Maharashtra Politics : अजित पवार गटातले मंत्री नाराज?

Mon, 02 Oct 2023-10:41 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • बेईमान लोक शिवाजी पार्क बळकावतायेत- संजय राऊत

     

    Sanjay Raut vs Sanjay Shirsat : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने आलेत. 50 ते 55 वर्षांपासून आम्ही याठिकाणी दसरा मेळावा करतोय. मात्र आता बेईमान लोक त्यावर दावा करतायेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली हा विचार लोकांपर्यंत जावा म्हणून आम्ही शिवतीर्थासाठी आग्रही आहो असं संजय शिरसाटांनी म्हंटलंय. 

  • आंबेडकरांना अटक करा- नारायण राणे

     

    Prakash Ambedkar vs Narayan Rane : दंगलीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध वंचित बहुनज आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात जोरदार वाद पेटलाय... हल्ला होणार याची माहिती असेल तर आंबेडकरांना अटक करा, अशी मागणी राणेंनी केली होती. त्यावर चिंधीचोर राणेंनी माझ्याशी वाद घालू नये, असा पलटवार आंबेडकरांनी केलाय

  • बुलढाण्यात गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Buldhana Gajanan Maharaj : गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरीचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घडतोय.. सुटाळ पुरा गावात अशोक सातव यांच्या घरी एक व्यक्ती आली जी हुबेहुब गजानन महाराजांसारखी दिसतेय. ही व्यक्ती आल्यानंतर साक्षात महाराज प्रकटले अशी बातमी पसरली आणि या ठिकाणी बघ्यांची आणि भक्तांची गर्दी जमली.. शेकडो लोकं गजानन महाराजांचा जयघोष करत दर्शनासाठी जमा झाले. ही व्यक्ती कोण आहे, कुठून आली याचा आता शोध घेतला जातोय. मात्र गजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरीच्या या प्रकाराची राज्यभर चर्चा सुरु आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांचं आंदोलन मागे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Onion Auction to Resume ​ : अखेर नाशिकमधील कांदाकोंडी 13 दिवसांनंतर फुटलीय. उद्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. शेतक-यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापा-यांनी दोन पावलं मागे घेत आंदोलन मागे घेतलंय. कांदा व्यापा-यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय स्तरावर बैठकही झाली मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर कांदा व्यापा-यांना आंदोलन सुरूच ठेवलं होतं. मात्र शेतक-यांचं वाढतं नुकसान लक्षात घेऊन आता कांदा खरेदी-विक्री सुरू करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • ठाकरे-पिता पुत्र नकली वाघ- चित्रा वाघ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chitra Wagh : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधलाय. एक्सवरून ट्विट करत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. कवितेच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी ही टीका केलीय. ठाकरेंनी वाघाचं कातडं पांघरून सोंग आणलंय. मात्र काँग्रेसचं बाहुलं किती पावलं चालणं अशी खिल्ली चित्रा वाघ यांनी उडवलीय. ठाकरे-पिता पुत्र हे नकली वाघ असल्याचंही चित्र वाघ यांनी म्हंटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • लातूरच्या निलंगा तालुक्यातील गावांना भूकंपाचा धक्का

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Latur Earthquake : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी आणि परिसरात भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता 02.08 इतकी नोंद झालीय. या भूकंपाच्या धक्क्याने हासोरी आणि परिसरातील नागरीक अक्षरशः भयभीत झालेत. धक्का जाणवताच लोक घराबाहेर पडले. यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. गेल्यावर्षीच या गावात सहा धक्के जाणवले होते. आज भूकंपाचा धक्का जाणवताच परिसरातील गावकरी पुन्हा एकदा भयभीत झालेत.

     

  • भाजपची उद्या आगामी लोकसभा तयारी आढावा बैठक

     

    BJP Meeting : भाजपची उद्या आगामी लोकसभा तयारी आढावा बैठक. बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थितीत राहणार. राज्यातील सर्व जिल्ह्यातील लोकसभा तयारीचा आढावा घेतला जाणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार.  उद्या दादरच्या वसंत स्मृतीमध्ये सकाळी  10 ते 5 वाजेपर्यंत  बैठक होणार

