Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाच्या 12 तासांतच महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार - वडेट्टीवार
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या शनिवारी लागणाऱ्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. याचप्रमाणे दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स येथे जाणून घ्या....
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या संक्षिप्त आढावा येथे जाणून घ्या.
Latest Updates
आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावा - हितेंद्र ठाकूर
सत्तेसाठी आकड्यांची जमवाजमव करताना सर्व युती आणि आघाड्यांकडून फोनवर संपर्क साधण्यात येत असल्याचं बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणालेत...त्याचबरोबर आम्हाला योग्य तो मानसन्मान द्यावा लागणार असल्याचंही ते म्हणालेत...
विनोद तावडेंची राहुल गांधी, खरगेंना कायदेशीर नोटीस
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विरार पैसे वाटप प्रकरणात आपली नाहक बदनामी केल्याचा आरोप करत, विनोद तावडे यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विजयाचे बॅनर
विधानसभा निवडणुकीच्या निकाला आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या पडवळ नगर भागात विजयाचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत. बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो तर त्यांनी केलेल्या विकास कामांचेही फोटो दर्शवण्यात आलाय.
महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बच्चू कडूंना फोन
महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बच्चू कडूंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आघाडीकडून समर्थन देण्याची विनंती बच्चू कडूंना करण्यात आल्याची माहिती सूत्रानं दिलीय. बच्चू कडू निकालानंतर उद्या पुढील निर्णय घेणार असल्याच सूत्रांनी सांगितलंय. प्रहारचे 10 ते 15 आमदार निवडून येणार असा विश्वास बच्चू कडूंना आहे. बच्चू कडू सध्या मुंबईत दाखल झाले. बच्चू कडू नेमकं कुणाला पाठिंबा देणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
मराठवाड्यातील काही अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता
मराठवाड्यातील काही अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. विजयी होणाऱ्या अपक्ष आमदारांशी महायुती, मविआकडून संपर्क केल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलीय. रमेश आडसर माजलगावातून विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हर्षवर्धन जाधव हे कन्नडमधून विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यासोबत भिमराव धोंडे आष्टीमधून जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय.
सत्ता स्थापनेसाठी मविआ आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू
निकाल लागण्यापूर्वीच सत्ता स्थापनेसाठी मविआ आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. छोट्या घटकपक्ष आणि नेत्यांशी महायुतीकडून संपर्क सुरुवात केलीय. बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती आणि इतर पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षाची मोट बांधण्याच्या तयारीत सुरु झाली आहे. सन्मानजनक वाटा देऊन सहभागी करून घेण्यावर भर दिला जातोय.
राष्ट्रवादीचा अपक्षांना गळाला लावण्याची तयारी
राष्ट्रवादी पक्षाकडून अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याची तयारी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यातील अपक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बीड, माजलगाव, आष्टी, गेवराईमधले अपक्ष गेमचेंजर ठरु शकतात. त्यामुळे विजयी ठरु शकतील अशा अपक्षांना हाताशी धरण्याकरता प्रयत्न सुरु झालेत. बीड जिल्ह्यात 81 अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. ते विजयी झाल्यास राष्ट्रवादीसाठी तो मोठा फटका असेल. विशेष म्हणजे 1962 पासून आतापर्यंत 6 वेळा अपक्ष उमेदवार आमदार झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गाठीभेटी सुरु
विधानसभेच्या निकालापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर खलबतं सुरूयेत...भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, गिरीष महाजन, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यात बैठक सुरूये...सपष्ट बहुमत न मिळाल्यास पुढची रणनीती काय यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यताय...
तीन दिवसात सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता- प्रा. उल्हास बापट
Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेसाठी केवळ तीनच दिवस उपलब्ध आहेत. 26 नोव्हेंबर च्या आत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. घटना तज्ञ उल्हास बापट यांनी ही माहिती दिलीय. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत असणाऱ्या नेत्यालाच मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाऊ शकते. बहुमत नसलं तरी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या गटाला किंवा त्यांच्या नेत्यालादेखील राज्यपाल सरकार स्थापनेसाठी बोलावू शकतात. मात्र त्यातून घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राज्यपालांची भूमिका ही राज्यघटनेला धरून तसेच नैतिकतेच्या बाजूने असावी अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली आहे. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यघटनेमध्ये काही दुरुस्ती देखील आवश्यक असल्याचं बापट म्हणाले.
