Maharashtra Breaking News LIVE Updates : शिर्डी - साईचरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण

Sat, 05 Oct 2024-9:31 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates : विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच काही महत्त्वाच्या घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra Breaking News LIVE Updates : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात एकिक़डे (vidhansabha Election 2024) आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे दिल्ली दरबारी असणाऱ्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. 


Latest Updates

  • शिर्डीतल्या साईबाबांच्या चरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण करण्यात आली आहे. 1 किलो 434 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली ही सोन्‍याची पंचारती आहे. मुंबई इथल्या एका साई भक्ताकडून तब्बल एक कोटी रुपयांचे सुवर्णदान करण्यात आलं आहे. नाव जाहीर न करण्याची साईभक्ताने संस्थानला विनंती केली आहे. साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिलीय

  • मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुयारी मेट्रो लाईन 3चं उद्घाटन केलं. मोदींनी वांद्रे इथे मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. तसंच वांद्रे ते सांताक्रुझ मेट्रोनं प्रवासही केला. या दरम्यान विद्यार्थी आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांशी, तसंच मजुरांशी त्यांनी यावेळी संवादही साधला. पीएम मोदींच्या हस्ते तब्बल 32 हजार कोटींच्या विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं.

  • मविआ सरकारमुळे जनतेच्या पैशांचा चुराडा - पीएम मोदी

    काँग्रेस हा देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ठाण्यातल्या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीने अनेक प्रकल्प थांबवले. मविआ सत्ते आल्यास महायुतीच्या सर्व योजना बंद करतील, कुशासन ही मविआची ओळख आहे. लाडकी बहिण योजना ही मविआला आवडलेली नाही. दुष्काळी भागातील अनेक योनजा मविआने बंद केल्या अशी टीका पीएम मोदी यांनी केलीय.

  • वाशिममधल्या पोहरादेवीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठाण्यात आगमन झालं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. कासारवडवली भागात वालावलकर मैदानात मोदींचा कार्यक्रम होतोय. मोदींच्या स्वागतासाठी ठाण्यात जागोजागी बॅनर्स लावण्यात आलेत. 

  • 'सरकारमधील सर्व गद्दार बेरोजगार होणार' उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

    'सरकारमधील सर्व गद्दार बेरोजगार होणार असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला  लगावला आहे. मोदीजी कितीही फिती कापा एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यंनी पीएम नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

  • राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत जीआर जाहीर

    पेसाभरतीसाठी आदिवासी आमदारांची मंत्रालयात केलेल्या आंदोलनाला यश आलंय.. राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत GR काढण्यात आलाय.. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारनं परवानगी दिलीये.. पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी आमदारांनी काल मंत्रालयाच्या संरक्षण जाळ्यांवर उड्या मारुन आंदोलन केलं होतं.. तसंच काल दिवसभर सरकार विरोधात धरणं आंदोलनही केलं होतं.. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.. सकाळी नरेंद्र मोदी वाशिममध्ये दाखल झाले. पीएम मोदींनी पोहरादेवीचं मोदी दर्शन घेतलं. त्यानंतर विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर मोदी ठाणे आणि मुंबईत येणार आहे.. त्याआधी केलेल्या भाषणात पीएम मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गरीबी वाढवणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. मविआ सरकारच्या काळात सर्व योजनांना ब्रेक लावला अशी टीका पीएम मोदी यांनी केली.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिंकली जनतेची मनं 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी इथं अनेक विकासकामांचं उद्धाटन करण्यात आलं. इथं, बंजारा विरासत संग्रहालयाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. लाडकी बहीण योजना बहिणींचा सन्मान वाढवणारा असल्याचं वक्तव्य यावेळी पंतप्रधानांनी केलं. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण 

    राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत GR जाहीर. अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारकडून जीआर जाहीर. पेसा भरती संदर्भात जीआर काढा या मागणीसाठी काल आदिवासी नेत्यांनी मंत्रालयात उडी मारून सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. शुक्रवारी दिवसभर सरकार विरोधात धरणे आंदोलन केल्यानंतर सरकारकडून जीआर जाहीर. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना सरकारने घेतला निर्णय. कोर्टाच्या अधीन राहून मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय. आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : राहुल गांधीनी दलित कुटुंबाच्या घरी जेवण बनवले आणि.. 

    लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी कोल्हापुरात पोहोचताच उचगाव मध्ये राहत असणाऱ्या दलित कुटुंब अजयकुमार तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली. जवळपास सनदे यांच्या घरात राहुल गांधी एक तासाहून अधिक काळ थांबले होते. या दरम्यान राहुल गांधी यांनी या कुटुंबाची पूर्ण माहिती घेतली आणि त्याचबरोबर, किचनमध्ये स्वता भाजी बनवत कुटुंबासोबत जेवण देखील केलं. आमचा भाऊ आमचा मामाच आमच्या घरी आला अशी भावना या कुटुंबाने व्यक्त केली. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : कोल्हापुरात शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कोल्हापुरात करण्यात आलं असून, यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूरचे खासदार शाहूराजे छत्रपतीसुद्धा उपस्थित होते. अनावरण सोहळ्यावेळी शिवबांची माफी मागत राहुल गांधी यांनी कोकणातील त्या प्रसंगावर कटाक्ष टाकला. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : कोल्हापुरातील राहुल गांधींच्या दौऱ्याला भाजपचा विरोध 

    कोल्हापुरातील राहुल गांधींच्या दौऱ्याला भाजपनं विरोध केला आहे. भाजपकडून राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधींना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्यासाठी कार्यकर्ते आलेत. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी रोखलंय. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये  झटापट झालीय. दरम्यान वरिष्ठ्यांनी आदेश दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केलं.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : जेवणातून गुंगीचं औषध... संजय राऊतांचा गंभीर आरोप 

