Maharashtra Breaking News Live Updates : भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय खलबतं, सामान्यांच्या जीवनावर कसा होणार परिणाम? वर्षातील शेवटच्या महिन्याची सुरुवात नेमकी कशी? पाहा...
Maharashtra Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उत्सुकता आहे ती म्हणजे सत्तास्थापनेची. याच सत्तास्थापनेपूर्वी राज्यात राजकीय नाट्याचे कैक अंक पाहायला मिळाले. त्यात आता पुढचा अंक कोणता आणि राज्यातील इतर कोणत्या घडामोडी सामान्यांचं लक्ष वेधणार? पाहा सर्व Live Updates...
Latest Updates
भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आहेत. महाजन शिंदेंच्या निवास स्थानी पोहोचले असून यांच्यात सत्ता स्थापनेबद्दल महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहेत. एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आहेत. महाजन शिंदेंच्या निवास स्थानी पोहोचले असून यांच्यात सत्ता स्थापनेबद्दल महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर पालघर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर 24 तासानंतर पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू अतिश मोरे यांना मारहाण केल्या प्रकरणात अविनाश जाधव यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल झालाय. तर अविनाश जाधव हे यात मुख्य आरोपी आहेत. या सर्वांवर कलम 118 (१) , 189 (2 ), 189 (4) 191 (2) , 191 ( 3) प्रमाणे सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. रविवारी झालेल्या वादामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. सातपाटी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे .
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी शरद पवार
21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. 70 वर्षांनी दिल्लीत होणार्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी शरद पवार असणार आहेत. शरद पवार यांनी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले होते. आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारल आहे.
आझाद मैदानावर शपथविधीच्या तयारीला सुरुवात, एकूण 3 स्टेज उभारणार
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निकालांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यावर आता नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. या शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाली असून यासाठी एकूण 3 स्टेज बांधण्यात येणार आहे. मुख्य मंच हा 60 बाय 100 फुट असून उजव्या आणि डाव्या बाजुला 60 बाय 50 चे दोन मंच असणार आहेत. उजव्या बाजूच्या मंचावर संत - महंत , सन्मानीय व्यक्ती असतील तर डाव्या बाजुला महापुरुषांच्या प्रतिमा - सांस्कृतिक कार्यक्रम होतील.आझाद मैदानावर होणाऱ्या या भव्य शपथविधीसाठी 30 ते 40 हजार आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. मंचासमोर आमदार-खासदार, निमंत्रीत, व्हिव्हीआयपी असून परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल. तर या सोहळ्यात सर्वसामान्यांच्या प्रवेशाकरता 3 प्रवेशद्वार असतील.
महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा
महाराष्ट्र विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा
महाराष्ट्र विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महाराष्ट्रात पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री भाजपचाच, पण गृहखातं...; काय म्हणाले छगन भुजबळ?
ज्या गृहखात्यावरून महायुतीमध्ये सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे चे गृहखातं अडचणीचं असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. 'हे खातं चांगलं असलं तरीही अडचणीचं. माझ्यावेळी अशीच परिस्थिती होती', असं म्हणत महायुतीत सत्तास्थापनेवरून चर्चेतून प्रश्न सोडवत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार या बातमीला दुजोराही दिला.
उपमुख्यमंत्रीपदावरून श्रीकांत शिंदे यांची लक्षवेधी पोस्ट...
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असं श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हेल्मेट शिवाय प्रवेश नाही
राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यात हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश जारी केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर महापालिकेतील कर्मचारी हे हेल्मेटविना असतील, तर प्रवेश दिला जात नव्हता. आता मात्र प्रशासनाने महापालिका भवनात येणाऱ्या सर्वांनाच हेल्मेट सक्ती केली आहे.
एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द
एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्यात अशी सूत्रांनी माहिती दिलीय. एकनाथ शिंदे यांनी आज आमदारांची बैठक बोलावली होती, तेदेखील रद्द करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिल्यामुळे आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी (1 डिसेंबर) ला एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरे गावहून ठाण्यात परले आहेत. ते दरे गावाला गेले असताना त्यांची प्रकृती खराब झाली होती.
एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द, डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला
महाराष्ट्राचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे शिंदेनी आयोजित केलेली ही बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे ठाण्यातच असतील.
