Maharashtra Breaking News : मनसेची पाचवी यादी जाहीर, 15 जणांना उमेदवारी

नेहा चौधरी Sat, 26 Oct 2024-8:41 pm,

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.

Latest Updates

  •  Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते आक्रमक, शाखेबाहेर शिवसैनिकांची गर्दी

    शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या शाखेबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.  सदा सरवणकर यांनी माघार घेवून महायुतीचा पाठिंबा मनसेच्या अमित ठाकरेंना देण्याची चर्चा सुरु झाल्याने सरवणकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : मनसेची पाचवी यादी जाहीर, 15 जणांना उमेदवारी

    आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये 15 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

  •  Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल नवाब मलिक यांच्य भेटीला

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे नवाब मलिक यांच्या भेटीला गेले आहेत. मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघाबाबत होणार चर्चा होण्याची शक्यता. 

  •  Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी निश्चित

    अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या चंद्रपूर येथे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. किशोर जोरगेवार यांना भाजपची उमेदवारी आणि पक्षप्रवेश देण्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता तीव्र विरोध. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भाजपची दुसरी यादी जाहीर, दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा 

    विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जतमधून गोपीचंद पडळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आशिष शेलार प्रस्ताव ठेवणार

    अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आशिष शेलार प्रस्ताव ठेवणार... सदा सरवणकारंच्या उमेदवारीला विरोध नाही मात्र अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का शेलारांचा सवाल

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : वसंतराव देशमुखांच्या विधानाची चौकशी सुरु

    वसंतराव देशमुख यांच्या विधानाची चौकशीला सुरुवात झाली आहे. तातडीनं कारवाई करण्याची महिला आयोगाचे आदेश. रुपाली चाकणकर यांची माहिती. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटला

    शिवसेना ठाकरे गट दर्यापूर विधानसभा मतदारसंघ लढणार. गजानन लवटे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : तिकीट न मिळाल्याने नाशिकमधील काँग्रेस पदाधिकारी नाराज

    नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला तिकीट न मिळाल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज. दुसऱ्या यादीमध्ये देखील नाव न आल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. आज दुपारी देणार राजीनामा. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : तिकीट न मिळाल्याने नाशिकमधील काँग्रेस पदाधिकारी नाराज

    नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला तिकीट न मिळाल्याने काँग्रेस पदाधिकारी नाराज. दुसऱ्या यादीमध्ये देखील नाव न आल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. आज दुपारी देणार राजीनामा. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : बच्चू कडूंना भाजपचा धक्का

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना भाजपचा जोरदार धक्का. प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे करणार भाजपमध्ये प्रवेश, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते संजय कुटे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : सायन मतदार संघावरुन काँग्रेसमध्ये नाराजी

    विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून 23 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र सायन मतदार संघावरुन काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसकडून गणेश यादव यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे उमेदवारी न मिळाल्यानं रवी राजा नाराज झाले आहेत. रवी राजा काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत आहे. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर 

    विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. 

    पाहा काँग्रेसची संपूर्ण यादी - Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधी

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : 'भाजपचे तिकीट हवे असेल तर 50 लाख द्या'

    उमेदवारीसाठी नाशिकच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे 50 लाखांची मागणी करण्यात आलीय.. पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असल्याचं सांगत फरांदे यांना उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आलीय...तसेच भाजपकडून इच्छुक असलेल्या तीन नेत्यांनाही उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आलीय.. पैसे मागणाऱ्या दोघा तोतयांना नाशिक पोलिसांनी अटक केलीय..नाशिक पोलिसांनी दोघांना दिल्लीतून अटक केलीय... दोघा आरोपांनी 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलीय.. भामट्यांनी नगर, डोंबिवली, कल्याण आणि पुण्यातही 6 जणांना फोन करून उमेदवारीसाठी पैशांची मागणी केल्याचं तपासात उघड झालंय.. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : शिवसेना UBT उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

    विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना UBT उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. दुसऱ्या यादीत 15 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीय आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना शिवडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मतदारसंघनिहाय उमेदवार 

    धुळे शहर- अनिल गोटे, 
    चोपडा (अज)- राजू तडवी, 
    जळगाव शहर- जयश्री सुनौल महाजन, 
    बुलढाणा- जयश्री शेळके, 
    दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, 
    हिंगोली- रूपाली राजेश पाटील, 
    परतूर- आसाराम बोराडे, 
    देवळाली (अजा) योगेश घोलप, 
    कल्याण पश्चिम-सचिन बासरे, 
    कल्याण पूर्व - धनंजय बोडारे, 
    वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव, 
    शिवडी- अजय चौधरी, 
    भायखळा- मनोज जामसुतकर, 
    श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे, 
    कणकवली- संदेश भास्कर पारकर

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : पालघर विधानसभेवरुन मविआमध्ये बिघाडी

    पालघर विधानसभेवरून मविआमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतय... मविआकडून ठाकरेंच्या शिवसेनेनं  पालघर विधानसभेसाठीचा उमेदवार जाहीर केला... यावेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर होताच,  काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष मनोहर दांडेकरांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला.... पालघर जागेवर  शिवसेनेच्या दिलेल्या उमेदवारा बाबत मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ही झालीय....त्यामुळे काँग्रेसकडून बंडखोरी करण्यात येईल का ? असा प्रश्न उपस्थित झालाय..