    वोट जिहाद हा फेक नेरीटिव्ह असून, तो संघाकडूनच पसरवला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. शिंदे सोबत गेलेले आमदार त्यांना त्यावेळेस जेवणामध्ये गुंगीचे औषधं दिली जात असल्याचा खळबळजनकं आरोपही संजय राऊत यांनी केलेला आहे. धुळ्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी संघ, भाजप, अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली. यावेळेस नितेश राणे यांचा विषय निघाल्यावर त्यांनी अप शब्दांमध्ये उल्लेख करत राणें बद्दल बोलणे टाळले. अजित पवार हे आता सासरवाडीत आहेत की माहेर वाडीत याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन दौरे करीत आहेत, सरकारी यंत्रणा वापरून पक्षाचा प्रचार मोदी करतात, त्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नव्हे तर भाजपच्या एका विशिष्ट गटाचे पंतप्रधान असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : भिवंडीतील गोदामाला भीषण आग 

    मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी इथं असणाऱ्या लॉजिस्टीक गोदामाला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीमध्ये लाखोंच्या सामानाचं नुकसान झालं. आग इतक्या भीषण स्वरुपाती होती, की इथं तातडीनं अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांना बोलवण्यात आलं आणि नंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : कोकणातील निवती समुद्रात दोन खलाशांचा मृत्यू 

    कोकणातील कुडाळ निवती समुद्रात मच्छीमारी नौका बुडून दोन खलाशांचा मृत्यू. मच्छीमारी नौकेत एकूण 14 खलाशी होते. मासे मारून परतत असताना नौका अचानक झाली पलटी. त्यातील 12 खलाशी बचावले मात्र दोन खलाशांचा बुडून मृत्यू.त्यातील एकाचा मासे मारण्याच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट

    पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोपदेव घाटात घडलेल्या या घटनेच्या तपासाला आता वेग मिळताना दिसत असून, आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची रणनिती... पहिली यादीही जाहीर होणार 

    आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेचा पुढील आठवड्यात मुंबईत होणार मनसैनिकांचा मेळावा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे जोरदार तयारी करत आहे. त्यातच मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा निवडणूक पार्श्वभूमीवर पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मार्गदर्शन. मनसेची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी पुढील आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता?

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : शिवशाही बस पेटली 

    पंढरपूर पुणे पालखी मार्गावर असणाऱ्या वाडी कुरोली उड्डाण पूल येथे शिवशाही बस पेटली. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून अग्निशामक यंत्रणा बसला लागलेली आग विझवण्यासाठी पोहोचली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : पुणेकरांसाठी मोठी बातमी 

    पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरा भोवती तयार होऊ घातलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या सुधारित खर्चास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या रिंग रोडचा अंदाजीत खर्च तीन वर्षात तब्बल दुपटीने वाढला आहे. रिंग रोडच्या कामासाठी 22 हजार 375 कोटींच्या वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा एकूण खर्च 42 हजार 710 कोटींवर पोहोचला आहे. रिंग रोड प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग निघणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक

    अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पोलीस स्टेशनची प्रचंड नासधूस झाली असून, पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. दगडफेक केल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रुधूराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. या दगडफेकीत दहापेक्षा अधिक पोलीस जखमी असल्याची माहिती असून, सध्या नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या तणावपूण शांतता पाहायला मिळत आहे. शिवाय नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून, मध्यरात्री एक नंतर परिस्थिती नियंत्रणात आली आल्याची माहिती मिळत आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रात NIA आणि ए टी एसची संयुक्त कारवाई

    महाराष्ट्रात NIA आणि ए टी एस यांची संयुक्त कारवाई. महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मालेगाव आणि जालन्यात संयुक्तिक कारवाई. काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती. देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशयातून कारवाई

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर 

    राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर असून, त्यांचा दौरा 1 दिवसानं पुढे ढकलण्यात आला आहे. खराब हवामानामुळे राहुल यांचा दौरा 1 दिवसानं पुढे ढकलला गेलाय. त्यामुळे राहुल गांधी आज सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत.

     

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : अजित पवारांची बारामतीतून माघार 

    अजित पवारांनी बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिलेत. जो उमेदवार देईन त्याला निवडणून आणा, असं जाहीर आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय. त्यांच्या या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. 

     

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत 

    वाशिमनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे आणि मुंबईत येणार आहेत. त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. मोदी मुंबई मेट्रो-3 भुयारी मार्गाचं उद्घाटन करणार आहेत. JVLR ते बीकेसी विभागाच्या मुंबई मेट्रोचं उद्घाटन आज  नरेंद्र मोदी करणार आहेत. महाराष्ट्रातली पुण्यानंतरची ही दुसरी भूमिगत मेट्रो आहे. JVLR ते बीकेसी विभागाच्या बांधकामासाठी सुमारे 14 हजार 120 कोटी रुपयांचा खर्च आलाय. या विभागात एकूण 10 स्टेशन्स आहेत. त्यापैकी 9 स्टेशन्स भूमिगत आहेत. मेट्रो लाईन 3 पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर दररोज 12 लाख मुंबईकर यातून प्रवास करतील. मुंबई मेट्रोसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचीही पायाभरणी करणार आहेत.

     

  • Maharashtra Breaking News LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा 

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा  आज महाराष्ट्र दौरा आहे. मोदी सकाळी वाशिम दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी विशेष हेलिकॉप्टरनं पोहरादेवीला पोहोचणार असून, त्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करणार आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link