मतदानानंतर मतपत्रिकेचा फोटो काढणारा पोलीस निलंबित
शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रियाझ पठाण यांना करण्यात आलं निलंबित. त्यांच्या पोस्टल बॅलेट पेपरचा फोटो शेअर झाल्यानंतर निवडणूक गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबन. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रात मतदान करणाऱ्या पठाणने आपल्या चिन्हांकित मतपत्रिकेचा फोटो काढून साताऱ्यातील मित्राला पाठवला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीला करण्यात आली होती सुरवात. चौकशीअंती पोलिसांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पक्षविरोधी कारवाई केली असेल तर.... शिरसाटांचा स्पष्ट इशारा
सत्तास्थापनेच्या धर्तीवर शिंदेंना त्यांचा निर्णय घ्यायचा जो आज- उद्यापर्यंत हा घेतला जाऊ शकतो, असं वक्तव्य करत मुख्यमंत्रीपदासंदर्भात तिन्ही नेत्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल ते सर्वांना मान्य असेल असं संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं. खातेवाटप हा एका प्रक्रियेचा भाग असल्याचं ते म्हणाले.
4 डिसेंबर ठरणार महत्त्वाचा दिवस...
भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यासाठी पक्षाची बैठक दिनांक 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचं सूत्रांनी म्हटल आहे. या बैठकीसाठी पर्यवेक्षक म्हणून दिल्लीहून माजी अध्यक्ष केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह आणखी एक भाजपचे ज्येष्ठ नेते मुंबईत दाखल होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत आज संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
एकनाथ शिंदे सत्तेत यायला तयार नव्हते, पण... भरत गोगावलेंचा मोठा दावा
महायुतीच्या नवीन सरकार मध्ये सत्तेत येण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार नव्हते अशी माहिती आता समोर आलीय. शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार भरत गोगावले यांनीच ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये काम करायला नव्हते मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं त्यांनी सांगितलं होतं पण आम्ही त्यांना सत्तेत राहून काम करण्याचा आग्रह केला असं गोगावले यांनी सांगितलं.
शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली
सत्तास्थापनेआधी राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली. 4 मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता. येत्या नव्या मंत्रिमंडळात 4 नव्या आमदांराची वर्णी लागण्याची शक्यता. आज वर्षावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक. दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मनाली जातेय.
शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक
शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक. आज दुपारी ही महत्वाची बैठक वर्षा किव्हा ठाणे होणार असल्याची सूत्रांची माहिती. या बैठकीत प्रामुख्याने पाहिले टर्म तरी मुख्यमंत्री पद मिळावे किव्हा गृहमंत्री पद मिळावे यावर महत्वाची चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. या बैठकित मुख्यमंत्री जागा वाटप त्याचसोबतच महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करतील. दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला 13 मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. 'कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवा. हिंदूवरील हल्ल्यांसाठी मोदींचं धोरण जबाबदार. जगभरातील हिंदू संकटात' म्हणत राऊतांनी आळवला नाराजीचा तीव्र सूर
श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अजित पवारांच्या भेटीला
श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी घेतली अजित पवारांची भेट. श्रीगोंदा मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे शरद पवार गटाकडून जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल जगताप वेगळा निर्णय घेण्याच्या तयारी. देवगिरीवर झालेल्या भेटीनंतर चर्चांना उधाण.
दिल्लीत सुटणार महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा
दिल्लीत सुटणार महाराष्ट्राच्या खातेवाटपाचा तिढा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या बैठकीत सुटणार तिढा. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार. महाराष्ट्रातील तिन्ही नेत्यांसोबत अमित शाह करणार चर्चा. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 24 तासांत सर्व बाबींवर शिक्कामोर्तब होणार.
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाची हाक पुकारलीय. बांगलादेशात हिंदूवर अन्याय, अत्याचार होत आहे आणि केंद्र सरकार शांत बसून पाहात आसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. याचा निषेध करण्यासाठी आज शहरातील क्रांती चौकात आंदोलन केलं जाणारेय. या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन अंबादास दानवेंनी ट्वीटरवरून केलंय.
राज्यात तापमानवाढ
रविवारपासून राज्यात तापमानवाढीस सुरुवात झाली असून, निफाडचा पारा 18 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. रविवापेक्षा सोमवारी तापमानात 8 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम.
