

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर

Latest Updates

  • आचारसंहितेचा भंग? तुकाराम काते यांच्याकडून महिलांना साडीवाटप

    चेंबूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम काते यांच्याकडून महिला मतदारांना साडीवाटप केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून केला जात आहे. ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून कारवाईची मागणी देखील करणार आहेत. 

  • महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

    मंगळवारी कोल्हापुरात महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महत्त्वाचे नेते सभेला उपस्थित असणार

  • मनोज जरांगे यांची उमेदवारांसोबतच पुन्हा बैठक सुरू

    मनोज जरांगे आज राज्यातील मतदार संघ आणि त्या मतदार संघातील उमेदवारांची घोषणा करणार आहेत. या अनुषंगाने जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उमेदवारांची बैठक  बोलावली होती. परंतु ही बैठक काही वेळ थांबवण्यात आली. आता पुन्हा या बैठकीला सुरुवात झाली आहे.

  • कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला, नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी 

    कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रातून मागणी 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे 

    कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

  • श्रीनगरच्या  लाल चौकात हँड ग्रेनेडचा स्फोट, 6 जण जखमी 

    जम्मू काश्मीरच्या श्रीनगर परिसरातील लाल चौकात हँड ग्रेनेडचा स्फोट झाला आहे. ज्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून स्फोटाची चौकशी सुरु आहे. 

  • फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

    - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 

    - बंडखोरांना शांत करण्याचा महायुतीचा प्रयत्न

  • जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक

    जितेंद्र आव्हाडांनी भाजप आणि संघावर केलेल्या टीकेनंतर भाजप नेतेही आक्रमक झालेत. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रसाद लाड यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर दिलंय. जितेंद्र आव्हाडांनी विष पिलं आहे. त्यामुळे ते विषारी झालेत असा हल्लाबोल बावनकुळेंनी केलाय. तर आव्हाड भाजपचा द्वेष करणारे नेते आहेत. जनता त्यांना धडा शिकवणार, असं उत्तर प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलं आहे. 

  • बीड जिल्ह्यातून केज मतदार संघ जरांगे लढणार

     मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण आंदोलकांचे उमेदवार देखील जाहीर केले आहेत. 

  • 14 नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर मोदींची जाहीर सभा

    - विधानसभा निवडणुकीसाठी मोदी महाराष्ट्रात

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत जाहीर सभा

    - विधानसभेच्या प्रचारासाठी 14 नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर मोदींची जाहीर सभा

    - पंतप्रधान मोदी कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष

  • मनोज जरांगे मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे जाहीर करणार 

    मनोज जरांगेंनी आज अंतरवाली सराटीत इच्छूक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत जरांगे उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत.या बैठकीनंतर जरांगे राज्यातले मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. यामुळे आज जरांगे कोणत्या मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, दरम्यान, राज्यातील राखीव मतदार संघातील उमेदवारांबरोबरच मुस्लिम उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा करण्याची शक्यता आहे..

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : अंतरवाली सराटीत आज महत्वाची बैठक

    मनोज जरांगेंनी आज अंतरवाली सराटी येथे इच्छूक उमेदवारांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत जरांगे उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत.या बैठकीनंतर जरांगे राज्यातील मतदार संघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. यामुळे आज जरांगे कोणत्या मतदार संघातून त्यांचे उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरवतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, दरम्यान राज्यातील राखीव मतदार संघातील उमेदवारांबरोबरच मुस्लिम उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा करण्याची शक्यता आहे..

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : बंडोबांना थंड करण्यासाठी शरद पवार आज इंदापुरात

    इंदापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी आता खुद्द शरद पवार मैदानात उतरलेत. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी वरुन नाराज झालेल्या काही नेत्यांच्या शरद पवार आज ते गुप्त बैठका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. भरत शहा,आप्पासाहेब जगदाळे यांसह प्रविण माने यांची नाराजी अद्याप दूर झाली नाही. विशेष म्हणजे प्रविण माने यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केलीय. त्यामुळे पवार आज कोणाकोणला भेटणार आणि हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग सुखर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : रायगडमध्ये महाविकास आघाडीतील तिढा कायम

    रायगडमध्ये महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. एकीकडे शेकाप आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तडजोड सुरू आहे. त्यात आता काँग्रेस बंडखोरांना थोपवण्याचंही आव्हान शेकापसमोर आहे. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकुर यांनी अलिबाग आण श्रीवर्धनमधून आपला उमेदवारी अर्ज भरलाय. अलिबागमधून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शेकापकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. शेकाप नेते जयंत पाटील आणि अलिबागच्या शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी राजेंद्र ठाकुरांशी चर्चा केली. मात्र कार्यकर्त्यांनी विचारूनच पुढील निर्णय घेणार असल्याचं राजेंद्र ठाकुरांनी सांगितलंय.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज ठाकरे 6 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ 6 नोव्हेंबरला सोलापुरात धडाडणार आहे..  सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर मध्यच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत.. सोलापुरातील भंडारी मैदानावर राज ठाकरेंची ही  सभा होणार आहे... तर  सोलापूर ग्रामीण मधील उमेदवारांसाठी ते मंगळवेढ्यात दुसरी सभा घेणार आहेत..  या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे  सा-यांचं लक्ष लागलंय. 

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : सोमवारपासून मनसे रणशिंग फुंकणार 

    मनसेच्या प्रचाराला सोमवारपासून सुरुवात होणारेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीत प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिलीय. डोंबिवलीच्या पी अँड टी चौकात प्रचार सभा होणारेय.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : विधानसभा रणधुमाळी, सोलापूरमधून उद्धव ठाकरेंचा प्रचार सभेचा धडका 

    आज भाऊबीजनंतर दिवाळीचा सण संपतोय, त्यानंतर सर्व पक्षाचे नेते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागतायेत. 10 नोव्हेंबरला सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा घेणार आहे. सांगोला आणि दक्षिण सोलापूरमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. अमर पाटील दक्षिण सोलापूरचे मविआचे उमेदवार तर  सांगोल्यात दीपक साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेय. 

     

  • Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावट 

    महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावट ओढावलंय.. पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वा-यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.. कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे... दरम्यान ढगाळ वातावरणामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे, मात्र लवकरच थंडी परतणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

  • Breaking News Today LIVE Updates : योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अज्ञात नंबरवरुन धमकीचा मेसेज आलाय.. या मेसेजमध्ये योगी यांनी 10 दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना बाबा सिद्धीकींसारखे मारु असं म्हटलंय. शनिवारी संध्याकाळी आलेल्या या धमकीच्या मेसेजमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालीये. पोलीस या धमकी देणा-या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link