Maharashtra Breaking News LIVE Updates: धनगर समाजाचे `वर्षा`बाहेर आंदोलन, कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलं भेटीला

Tue, 08 Oct 2024-8:22 pm,

विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

Latest Updates

  • 'मोदी, शाहांनी गुजरात आणि देश अशी भिंत बांधली'

    'गुजराती-मराठी वाद नव्हता तो व्हावा अशी इच्छा नाही' असे विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कले. 'मोदी, शाहांनी गुजरात आणि देश अशी भिंत बांधली' असे म्हणत त्यांनी मोदी-शहा यांच्यावर आरोप केले.

  • दारुच्या नशेत कार चालकाची दुचाकीला धडक

    साता-यातील मारूल हवेलीत दारुच्या नशेत कार चालकानं दुचाकीला धडक दिली. कार चालकानं दुचाकीवरील तरुणीला तब्बल अर्धा किलोमीटर फरपटत नेलं. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झालीये. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरूये. तर याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • बोपदेव घाटात बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच

    पुण्यातील बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार प्रकरणाला 5 दिवस उलटलेत..मात्र अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाहीये...पुणे पोलीस दलातील 200 हुन अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आरोपींचा शोध घेतायत...मात्र अद्यापही आरोपी मोकाटच फिरतायत.

  • समृद्धी महामार्गावर लुटमारीच्या उद्देशाने ट्रॅव्हल्सवर दगडफेक 

    बुलढाण्यातल्या समृद्धी महामार्गावर लुटमारीच्या उद्देशाने ट्रॅव्हल्सवर दगडफेक करण्यात आली.  दोन खासगी ट्रॅव्हल्सवर दरोडेखोरांनी दगडफेक केली. डोणगाव ते बीबी दरम्यान ही घटना घडली...प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

  • मोहम्मद अझरूद्दीन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कार्यालयात 

    माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते मोहम्मद अझरूद्दीन यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. हैदराबाद क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अझरूद्दीन यांची चौकशी करण्यात येतेय. डिझेल जनरेटर,फायर ब्रिगेड यंत्रणा, आणि कॅनोपी खरेदीसाठी 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा अझरूद्दीनचा आरोप आहे.

  • कार्यकर्त्यांचे भाजपच्याच आमदार विरोधात आंदोलन

    पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्याच आमदार विरोधात आंदोलन सुरू केलयं... शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप यावेळी  कार्यकर्त्यांनी केलाय... या आंदोलनात  पंतप्रधान  मोदींचं मंदिर बांधून, त्यांच्या पुतळा समोर  आंदोलन करण्यात आलंय.

  • लालबागमध्ये शिवसेना  ठाकरे गटाचा हंडा मोर्चा

    मुंबईतील लालबागमध्ये शिवसेना  ठाकरे पक्षाने हंडा मोर्चा काढलाय.शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात  हा मोर्चा काढण्यात आलाय. दादर, लालबाग, परळ या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो..जे पाणी मिळतं, तेही गढूळ असतं.त्यामुळे  ठाकरे पक्ष आक्रमक झाले आहेत.

  • नाशिक मनपाच्या साडेचार 4 हजार कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर 

    दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाच्या साडेचार 4 हजार कर्मचा-यांना  20 हजार बोनस जाहीर झालाय. तसेच मानधनावर असलेल्या विविध विभागात काम करणाऱ्या 550 कर्मचाऱ्यांना 10 हजार दिवाळी बोनस जाहीर झालाय.. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर 9 कोटी 55 लाखांचा बोजा पडणार आहे.

  • भाजपचे दिलीपकुमार गायकवाड विधानसभेसाठी इच्छुक

    लातूरच्या उदगीरमधून भाजपचे दिलीपकुमार गायकवाड विधानसभेसाठी इच्छुक आहेत...आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी ते शेकडो कार्यकर्त्यांसह काल रात्री मुंबईकडे रवाना झालेत.. ते आज देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

  • जालन्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार

    जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. घनसावंगीचे ठाकरे पक्षाचे नेते हिकमत उढाण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येत्या 10 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होईल.

  • महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक

    आज महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक होतेय..तिढा असलेल्या काही जागांवर अद्यापही सहमती न झाल्याने आजही चर्चा सुरू राहणारेय....तसंच प्रचाराची रणनितीही या बैठकीत ठरवली जाणारेय....संयुक्त मेळाव्याचे नियोजनही आजच्या बैठकीत होणार आहे.

  • सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम

    सोलापुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणारेय... या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुउपस्थित असणारेय.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणारेय..

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link