Maharashtra Breaking News Live Update : पुण्यातील सभेत देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला मौलानांचा ऑडिओ
Maharashtra Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकी जवळ आली असून सगळ्यांचं त्याकडेच लक्ष लागलं आहे. त्यामुळे एका क्लिकवर पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट
Maharashtra Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकी जवळ आली असून सगळ्यांचं त्याकडेच लक्ष लागलं आहे. या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक केंद्रीय मंत्री पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसभरात काय काय घडतंय हे जाणून घेऊया? या लाईव्ह अपडेटमध्ये
Latest Updates
पुण्यातील सभेत देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला मौलानांचा ऑडिओ
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद मोमीन यांनी व्होट जिहादचं आवाहन केलं आहे. तो ऑडिओ फडणवीस यांनी माईकवरून ऐकवला. त्यात शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांना व्होट जिहादचे म्होरके असल्याचं म्हटलं आहे.
सासवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा हेलिपॅडवर तपासण्यात आल्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महायुतीचे पुरंदर -हवेली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी पोहोचले आहेत. सासवड येथील सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टरने सासवडच्या वाघिरे महाविद्यालय मैदानावर आगमन झाले..यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगा तपासण्यात आल्या आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 : 'मविआच्या काळात पवारांचा मुख्यमंत्रिपदावर दावा'
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं याबाबत माहिती दिल्याचा दावा त्यांनी केलाय.. झी २४तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. दरम्यान खासदार संजय राऊतांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावलाय.. पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्रिपद टिकवण्याची कमिटमेंट केली होती असं राऊतांनी सांगीतलंय..
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यात रोहित पवारांनी अभिनेत्री कंगना रानावतवर टीका केलीये.. आंदोलन करणारे शेतकरी हे दहशतवादी असतात, असं कंगनाने विधान केलं होतं.. याविधानावरून रोहीत पवार आक्रमक झाले.. कंगनाची सभा कॅन्सल झालीच पाहिजे. असं ते यावेळी म्हणाले.. जे शेतकऱ्याला दहशतवादी म्हणतात अशा लोकांना इथे एन्ट्री नाही.. असं देखिल त्यांनी म्हटलय..
Maharashtra Assembly Election 2024 : सरकारची लाडकी बहीण योजना नसून ती 'लाडकी खुर्ची बचाव योजना' असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केलीये. वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथील खासदार अमर काळेंच्या सभेत ते बोलत होते...
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का
नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसणार आहे. आज सायंकाळी नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी मुर्तडक यांनी मनसे पक्षाकडे राजीनामा सुपूर्त केला आहे. ऐन निवडणुकीत मनसेला रामराम ठोकत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राजकीय वातावरणाला एकच चर्चा रंगलीय.
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : भर पावसात देवेंद्र फडणवीसांची सभा; म्हणाले 'पावसात भिजलो तर सीट...'
सांगली शिराळामध्ये भर पावसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. पावसात भिजलो तर सीट जिंकलो, हे पक्क आहे, असं विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पावसात भिजलो तर उमेदवार जिंकणार, ही काळा दगडावरील पांढरी रेष आहे. त्यामुळे शिराळामध्ये सत्यजित देशमुख याचा विजय निश्चित आहे. कारण त्याच्या नावात जीत आहे पण त्याचं जीत सम्राट महाडिक असेल. सत्यजित देशमुख निवडून येणार आहेत हे पक्के आहे कारण पावसात सभा होत आहे. पावसात सभा घेतली की शीट निवडून येतात. असे शुभ संकेत आहेत. नेत्याचं म्हणणं आहे की पावसात सभा घेतला की निवडून येतात, असं वक्तव्य फडणवीस यांनी सभेत केलं.
Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates : हिंगोलीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची बॅग तपासली
हिंगोलीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची बॅग तपासली गेली. संत नामदेव कवायत मैदानावर हेलीकॉप्टरमधल्या बॅग निवडणूक पथकाने तपासल्या आहेत. अमित शहा हिंगोली दौऱ्यावर असतांना हा प्रकार घडला. तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी अमित शहा हिंगोली इथे आले होते.
Mmubai Breaking News Today LIVE Updates : मुंबईतल्या भुयारी बीकेसी स्टेशनमध्ये आग लागली आहे. मोकळ्या जागेत ठेवलेल्या अडगळीतल्या सामानाला आग लागल्याचं सांगण्यात आलंय. अग्निशामक दलाच्या 8 गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे. मात्र मेट्रोची सेवा बंद करण्यात आली आहे.
कणकवली बसस्थानकात महिलेचा चिरडून मृत्यू
कणकवली बसस्थानकात दोन बसमध्ये चिरडून महिलेचा मृत्यू. संतप्त लोकांनी कणकवली बस स्थानकावरून होणारी वाहतूक रोखून धरली. एका बसवर दगडफेक ही करण्यात आली. त्या महिलेच्या कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी म्हणून ग्रामस्थांचा, सर्व पक्षीय लोकांचा बसस्थानक आवारातच ठिय्या. कणकवली विधानसभा मतदारसंघातील दोन उमेदवार ही ठिय्यात सहभागी. या महिलेचं नाव फातिमा बोत्रे असून तिचं वय 35 वर्ष होतं. तर निधन झालेल्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत व विमा रक्कम देण्याचे कबूल केल्यानंतर आंदोलन स्थगित झाले.
पंढरपुरात जयंत पाटील यांच्याही बॅगांची झाली तपासणी
पंढरपुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बॅगांची झाली तपासणी. जाहीर सभेसाठी जयंत पाटील हे पंढरपूरात आले होते. हेलिकॉप्टरमधील बॅगांची निवडणूक आयोगामार्फत तपासणी. जयंत पाटलांच्या बॅगेत फक्त निघाला जेवणाचा डबा.