  • आमदार रोहित पाटील यांची प्रकृती खालवली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Patil : पाण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान आमदार रोहित पाटील यांची प्रकृती खालवलीय. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमन पाटील यांच्यासह रोहित पाटलांचं सांगलीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. टेंभू सिंचन योजनेच्या 8 टीएमसी पाण्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. याच उपोषणादरम्यान रोहित पाटील यांची तब्येत बिघडलीय. दुपारनंतर त्यांचा ताप वाढला होता. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करू नका, असा शब्दांत भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी उपोषण आंदोलनावर टीका केली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • भारतात पहिल्यांदाच बिहार राज्यात जातनिहाय जनगणना

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bihar Caste wise Census : बिहार सरकारने जातीय जनगणनेचा रिपोर्ट जारी केलाय...देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर करण्यात आलीय...बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 27 टक्के इतकी आहे...तर खुल्या प्रवर्गातील लोकसंख्या 15.52 टक्के इतकी आहे...एससी 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या फक्त 2 टक्के एवढी आहे...महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होतेय...आम्ही बिहारच्या जातीय जनगणनेच्या अहवालाची वाट पाहतोय...असं विधान गेल्या आठवड्यात फडणवीसांनी केलं होतं...त्यानंतर राज्याविषयी काय करायचं ते ठरवू असं फडणवीस म्हणाले...त्यामुळे आता महाराष्ट्रातही जातीय जनगणना होणार का? असा सवाल उपस्थित होतोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अजित पवार गटातले मंत्री नाराज?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics : अजित पवार गटातले मंत्री नाराज आहेत. दोन महिने उलटूनही मंत्र्यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे अजित पवार गटाचे मंत्री नाराज आहेत. काही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पद देण्यासाठी उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. त्यानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप लवकरात लवकर केलं जाईल, असे सांगण्यात आलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • नाशिकमधील कांदा कोंडी फुटणार

     

    Nashik Onion Traders : शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून व्यापारी दोन पाऊल मागे हटणार. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता. व्यापाऱ्यांच्या कोर कमिटीची बैठक सुरू ,थोड्याच वेळात होणार निर्णय. संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय थोड्याच वेळात पालकमंत्री दादा भुसे करणार घोषणा.

  • मनसे महिला आघाडीची टोलनाक्यावर मारहाण

    Chhatrapati Sambhaji Nagar MNS : समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर काम करणारे मराठी कर्मचारी तरुणांना परप्रांतीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करीत मनसे महिला आघाडीच्या महिलांनी टोल नाक्यावरील परप्रांतीय अधिकाऱ्याला मारहाण केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर घडली. मराठी माणसाला त्रास झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला..

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • नांदेडमध्ये 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded Government Hospital : नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. तर सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून फेरीवाल्यांना चोप

     

    Kalyan MNS : कल्याणमध्ये मनसेची फेरीवाल्यांना मारहाण, कल्याण स्कायवॉक वरची घटना. मराठी बोलण्यावरून मराठी तरुणाचा परप्रांतीय फेरीवाल्यांशी झाला वाद. आधी फेरीवाल्यांकडून मराठी तरुणाला मारहाण. मराठी तरुणाची मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रार. तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी स्काय वॉक वर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना दिला चोप.

  • मुंबईत इंडिया आघाडीचं आंदोलन

     

    Mumbai India Aghadi Andolan : केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आज मुंबईत आंदोलन करण्यात आलं. गांधी जयंतीच्या निमित्तानं काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमाजवळ हे आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

  • ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur Raju Shetty : ऊस दरासाठी राजू शेट्टींनी आक्रमक पवित्रा घेतलाय. राजू शेट्टी आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. आजपासून साखर कारखान्यांची साखर बाहेर पडू देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. ऊसाला एफआरपी अधिक 400 रूपये दर द्यावा अशी राजू शेट्टींची मागणी आहे. त्यासाठी 17 ऑक्टोबर पासून ते 7 नोव्हेंबर पर्यत ते आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. 7 तारखेला ऊस परिषदेनं आत्मक्लेश आंदोलनाची सांगता होणारयं. शिरोळच्या दत्त साखर कारखान्यापासून आंदोलनाला सुरुवात होईल. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसे नेत्याच्या विधानावर राजकारण जोरात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Supriya Sule, Sanjay Shirsat & Nitesh Rane : जनतेच्या मनातले मुख्यमंत्री राज ठाकरेच असं विधान मनसे नेत्यांनी केलंय... मात्र यावरुन राजकारण जोरात सुरु झालंय.. आमदार निवडून आले तरच मुख्यमंत्री होता येतं असा खोचक टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री - अभिजीत पानसे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raj Thackeray : राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत...त्यांच्यामुळेच सध्या हिंदू सण जोरात साजरे केले जातायत अशी प्रतिक्रिया अभिजीत पानसेंनी दिलीय...सध्या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक सुरू असून, या बैठकीत लोकसभा मतदारसंघांचा घेतलेल्या आढाव्याबाबत चर्चा होणार आहे...काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली होती...त्याचा अहवाल आज सर्व नेते सादर करणार असल्याची माहिती आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वाघनखांवरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ashish Shelar Tweet : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये चांगलीच जुंपलीय.. भाजप आमदार आशिष शेलारांनी वाघनखांवरुन आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय.. वाघनखं येणार कळताच नकली वाघ का बिथरले? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का? असा सवाल आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • स्वामी समर्थांचा प्रसाद घरबसल्या मिळणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Swami Samarth Prasad Online : अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भक्तांना आता घरबसल्या महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे...ज्या भक्तांना अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेणं शक्य होत नाही, अशा भाविकांसाठी संस्थानाने खास सोय केलीय...भक्तांसाठी महाप्रसाद ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात आलीय... त्यामुळे राज्यभरातील आणि देशभरात असणाऱ्या स्वामी समर्थ भक्तांना आता घरबसल्या महाप्रसाद ऑनलाईन बुक करता येणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शौमिका महाडिक कोल्हापुरातून लोकसभेच्या रिंगणात?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kolhapur Shoumika Mahadik : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक लोकसभेच्या रिंगणात उतरणार का याचीच चर्चा सध्या कोल्हापुरात रंगतेय.. निमित्त ठरलंय ते गणेशोत्सवानिमित्त शौमिक महाडिक यांच्या लागलेल्या पोस्टरचं... शौमिका महाडिक यांच्या फोटोवर दिल्ली अब दूर नही अशी टॅगलाईन लिहिण्यात आली होती. शौमिका महाडिक या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Crop Loan Policy Changed : पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारने बदल केल्याने शेतक-यांचा हिरमोड झालाय... 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शेतक-यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजदराची योजना सुरू केली होती...मात्र, शासनाने अचानक या योजनेत आता बदल केल्याने शेतकरी हवालदिल झालेयत...बदललेल्या निर्णयामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आता 6 टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार आहे...ही 6 टक्के रक्कम शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून देणार असल्याचं नव्या परिपत्रकात सांगण्यात आलंय...मात्र, सूट द्यायचीच आहे तर मग सुरुवातीला पैसे शेतक-यांकडून घेता तरी कशाला...? शासन खरंच हे पैसे देणार आहे का...? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेयत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भरधाव ट्रकनं 10 जणांचा चिरडलं, 4 ठार, 6 गंभीर जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Buldhana Accident : बुलढाण्याच्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालाय...भरधाव आयशर ट्रक झोपडीत घुसल्याने झोपलेल्या 10 मजुरांना चिरडलंय...या अपघातात 4 मजूर ठार झालेयत...तर 6 जण गंभीर जखमी झालेय...नांदुरा तालुक्यातील वडनेर इथे ही घटना घडलीय...सगळे मजूर हे महामार्गाच्या कामासाठी आले होते...ते झोपलेले असताना हा अपघात घडलाय...जखमींवर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार  सुरू असून, अपघाताची चौकशी सुरू आहे...