मतदान झाल्यापासून मी जोमात आहे तर विरोधक सगळे कोमात- रमेश आडसकर
Maharashtra Breaking News LIVE Updates: 'मतदान झाल्यापासून मी जोमात आहे तर विरोधक सगळे कोमात गेले आहेत. मला अनेक नेत्यांची फोन आले आहेत. ' असे माजलगाव चे अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांचा दावा आहे. 'अजून मी कुणासोबत जायचं ते ठरवलेलं नाही. निकाल लागल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करणार' असेही ते म्हणाले आहते.
'शिंदेंच्या शिवसेनेचे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात' - नाना पटोले
Maharashtra Breaking News LIVE Updates: शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक उमेदवार नाराज आहेत कारण भाजपनं त्यांच्या मतदारसंघात अपक्षांना मदत केली, त्यामुळे असे नाराज उमेदवार आमच्या संपर्कात आहेत असे नाना पटोले म्हणाले. २६ तारीख सरकार बसवण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे निवडून येणा-या आमदारांना लवकरात लवकर मुंबईत पोहोचण्याच्या सूचना आहेत. निकाल आल्यानंतर तातडीनं सर्व आमदारांना मुंबईत बोलावून सह्या घेऊन जमलं तर उद्या संध्याकाळ-रात्रीपर्यंतच आम्ही राज्यपालांना निवेदन देऊ असेही ते म्हणाले आहेत.
टीम इंडिया अवघ्या 150 धावांवर झाली ऑल आउट
India vs Australia Test 2024-25 Live Streaming: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या महत्त्वाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांवरती ऑल आउट झाला आहे. भारताकडून पहिल्या डावात पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी याने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय ऋषभ पंतने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर केएल राहुलने 26 धावा केल्या.
आज होणार काँग्रेसच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक
Maharashtra Breaking News LIVE Updates: आज दुपारी एक वाजता काँग्रेसच्या उमेदवारांची 1 वाजता ऑनलाईन बैठक बोलवण्यात आली आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलाजी प्रभारी महराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांचा अध्यक्षतेखाली आज दुपारी १.०० वा. झूम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची आज होणार बैठक
Maharashtra Breaking News LIVE Updates: संध्याकाळी ६ वाजता नंदनवन बंगल्यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची बैठक होणार आहे. निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीने पक्षाची भूमिका मांडावी? यावर होणार बैठकीत चर्चा असल्याची माहिती आहे.
"जिकडे संख्याबळ तिकडे जाऊ..." निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांची राजकीय स्पष्ट भूमिका
Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेच्या निकालाआधीच आपली राजकीय भूमिका आता स्पष्ट केली आहे. ज्या पक्षाकडे संख्याबळ असेल त्या पक्षासोबत जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत जाऊ अशी भूमिका आंबेडकरांनी X या सोशल मीडिया वरून मांडलेली आहे.
लहान पक्षांशी महायुतीकडून संपर्क साधण्यास सुरूवात; सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू
सत्ता स्थापनेसाठी मविआ आणि महायुतीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. छोट्या घटकपक्ष आणि नेत्यांशी महायुतीकडून संपर्क करायला सुरुवात झाली आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे, प्रहार जनशक्ती व इतर पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास छोट्या छोट्या घटक पक्षाची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. सन्मानजनक वाटा देऊन सहभागी करून घेण्यावर भर आहे.
आपण टेन्शन घेत नाही आपण टेन्शन देतो; आमच्या शिवाय सरकार बनणार नाही - बच्चू कडू
Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले असून आता कोण निवडून येणार अशा चर्चा गाव खेड्यासह शहरांमध्ये रंगल्या आहे. याविषयी बच्चू कडू यांना विचारले असता बच्चू कडूंनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्व उमेदवार टेन्शनमध्ये असले तरी आपण टेन्शन घेत नाही उलट दुसऱ्याला टेन्शन देतो असं म्हणत बच्चू कडूंनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मी राज्यभर चाळीस ते पन्नास सहभाग घेतले असून परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या 20 ते 25 जागा निवडून येणार आहे. तसेच आमच्या शिवाय कोणाचाही सरकार बनणार नाही असेही बच्चू कडू म्हणाले.
