Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Sat, 02 Sep 2023-10:23 pm,

Latest Updates

  • उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalana Uddhav Thackeray : हे निर्घृण सरकार आहे. आंदोलक म्हणजे आतंकवादी नाहीत, वेळ पडल्यास आंदोलकांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा करेन असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलाय. जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. त्यांनी अंतरवाली सराटीत आंदोलकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस किली. तर अशोक चव्हाणांनीही मराठा आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोमवारी संभाजीनगर बंदची हाक

     

    Sambhajinagar Close : जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदची हाक देण्यात आलीय... सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे.. मराठा क्रांती मोर्चाकडून छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागातही बंद पाळण्यात येणार आहे.. तोडफोड न करता आंदोलन करा असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या विनोद पाटील यांनी केलंय..

  • भारत वि. पाकिस्तान मॅच पावसामुळं रद्द

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान मॅच पावसामुळे रद्द झालीय. दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. या मॅचध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल स्वस्तात आऊट झाल्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पांड्यांनं डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 138 रन्सची पार्टनरशीप केली. ईशाननं 82 तर हार्दिक पांड्यानं 87 रन्स केले. या दोघांच्या कामगिरीमुळेच भारत 266 रन्सपर्यंत मजल मारू शकला. मात्र पावसामुळे पाकिस्तानची इनिंगच होऊ शकली नाही. त्यामुळे मॅच रद्द करण्यात आली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जालन्यातील लाठीचार्ज दुर्दैवी घटना - शिंदे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chief Minister Eknath Shinde : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलीय. जालन्यातील लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असंही एकनाथ शिंदेंनी म्हंटलंय. मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलंय. 

    बातमी पाहा - 'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वन नेशन, वन इलेक्शनसाठी 8 सदस्यीय उच्चस्तरीय समिती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    One Nation One Election Committee : वन नेशन, वन इलेक्शनसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करण्यात आलीय.. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही 8 सदस्यीय समिती नेमण्यात आलीय... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझादांचा या समितीत समावेश आहे. त्याशिवाय ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे, १५ व्या वित्त आयोगाचे माजी चेअरमन एन. के. सिंह,  लोकसभा सचिवालयाचे माजी सचिव सुभाष कश्यप, माजी मुख्य दक्षता अधिकारी संजय कोठारीही समितीत असणार आहेत... केंद्रीय विधी राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि विधी खात्याचे सचिव नितीन चंद्रा हे समितीत विशेष निमंत्रित असतील...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत रविवारी मराठा संघटनांचं आंदोलन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Maratha Protest : जालन्यातील लाठीचार्जचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिलीय. दादरमधल्या हुतात्मा कोतवाल उद्यान इथं सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणारंय. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनानंतर मुंबईमध्ये विभागवार आंदोलन केली जाणार आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवारांचा राज्य सरकारकडे रोख