    बातमी पाहा - बुलढाण्यात झोपडीत घुसला भरधाव ट्रक; चार मजुरांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नाशिकमध्ये लेझरचा 6 जणांच्या दृष्टीवर परिणाम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Laser Light : नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकीतल्या लेझर लाईटमुळे सहा तरुणांच्या दृष्टीवर कायमचा परिणाम झालाय.. या सहा जणांची दृष्टी परत येण्याची शक्यता नसल्यात जमा आहे... गणपती विसर्जन मिरवणुकीतला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. विसर्जन मिरवणुकीत डीजे डॉल्बीसोबत लेझर लाईट्स लावण्यात येतात. प्रखर प्रकाशझोतांच्या लेझरमुळे डोळ्यांना दुखापत होते. थोड्या वेळासाठी नजर अंधुक होते.   काहीवेळा डोळ्यांचा पडदा जळू शकतो. तेव्हा विसर्जन मिरवणुकीची मजा घेताना डोळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला भाजप सुरुंग लावणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivsena Vs BJP : भाजपने लोकसभेसाठी मिशन 45 प्लसचं लक्ष्य ठेवलंय.. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत.. त्यासाठी मुंबईतही भाजपने विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलीय.. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावण्याची तयारी भाजपने सुरु केलीय.  दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात ठाकरेंचे अरविंद सावंत यांच्या विरोधात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय... वरळी, भायखळा, शिवडी, मुंबादेवी या विधानसभा मतदारसंघासाठी रणनीती आखण्यात आलीय.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • लालबाग राजा चरणी भाविकांचे भरभरुन दान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Lalbaugh Raja Donation : लालबागच्या राजाच्या चरणी यंदा भाविकांकडून भरभरुन दान आलंय...10 दिवसांत राजाच्या दानपेटीत साडे तीन किलो सोने, 64 किलो चांदी आणि 5 कोटी 16 लाखांची रोख रक्कम भाविकांनी दानपेटीत टाकलीय...यावेळी एका भक्ताकडून लालबागच्या राजाला इलेक्ट्रिक बाईक अर्पण करण्यात आलीय...सध्या या सर्व वस्तूंचा लिलाव सुरू असून, भाविकांनी वस्तू घेण्यासाठी गर्दी केलीय...जवळपास एक किलोचा सोन्याचा हार, चांदीची गदा, सोना चांदीचे मोदक, सीजन क्रिकेट बॅट, सोन्याचा मुलामा दिलेला चांदीच मुकूट भक्तांनी अर्पण केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुमन पाटील, रोहित पाटील यांचं बेमुदत उपोषण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli Suman Patil & Rohit Patil : दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमन  पाटील आजपासून बेमुदत उपोषणावर बसणार आहेत.. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रोहित पाटीलसुद्धा उपोषणावर बसतील.. सांगलीतल्या 17 गावांचा टेंभू सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी त्यांनी केलीय.. प्रस्ताव मंजूर असतानाही तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या 17 गावांचा समावेस टेंभू योजनेत करण्यात येत नसल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. तेव्हा या गावांचा समावेश टेंभू योजनेत होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार सुमन आणि रोहित पाटील यांनी केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जुन्नरमध्ये शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : जुन्नरमध्ये शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.. जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अतुल बेनके सध्या अजित पवार गटात आहेत.. त्यामुळेच शरद पवार या ठिकाणी नव्या उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा आहे. त्यातच शरद पवारांनी काल जुन्नरमधले काँग्रेस नेते सत्यशील शेरकर यांचीही भेट घेतली.. युवक काँग्रेसच्या माध्यमातून सत्यशील शेरकर हे शेतक-यांचे तसंच युवकांचे प्रश्न सोडवत असतात.. विधानसभा निवडणुकीसाठी सत्यशील शेरकर यांचं नाव आघाडीवर आहे.. त्यामुळे शरद पवार आणि शेरकरांच्या भेटीनंतर पवार जुन्नरमध्ये नव्या उमेदवाराच्या शोधात आहेत का याची जोरदार चर्चा सुरु आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • गुन्हेगारांसाठी निवडणूक कठीण?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Election Commission : निवडणुकीत गुन्हेगारांना तिकीट का दिलं हे आता जाहीर करावं लागणार आहे... उमेदवार आणि राजकीय पक्षांनाही निवडणुकीआधी मतदारांना उमेदवारांचा गुन्हेगारी रेकॉर्ड सांगावा लागणार आहे... गुन्हेगारांचा राजकारणात प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे मोठं पाऊल उचललंय... तिकीट दिलेल्या उमेदवारांच्या  गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावा लागणार आहे.. राजस्थान निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतलाय.. तसंच राजस्थान निवडणुकीपासून यंदा पहिल्यांदाच घरातूनही मतदान करता येणार आहेत.. वृद्ध नागरिक तसंच 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना घरातून मतदानाचा हक्क बजावता येईल.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कंत्राटी तहसीलदार नियुक्ती आदेश मागे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalgaon Zee 24 Taas Impact : झी 24 तासवर बातमी दाखवताच कंत्राटी तहसीलदार नियुक्तीचे आदेश मागे घेण्यात आलेयत... खुद्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीच ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश दिलेयत...जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती...ही बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही कंत्राटी तहसीलदार नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी केली...झी 24 तासने ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर महसूलमंत्र्यांनी ही जाहिरात तत्काळ रद्द करा, अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिका-यांना दिल्यायत...तसंच याबाबत सविस्तर खुलासाही मागवलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link