यंदा गव्हाचं क्षेत्र 15 टक्क्यांनी वाढणार
सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्यानं किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मुख्यमंत्रीपद नव्हे, तर 'या' जबाबदारीसाठी शिंदेंची भाजपसोबत वाटाघाटी - सूत्र
भाजपप्रणित महायुतीला भरभक्कम बहुमत मिळून आठवडा उलटून गेला तरी खातेवाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाल्यावर सरकारमध्ये क्रमांक दोनची जागा पटवण्यासाठी शिंदे भाजपसोबत वाटाघाटी करत आहेत. गृहमंत्री पदासह नगरविकास आणि इतर मलईदार खाते पदरात पाडून सरकार आणि महायुतीत आपलं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी शिंदे प्रयत्न करत आहेत. पण गृहखाते सोडण्यास भाजप तयार नसल्याने हा पेच कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये - प्रणिती शिंदे
खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधानांविषयी नाराजीचा सूर आळवला आहे. 'ही निवडणूक सरळ नव्हतीच, काही गोष्टीमध्ये त्यांनी षडयंत्र केलं. हे लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नाही, ही तत्वाची लढाई नव्हती, तरी तुम्ही लढलात, तुम्ही टिकलात त्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. cwc च्या मिटिंग मध्ये राहुल गांधी म्हणाले आपण जेव्हा निवडणूक जिंकतो तेव्हा चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरल्यावर दुःख असतं. पण आपण ही निवडणूक हरलेलो नाही, आपला विजयच झालेला आहे. तुम्ही मोदींचा चेहरा बघा, महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. कारण ते मागच्या रस्त्याने येउन, evm मॅन्यूपुलेट करून 133 जवळपास पोहोचलेत, त्यामुळेच भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही निरीक्षण करून बघा', असं त्या म्हणाल्या.
राहुल गांधी हाजीर हो...
राहुल गांधींना आज पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले होते, ज्यानंतर सात्यकी सावरकरांकडून मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. आज यावर पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
विनाहेल्मेट महामार्गावर जाणाऱ्यांवर कठोर कारवाई
बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत केलेल्या वाढीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दंडाच्या नव्या नियमानुसार गाडी चालविणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा....
श्रीलंकेत उत्पादित होणारा कांदा संपुष्टात आल्याने भारतातून कांदा मागवण्यासाठी श्रीलंका सरकारने आयात शुल्कात 20 टक्के कपात केली आहे. थोडक्यात भारतीय निर्यातदारांना आता केवळ दहा टक्के निर्यात शुल्क द्यावे लागणार आहे. ज्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. देशातून दरवर्षी साधारणतः 25 लाख टन कांद्याची विविध देशांत निर्यात होते. यात एकट्या श्रीलंकेचा वाटा नऊ टक्के आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क
अवघे 20 टक्के असल्याने निर्यातदारांना खुल्या पद्धतीने व्यापार करणे शक्य होत आहे.दमदार पावसामुळे राज्यात 35 लाख हेक्टरवर पेरणी
राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गतवर्षपिक्षा रब्बी हंगामात पेरणीची सुमारे दीडपटीने वाढ झाली आहे. त्यात ज्वारी, गहू, मकाच्या पेरणीच्या वाढीबरोबरच यंदा तेलबियांच्या पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचे सरासरी असणारे 54 लाख हेक्टर क्षेत्र वाढून 60 लाख हेक्टरवर पेरण्या होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलं
रोहित पवारांनी शपथविधीवरून महायुतीला डिवचलंय. महायुतीला बहुमत मिळाल्यानं, 26 तारखेलाच सरकार स्थापन केलं पाहिजे होतं. मात्र, लग्नाची तारीख जवळ अन् नवरदेव हुंड्यासाठी रुसला, अशी टीका रोहित पवारांनी केलीये.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईत दाखल होतील. तेव्हा होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे. (Mumbai Local Train)
हेसुद्धा वाचा : Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...
मुख्यमंत्रीपदी फडणवीसच; भाजप नेत्याचा दावा
पीटीआयनं भाजप नेत्यांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, त्यांच्यावर पुढील दोन दिवसांमध्ये भाजपच्या संभाव्य बैठकीमध्ये विधीमंडळ पक्षनेतेपदासंदर्भातही मोठा निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. रविवारी रात्री भाजप नेत्यानं यासंदर्भातील माहिती वृत्तसंस्थेला दिली.
सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? - एकनाथ शिंदे
जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. तिघे एकत्र बसून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती शिंदेंनी दिली. सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का? असा सवाल करत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.