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar On Jalana Lathicharge : जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा सवाल करत शरद पवारांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केलीय. सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला असा आरोपही पवारांनी केलाय. तर दुसरीकडे मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र आणि राज्याने पुढाकार घ्यावा. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू न देता तोडगा काढावा, राष्ट्रवादीचं सहकार्य राहिल अशीही स्पष्ट भूमिका शरद पवारांनी जाहीर केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुधीर मुनगंटीवारांच्या ताफ्याला काळे झेंडे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sudhir Mungantiwar Black Flag : जालनामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झालाय.. हिंगोलीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले.. औंढावरुन नांदेडकडे सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.. तेव्हा काळे झेंडे दाखवत जालन्यातल्या घटनेचा निषेध करण्यात आला.. याआधी औंढामध्येही सुधीर मुनगंटीवार यांना घेराव घालण्यात आला होता...शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज का करण्यात आला असा सवाल यावेळी मराठा बांधवांनी सुधीर मुनगंटीवारांना केला..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • रविवारी बुलढाणा बंदची हाक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Buldhana Protest : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणी मराठा संघटना आक्रमक झाल्यायेत. बुलढाणा जिल्ह्यात या घटनेच्या निषेधार्थ उद्या बंदची हाक देण्यात आलीये.. त्याचवेळी बुलढाणा शहरात मुख्यमंत्र्यांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे.. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचं आवाहन सकल मराठा समाजानं केलंय. त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रद्द करायची मागणी सकल मराठा समाजानं केलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात आजपासून पुढील 4 दिवस पावसाचे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Rain Prediction : राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी.. कारण जवळपास पूर्ण ऑगस्ट महिना दडी मारलेला पाऊस आजपासून सक्रीय होतोय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात उद्यापासून पुढचे 3 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह, विदर्भ, मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात 3, 4 आणि 5 सप्टेंबरपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. सोबतच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावासाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई एअरपोर्टवर टॅक्सीचालकांची गुंडगिरी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Airport Rada : मुंबई एअरपोर्टवर टॅक्सीचालकांनी गुंडगिरी करत राडा घातला. जी २० साठी लागू करण्यात आलेल्या सुरक्षा नियमांमुळे टॅक्सीचालक नाराज झाले. टॅक्सीचालकांनी महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण केलीय. महिला सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झालीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - मुंबई विमानतळावर टॅक्सी चालकांची गुंडगिरी; महिला सुरक्षा रक्षकाला मारहाण

  • जालना आंदोलनात आतापर्यंत 64 जखमी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalana Police Injured : जालन्यातील आंदोलनात आतापर्यंत 64 जण जखमी झाले आहेत. यात 57 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. या 57 पैकी 19 महिला कर्माचारी आहे. 20 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येतंय. तर या आंदोलनात आतापर्यंत 7 नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाचं उपोषण आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला. त्याचं रूपांतर दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये झालं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Udayanraje Bhosale Live | Marathi News LIVE Today :  'पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध', 'जखमींच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी', 'मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा', 'लाठीचार्जची न्यायलयीन चौकशी करा', उदनराजेंची राज्य सरकारकडे मागणी. 'इतर समाजाला न्याय मग मराठा समाजाला का नाही?', 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत काल चर्चा केली', 'मराठा समाजाला न्याय का मिळत नाही', उदयनराजेंचा सवाल. 'शांततेत आंदोलन चालू ठेवावं', उदयनराजे भोसलेंचं आवाहन. 'आतापर्यंत मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार नाही', 'शांततेत आंदोलन चालू ठेवावं',उदयनराजे भोसलेंचं आवाहन. 'आतापर्यंत मराठा मोर्चात कोणताही अनुचित प्रकार नाही', 'मराठ्यांनी 57 मोर्चे काढले, सर्व मोर्च शांततेत','सर्वांनी एकत्र बसून आरक्षणावर तोडगा काढवा' उदयनराजे यांचं वक्तव्य

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आंदोलनात बळाचा वापर करण्याची गरज नव्हती', 'पोलिसांनी लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती', 'मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही घेतला होता', 'संभाजीराजे, उदयनराजे याठिकाणी आले याचा आनंद', 'मराठा आंदोलन बदनाम होणार नाही याची काळजी घ्या', शरद पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल.

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कालची घटना अत्यंत दुर्दैवी' ,'सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही', 'आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने संघर्ष करू', 'मोठ्या प्रमाणावर पोलीस या ठिकाणी आणले गेले', 'एका बाजूने चर्चा तर दुसरीकडे पोलीस उतरवले',  'रुग्णालयात जखमींची भेट घेतली त्यांना छर्रे मारलेत', 'आंदोलकांनी कोणतीही कायदा हातात घेतला नाही', शरद पवार यांची माहिती.

  •  सरकारला जाती-पातीवरून दंगली घडवायच्या आहेत- संजय राऊत

     

    Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लाठीचार्जवरून सरकारवर निशाणा साधलाय. सरकारला जाती-पातीवरून दंगली घडवायच्या आहेत. याचीच ही ठिणगी जालन्यात पडल्याचं राऊतांनी म्हटलंय.तर मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीवरील लक्ष हटवण्यासाठी हा लाठीहल्ला झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय...या प्रकरणात सरकारच दोषी असून, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय..

  • छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalna Maratha Andolan Update : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू,दावलवाडी फाट्याजवळ आंदोलन सुरू,आंदोलक झाले आक्रमक, रस्त्यावर येऊन आंदोलकांचं आंदोलन

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today :  'गॅस स्वस्त झाल्या डाळी महागल्या', 'गॅस स्वस्त केला पण शिजवायचं का?', 'शिवसेना भाड्यावर चालत नाही निष्टेवर चालते',  'भाजप म्हणजे भाड्याने जमावलेला पक्ष','लोकांचा सरकारवरील विश्वास उडालाय', 'प्रधानमंत्री आभास योजनांचा काळ सुरु झालाय', 'शिवसेना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी काढली नाही', 'बाळासाहेबांनी भाजपसोबत जाण्यासाठी पक्ष काढाला नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today :  'हुकूमशाहा देशात जन्माला येऊच द्याचा नाहीये', 'हुकूमशाहीला चिरडण्यासाठी इंडिया आघाडी','कुटुंब व्यवस्था नाकारणाऱ्यांनी घराणेशाहीवर बोलू नये','जालन्यात कार्यक्रम घेण्यासाठी आंदोलन मोडीत', 'हे सरकार खोक्यातून जन्माला आलंय', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारला टोला.'खरंच तुम्हाला योजनांचा लाभ मिळालाय का?','कर्नाटकात बजरंगबलीचा नारा देऊन भाजप हारलं', उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा.

     

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'आंदोलनकर्त्यांना भेटायला मंत्र्यांना वेळ नाही', 'सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लय भारी', 'तुमच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागू शकता का?', 'आदेशानंतर आंदोलकांवर लाठीमार', 'आता फक्त चौकशीचा फार्स', 'बारसूमध्ये असाच लाठीमार केला', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. 'गणपतीत विशेष अधिवेशन कशाला?', 'सोयीप्रमाणे संसदेत निर्णय बदलले जातायत', 'मणिपूरवर बोलायला सरकारला वेळ नाही', 'विशेष अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा निकाली लावा', उद्धव ठाकरेंचा  केंद्र सरकारला टोला.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'एका व्यक्तीविरोधात आमचं आंदोलन नाही' ,'आज संध्याकाळी जालन्यामध्ये जाणार', 'मुंबई, इंडिया एकत्र करून दाखवली', 'सरकारचं कुणीही जालन्यात गेलं नाही', 'आंदोलन सुरू आहे हे माहिती नव्हतं का?','आमच्या आघाडीनं विरोधकांच्या पोटात गोळा', 'कसली सखोल चौकशी करणार आहात?', 'एक फूल दोन हाफला आंदोलनाची माहिती नाही का?', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल.

  • जाफ्राबादमध्ये मराठा आंदोलन पेटलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jafrabad Maratha Andolan : जाफ्राबाद मध्ये मराठा आंदोलन पेटलंय आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळपोळ केलीये.. रस्त्यावर टायर जाळून जालन्यातील मारहाणीचा निषेध करण्यात आला.. पोलिसांनी केलेल्या मारहानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • बदनापूरमध्ये मराठा आंदोलकांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवली

     

    Jalna Maratha Andolan Update : जालना बदनापूरमधील मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलंय. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवलीय...मराठा आंदोलकांना मारहाण केल्याने बदनापुरात कडकडीत बंद आहे...यावेळी संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केलीय...यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरील वाहतूक ठप्प झालीय...