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : आघाडीमुळे जागावाटपात घोळ- नाना पटोले

    आघाडीमुळे जागावाटपात घोळ झाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. मेरिटनुसार काँग्रेसला कमी जागा मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय.. मित्रपक्षांनाही योग्य वाटा मिळावा यासाठी समान जागांचं सूत्र काढल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.. 

     

  • विखे - थोरात वाद विकोपाला 

    सुजय विखेंच्या सभेत बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलंय. वसंतराव देशमुख यांनी जयश्री यांच्याबाबत जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यामुळे सभास्थळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय.. एकीकडे सभा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या दिल्याचं पाहायला मिळालंय. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलीय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात त्यांची सभा पार पडली. त्या सभेत देशमुखांनी जयश्री यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलंय तर या  आक्षेपार्ह विधानाचे जोरदार  पडसाद  परिसरात उमटलेय.. अज्ञाताकडून गाडीची तोडफोड करण्यात आलीय.. तर अकोले नाका परिसरात गाडीही पेटवण्यात आलीय..   त्यामुळे संगमनेरमधील विखे पाटील आणि थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालंय.. 

  • कोल्हापूरमधील करवीरमध्ये महायुतीत बंडखोरी

    विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील करवीरमध्ये महायुतीत बंडखोरी पाहिला मिळतेय. मित्रपक्ष जनसुराज्य पक्षाने करवीरमधून उमेदवार दिला आहे.  संताजी घोरपडेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे. करवीरमधून शिवसेनेचे चंद्रदीप नरके मैदानात आहेत. संताजी घोरपडेंनी विनय कोरेंच्या उपस्थितीत भरला अर्ज भरलाय. 

     

  • कोल्हापुरात आराम बसला आग, एका प्रवाशाचा मृत्यू

    कोल्हापुरात आराम बसला आग लागली त्यात एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झालाय. तर 6 प्रवाशांचा जीव बचावलाय. पुणे बेंगलोर महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ ही दुर्घटना घडली. बेळगावहून पुण्याला निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली आहे. गोकुळ शिरगाव जवळ बस येताच अचानक इंजिनमध्ये आग लागली.

  • कल्याण पूर्वमधून शिवसेना UBTकडून धनंजय बोडारेंना उमेदवारी

    कल्याण पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून धनंजय बोडारेंना उमेदवारी देण्यात आलीय. धनंजय बोडारेंना कल्याण पूर्वमधून एबी फॉर्म देण्यात आलाय. कल्याण पूर्वमध्ये भाजपकडून सुलभा गायकवाडांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता कल्याणपूर्वमध्ये बोडारे विरुद्ध सुलभा गायकवाड सामना रंगणार आहे. 

     

  • चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले 

    बोइंगच्या अवकाशायानामध्ये अडकलेले 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.... मात्र यामध्ये सुनिता विल्यम्स यांचा समावेश नाहीये.... 'नासा'चे मॅथ्यू डॉमिनिक, मिखाईल बॅरंट आणि जेनेट एप्स आणि रशियाचे अलेक्झांडर ग्रेबेन्किन अशी पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीरांची नावं आहेत... या चौघांना घेऊन येणा-या यानाने समुद्रात फ्लोरिडाच्या किना-याजवळ यशस्वी लँडिंग केली.

  • मुंबईतील जागांवर तोडगा काढण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

    मुंबईतील जागांवर तोडगा काढण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार घेतलाय. मुंबईतील तोडगा न निघालेल्या जागांबाबत सागर बंगल्यावर बैठक रात्री उशिरा पार पडली. मुंबईतील बोरीवली, वर्सोवा, घाटकोपर, शिवडी, चेंबूर, विक्रोळी, भांडुप जागांवर वाद कायम यंदावर कायम आहे. भाजपकडून शिवसेनेला उमेदवार देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. वरळी, शिवडी आणि माहीम याठिकाणी मनसेबाबत काय भूमिका घ्यायची? यावर होणार चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या मानखुर्द जागेसंदर्भात अजेंडा ठरवण्यात आला अशी सूत्रांची माहिती आहे. 

  • मुंबईतील जागांवर तोडगा काढण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

    मुंबईतील जागांवर तोडगा काढण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार घेतलाय. मुंबईतील तोडगा न निघालेल्या जागांबाबत सागर बंगल्यावर बैठक रात्री उशिरा पार पडली. मुंबईतील बोरीवली, वर्सोवा, घाटकोपर, शिवडी, चेंबूर, विक्रोळी, भांडुप जागांवर वाद कायम यंदावर कायम आहे. भाजपकडून शिवसेनेला उमेदवार देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. वरळी, शिवडी आणि माहीम याठिकाणी मनसेबाबत काय भूमिका घ्यायची? यावर होणार चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या मानखुर्द जागेसंदर्भात अजेंडा ठरवण्यात आला अशी सूत्रांची माहिती आहे. 

  • बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक

    बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय. मुंबई आणि पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाईत आरोपी सुजीत सिंगला पंजाबमधून अटक करण्यात आलीय. पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिलीय. 

     

  • उद्योगपती अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट

    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्योगपती अनंत अंबानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेती. मध्यरात्री 12 वाजा अनंत अंबानी फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते. जवळपास दीड ते दोन तास अनंत अंबानी यांची फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मात्र या भेटीमागील कारण समोर आलं नाही. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनंत अंबानींनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link