Maharashtra Breaking News LIVE: भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा - अदिती तटकरे

Mon, 23 Dec 2024-1:43 pm,

Maharashtra Breaking News LIVE: आजचा दिवस कोणत्या घडामोडी वेधणार लक्ष, कोणता नेता ठरणार चर्चेचा विषय? सामान्यांच्या जीवनावर कोणत्या निर्णयांचे होणार थेट परिणाम... पाहा सर्व बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE: हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळातील घडामोडी इथपासून अनेकही कैक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचच लक्ष असणार आहे. काय आहेत त्या सर्व बातम्या... पाहा एका क्लिकवर Live 


Latest Updates

  •  छगन भुजबळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते-आदिती तटकरे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     'भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा'

     आदिती तटकरे यांची माहिती

    भुजबळ-फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ वेगळा काढू नये-आदिती

  • मलिदा लाटण्यासाठी पालकमंत्रिपद हवंय 
    खासदार संजय राऊतांचा सवाल 
    पालकमंत्रिपद मिळालं की प्रश्न सुटणार? 

  • अजित पवार यांची पत्रकार परिषद 

    पुण्यातील समस्यांची माहिती घेतली आहे, अशी माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शहरात 100 बेडचं काम सुरु असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना छगन भुजबळ यांच्याबद्दल विचारलं असता 
    भुजबळांचा प्रश्न पक्षांतर्गत असल्याचं उत्तर अजित पवारांनी दिली.  

  • राहुल गांधी आज परभणीत असणार

    सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीला आज राहुल गांधी जाणार आहेत. 
    राहुल गांधी आज सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करणार 
    सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे 

  • छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद

    विधानभेच्या निकालामध्ये ओबीसीचा देखील वाटा
    ओबीसीच्या पाठबळामुळे प्रंचड विजय झाला
    ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणार 
    8 दिवसांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 

     

  • भुजबळ- फडणवीस भेटीमागचं कारण काय?

    देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटणं हे स्वाभावीक आहे. तसेच छगन भुजबळ हे राज्याचे ज्येष्ठ नेते ते आपल्या मतदार संघाचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात अशी माहिती अतुल भातखळकर - आमदार भाजप यांनी दिली. 

  • छगन भुजबळ-फडणवीसांची भेट

    सागर बंगल्यावर छगन भुजबळ आणि मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास भेट झाली. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याच सांगण्यात येत आहे. 

  • राज-उद्धव ठाकरेंबाबत संजय राऊतांचं सूचक विधान 

    दोन्ही ठाकरेंवर महाराष्ट्राचं प्रेम - संजय राऊत 
    दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास आनंद होतो 

  • हिंगोलीत कार चालकाने एका व्यक्तीला चिरडलं

    हिंगोलीच्या वसमत शहराची मुख्य बाजार पेठ असलेल्या झेंडा चौकात काल मध्यरात्री एका कार चालकाने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे, कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, या अपघात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या इतर दोन ते तीन मोटार सायकलीला ही या कार ने उडवलं असून यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत,यापैकी एक जण गंभीर जखमी आहे, कार थेट फुलाच्या दुकानात शिरल्याने तेथे पूल व्यावसायिकाचे ही नुकसान झाले आहे,हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालाय, घटनेचा तपास वसमत शहर पोलिस करीत आहेत. 

     

  • शहापूरात समृध्दी महामार्ग धुक्यात हरवला..! शंभर मीटवरचे वाहन दिसेना..

    शहापूर ग्रामीण पट्ट्यात सोमवारी पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळाली. येथील समृध्दी महामार्गावर धुक्याची चादर दिसून येत आहे. शंभर मिटर पर्यंतचे वाहन देखील दिसून येत नाही, यामुळे वाहन चालक आपली वाहन‌ दिवे लावून सावकाश चालवत असल्याचे चित्र पाहायला मिळतेयं, इतक्या दाट प्रमाणात धुकं पडलंय. अचानक उद्भवलेल्या धुक्यामुळे परतीच्या पावसाने संकेत दिल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पहाटे चार-साडेचार वाजल्यापासून वातावरणात धुक्याची दाट चादर तयार झालीय.

  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही

    प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ तूर्तास नाही. कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही. राजधानी दिल्लीच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आल्याचे असं समजून येते. 

  • मंत्र्यांचं खातेवाटप झालं; आता पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू

    देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप झालंय.. त्यानंतर लगेचच पालकमंत्रिपदावरून दावे प्रतिदावे करण्यात येतायेत.. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय.. संजय शिरसाट यांनी मंत्री झाल्यानंतर लगेचच संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावर दावा केलाय.. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहे तर दुसरीकडे भरत गोगावले यांनीही पालकमंत्रीपदावर दावा केलाय..तर दुसरीकडे मंत्रालयातील दालनावरूनही मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे असल्याचं दिसतंय.. 