अब्दुल सत्तारांना तुरुंगात टाकणार - उद्धव ठाकरे
सिल्लोडमधील जाहिरसभेत उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांचा उल्लेख गद्दार असा करत थेट निशाणा साधला. गद्दारांना गाडा असा आवाहन करत सत्तेत आल्यास इथल्या गद्दाराला तुरुंगात टाकू असं आश्वासन देतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
जिथं रिकामी मनं, तिथं रिकाम्या खुर्च्या; मोदींच्या सभेवर आदित्य ठाकरेंची टीका
आदित्य ठाकरे मोदींच्या सभेवर म्हणाले, 'काल शिवतीर्थवर सभा घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु गर्दी किती,लोकांचा प्रतिसाद किती होता ते आपण पाहिलं. जिथं रिकामी मनं असतात, महाराष्ट्राला रिकामे करायचे काम केले त्यांनी तिथं रिकामे खुर्च्याच असणार. हाच राग मुंबईकर मतपेट्यांमधून व्यक्त होतील. काल महाराष्ट्रविरोधी लोक शिवतीर्थवर आले होते.'
तुम्ही ताकद दिली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू - मुख्यमंत्री शिंदे
नांदेडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडत्या बहिणीचा उल्लेख करत अनेक गोष्टी सांगिातल्या आहेत. लाडक्या बहिणीला विजयी करण्याची विनंती करायला आलोय.
श्रीजयाच्या विजयाची चिंता करण्याची गरज नाही, श्रीजया विजयी होईल. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचे पोट दुखतंय, छातीत धडकी भरली आहे. पण लाडक्या बहिणी त्यांना हिसका दाखवतील. आम्हाला जेलमध्ये टाकू म्हटले, बहिणींना दीड हजार दिले तर काय गुन्हा केला. ही योजना बंद करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे. ते सरकार असतं तर राज्य दहा वर्ष मागे टाकलं असतं. तुम्ही ताकद दिली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू. घरात बसून, फेसबुक लाईव्ह करून बहिणीची सुरक्षा करणार काय? अशोक चव्हाण यांनी पण उठाव केला आणि आमच्यासोबत आले. हे बंद करू ते बंद करू मग चालू काय करणार. कोणाचाही माईका लाल आला लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. मुलींना शिक्षणासाठी शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला. मी सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो. सोयाबीन, कापसाच्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, भाव पडले तर योजना आणली.नाव न घेता संजय राऊतांना चंद्रकांत पाटलांना टोला
कोथरूड विधानसभा मतदारसंघात मेळाव्याला शिवसेनेचे संजय राऊत उपस्थित होते. त्यावेळी ते म्हणाले, कोण कोण अंगठ्या वाटतंय पैशाची पाकिटे वाटली जातात. कोथरूडकारांनी भूमिपुत्रांना निवडून दिलं पाहिजे. नाव न घेता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत ते म्हणाले, मोकाटे भूमिपुत्र आहे. कोथरूड करांनी भूमिपुत्राला निवडून द्यायचं की बाहेरून आलेले पार्सल परत पाठवायचं हे ठरवायचे आहे. सरकारमध्ये पुण्याला स्थान मिळायचं असेल तर चंद्रकांत मोकाटे यांना निवडून द्या असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
राजठाकरेंकडून मनसेचा जाहिरनामा प्रकाशित
मुलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा, मनसेकडून काय करणार आणि काय केलं हे दाखवणारी 2 पुस्तिका प्रकाशित. प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी, मनसेचा जाहिरनामा.
15 दिवसांत सोने,चांदीत घसरण
लग्नसराईत फायदा : गुंतवणूकदारांना संधी दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. पंधरा दिवसांत दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 5,700 रुपयांनी कमी होऊन गुरुवारी 74,500 रुपये आणि चांदीचे दर तब्बल 11 हजार रुपयांनी उतरून 89 हजार रुपयांवर स्थिरावले. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोने 900 रुपये व चांदीचे दर 1800 रुपयांनी घसरले. शेअर बाजारातील तेजीमुळे दर घसरल्याची रिपोर्ट्सची माहिती.
मुंबई विमानतळावर दीड महिन्यात 21 धमक्या
गेल्या दीड महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर 21 धमक्या दिल्या आहेत. नुकतीच अजरबैजानला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब ठेवून प्रवासी प्रवास करत असल्याची धमकी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएफएफ) नियंत्रण कक्षाला आली होती. पण तपासणीत ती माहिती खोटी असल्याचं निष्पन्न झाले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीनं व्हीपीएन नेटवर्कचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबईतील सहार व विमानतळ पोलीस ठाण्यात दीड महिन्यात सुमारे 21 धमकी अथवा खोटी माहिती दिल्याची प्रकरणे घडली असून त्यातील 18 प्रकरणांमध्ये व्हीपीएन नेटवर्कचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे 250 हून अधिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला.
संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या गाडीत सापडले 19 कोटींचे दागिने
संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या एका सराफा दुकानदाराचे जवळपास 19 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने पकडण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी चेकपोस्टवर स्थिर पथकाने ही कारवाई केली. संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी केली असता. त्यांना यात 19 कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती मिळतेय दागिने पकडून जीएसटी विभागाच्या स्वाधीन केले आहेत. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या 3 सभा होणार. 12 वाजता दापोलीत होणार जाहीर सभा, 2 वाजता गुहागरमध्ये होणार सभा. 4 वाजता राजापूरमध्ये सभा होणार. रत्नागिरी जिल्ह्यात चार मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.