Maharashtra Breaking News LIVE Updates: कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस हे प्रमुख पीक आहे. कापूस काढणीला सुरुवात होऊनही कापसाचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. उत्पादन खर्च वाढत आहे, मात्र त्या तुलनेत कापसाचे दर वाढत नसल्याचा दावा शेतकऱ्यांचा आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: हळद पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली!
वाशिम जिल्ह्यात यंदा हळद लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.मात्र, बदलत्या वातावरणामुळे हळद पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.पानांचा करपा, मुळांचा कुज आणि बुरशीजन्य रोगांमुळे हळद उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली तरीही रोगराई आटोक्यात येत नसल्याने हळद पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: बारामतीतील सुपे येथे अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर!
बारामतीमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. अजित पवार यांची सलग आठव्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा असा बॅनरवर उल्लेख आहे. बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: निकालाआधी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत संजय निरुपम उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली. ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांनी तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतलं.
IND vs Aus 1st Test भारताला तिसरा मोठा धक्का, विराट कोहली 5 धावा करून बाद
IND vs AUS BGT: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू झाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराह सांभाळत आहे. सुरुवातीलाच यशस्वी जैस्वाल 0 धावांवर बाद झाला आहे. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही बाद झाला. यानंतर विराट कोहली (Virat Kohli ) 5 धावा करून बाद झाल्याने भारताला तिसरा मोठा धक्का मिळाला आहे.
IND vs Aus 1st Test भारताला तिसरा मोठा धक्का, विराट कोहली 5 धावा करून बाद
IND vs AUS BGT: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, पर्थ कसोटी आज शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू झाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराह सांभाळत आहे. सुरुवातीलाच यशस्वी जैस्वाल 0 धावांवर बाद झाला आहे. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही बाद झाला. यानंतर विराट कोहली (Virat Kohli ) 5 धावा करून बाद झाल्याने भारताला तिसरा मोठा धक्का मिळाला आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईतील चेंबूरमध्ये पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात
चेंबूरच्या छेडा नगर येथे पहाटे मुंबईत पोलिसांच्या निर्भया वाहनाचा अपघात झाला आहे. घाटकोपरहून पेट्रोल भरून येत असताना पोलिस व्हॅनने ट्रेलरला धडक दिली. अपघातात २ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून जयदीप पाटील आणि साहिल खामकर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेहण्यात आले आहे. तर ट्रेलरचा चालक बिपीन सिंग याला टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, कुणाची चूक होती. याचा तपास पोलिस करत आहेत.
Maharashtra Breaking News LIVE Updates: अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या, कोर्टात हजर राहण्याचे आले समन्स
अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले आहे. बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर राहण्याबाबत समन जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. सातत्याने प्रचार दौऱ्यावर असलेल्या नेत्यांना दोन दिवस विश्रांती आहे. आता २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी आली आहे. अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. आता १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईत चार हजार डेंग्यूचे रुग्ण, १० महिन्यांत २५ जणांचा मृत्यू
डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व उपाययोजना करूनही यावर्षी ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सर्वाधिक - म्हणजे चार हजार ८९५ डेंगीच्या रुग्णांची नोंद एकट्या मुंबईत झाली आहे. त्याचवेळी, महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत १६,७३२ लोकांना डेंगीची लागण झाल्याचे चित्र आहे. याचा अर्थ राज्यात डेंगीच्या एकूण रुग्णांपैकी २९ टक्के रुग्ण हे मुंबईत आहेत. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी २२ केंद्रांवरून पावसाळी आजारांचे अहवाल प्राप्त व्हायचे, मात्र आता केंद्रे वाढवण्यात आली आहेत. महानगरात ८८० केंद्रे सुरू केली आहेत. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यंदा राज्यात १० महिन्यांत डेंगीमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला आहे.