     

  • आरोग्य उपकेंद्र धुळखात पडून

    धुळे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे अजंग गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे गेल्या पाच वर्षापासून धुळखात पडून आहे. आरोग्य विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्दी, खोकला, ताप अशा आजारांसाठी नागरिकांना तब्बल 12 ते 15 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र गेल्या पाच वर्षापासून तयार असलेल्या या उपकेंद्राचे उद्घाटन करून ते सुरू करण्याचे औदार्य प्रशासनाने दाखवलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याबाबत कमालीचे उदासीन आहेत. हे उपकेंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेले आहे. उपकेंद्र सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा हे नागरिकांनी दिलेला आहे. आरोग्य विभाग आता तरी जागा होईल का? हाच खरा प्रश्न आहे

     

  • चालत्या कारने घेतला पेट; कारच्या स्फोटात चालकाचा होरपळून मृत्यू

    सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील बोरगाव टोलनाका येथे चालत्या सीएनजी कारने पेट घेतल्याने स्फोट होऊन चालकाचा जळून मृत्यू झाला आहे. गणेश माळवदे,वय 27 असे या चालकाचे नाव आहे.कवठेमहांकाळकडून मिरजेकडे जात असताना बोरगाव टोल नाका येथे सीएनजी कार असणाऱ्या गाडीने अचानक पेट घेतला,त्यानंतर काही क्षणातच पेटलेल्या गाडीत स्फोट होऊन गाडीच्या आत अडकलेल्या चालकाचा होरपळून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर गाडीचे चारही दरवाजे लॉक झाली, त्यामुळे चालक गणेश याला बाहेर पडता आलं नाही,त्यामुळे गाडीसह तो आगीत जळुन मृत्यूमुखी पडला आहे.

  • एस टी तोट्यात; दररोज सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा तोटा

    एसटी महामंडळ संकटात सापडले असून एस टी ला दररोज सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा तोटा होत आहे. यामुळे एसटी संकटात सापडली आहे. या संकटातून एसटीला बाहेर काढण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. नुकत्याच पार पडलेल्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एसटीच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात कुठल्याही पक्षाच्या सदस्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याबाबत प्रश्न उपस्थित केला नसल्याचे बरगे म्हणाले. 

  • मुंबईतील वडाळा येथे कारखाली चिरडून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू 

    मुंबईतील वडाळामध्ये कारखाली चिरडून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वडाळ्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज इथली ही दुर्घटना आहे. कार मागे घेत असताना आयुष लक्ष्मण किनवाडे याला गाडीची धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली.

    हेसुद्धा वाचा : भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू 

  • कॅग अहवालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कॅग अहवालावर प्रतिक्रिया दिलीय. कोरोना काळात औषधांमध्ये झालेला घोटाळा ही गंभीर बाब असल्याचं फडणवीस म्हणालेत. तर या अहवालाचा अभ्यास करून त्यावर प्रतिक्रिया देणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.

     

  • राज्यसभेवर जाण्याची ऑफर; छगन भुजबळ यांची तीव्र नाराजी

    राज्यसभेवर जाण्याची ऑफर देण्यावरुन छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आधी लोकसभा निवडणूक लढायला सांगितलं. नंतर राज्यात तुमची गरज असल्याचं सांगत लोकसभेचं तिकीट नाकारलंत. आता पुन्हा राज्यसभेवर जायला सांगितलं अशा शब्दांत भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

  • आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसींचा पुन्हा एल्गार

    जरांगेंचं उपोषण सुरु होताच ओबीसी रस्त्यावर उतरणार. ओबीसींच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 25 जानेवारीपासून मनोज जरांगे उपोषण करणार. तर जरांगेंचं उपोषण सुरु होताच ओबीसींचं आंदोलन सुरु होणार. प्रकाश शेंडगे यांची माहिती. 

     

  • मंत्री उदय सामंत आज बीड, परभणी दौ-यावर

    मंत्री उदय सामंत आज बीड, परभणी दौ-यावर. मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीयांची घेणार भेट. परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची घेणार भेट, उदय सामंत दोन्ही कुटुंबीयांचं सांत्वन करणार

     

  • राहुल गांधी आज परभणीत... 

    सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल राहुल गांधी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 1 वाजता नांदेड विमानतळ येथे राहुल गांधी यांच होणार आहेत,दुपारी 2:15 वाजता ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत, आंबेडकरी चळवळीचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांच ह्रदय विकाराने निधन झालं होतं, दुपारी 3 वाजता वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट राहुल गांधी घेणार आहेत, त्यानंतर परभणी वरून नांदेड विमानतळाकडे राहुल गांधी निघणार आहेत. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link