  • जालन्यात पोलिसांचा हवेत गोळीबार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalna Maratha Andolan Update : जालना शहरात पुन्हा आंदोलन चिघळलंय. अंबड चौफुली भागात आंदोलन पेटलंय. आंदोलकांनी पुन्हा जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही जाळपोळ केलीय. पोलिसांनी वातावरण निवळण्यासाठी हवेत गोळीबार केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • जालन्याच्या घटनेबाबत देवेंद्र फडणवीसांची शिंदेंसोबत चर्चा- सूत्र

     

    Jalna Maratha Andolan Update : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कालच्या जालन्याच्या घटनेबाबत चर्चा केली...यानंतर फडणवीसांनी लाठीचार्ज करण्यासाठी जबाबदार कोण याची चौकशी करा असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालकांना दिलेयत. अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

  • उद्धव ठाकरे घेणार जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray on Jalna Maratha Andolan  : उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालन्याला जाणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ते विमानाने रवाना होणार आहेत. अंबड आणि आंतरवाली सराटी या गावांना भेट देऊन ते आंदोलकांची भेट घेतील. पोलीस लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांचीही ते विचारपूस करणार आहेत. शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्यांचीही ते भेट घेतील.

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • आदित्य L1चं आज प्रक्षेपण होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aditya L1 : चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11.50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल... पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • मुंबईत मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक

     

    Maratha Kranti Morcha meeting today in Mumbai : जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांना मारहाण केल्यानं मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालीय...मराठा क्रांती मोर्चाने सरकारचा निषेध केलाय...आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मुंबई तातडीची बैठक बोलावलीय...दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी मंदिरात ही बैठक होणार आहे...त्यामुळे पुन्हा मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे...

  • जालन्यात पोलिसांकडून बळाचा गैरवापर झाला- अजित पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar on Jalna Maratha Andolan : पोलिसांकडून बळाचा गैरवापर झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आंदोलकांना त्यांनी शांततेचं आवाहन केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • संभाजीराजेंनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

     

    Sambhaji Raj met the Maratha protesters in Jalna : संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलनस्थळी भेट दिली...यावेळी संभाजीराजेंनी आंदोलनकर्त्यांची चर्चा केली आणि मारहाणीबद्दल घटनेची माहिती जाणून घेतली.

  • धुळे-सोलापूर महामार्गावरील सर्व बस गाड्या रद्द 

     

    Jalna Maratha Andolan Update : धुळे सोलापूर महामार्गावरील सर्व बस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने सर्व बस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. एसटी महामंडळाच्या बस गाड्या जाळल्यामुळे सोलापूर हायवेवरील बस गाड्या बंद. औरंगाबादवरून बीड सोलापूर उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यांकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक प्रवासी सिडको बस स्थानकात अडकले. गाड्या रद्द केल्यामुळे सिडको बस स्थानकात गाड्यांचीही गर्दी झालीये. आज दिवसभर गाड्या बंद राहणार.

  • Vijay Wadettiwar Live | Marathi News LIVE Today : 'सरकारनं घटनेची चौकशी करावी', 'लाठीमाराची घटना सरकार पुरस्कृत', 'गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा', विजय वडेट्टीवार यांची मागणी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • मराठा समाजाकडून बीड बंदची हाक

    जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनकर्त्यांवरती झालेल्या लाठीचार्ज नंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. सकाळपासूनच बीड शहरामध्ये रस्त्यांवरती शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झालेला आहे. प्रशासनाच्या वतीने सर्वांना शांततेचं आव्हान करण्यात आलेला आहे. 

  • परभणीत बस डेपोमधून वाहतूक बंद

    जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी रात्री परभणी येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज मानवत आणि पाथरी शहर बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. तालुका स्तरावर आंदोलन आखणी केली जात आहे. तर परभणी शहरातील खानापूर फाटा येथे एका बसच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे परभणी परिवहन विभागातील सातही बस डेपोमधून बस सकाळ पासून बंद ठेवण्यात आल्याची माहिती परभणी परिवहन विभाग प्रमुख बी एस डफले यांनी दिली.

  • मराठा क्रांती मोर्चाची बीड बंदची हाक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Maratha Kranti Morcha : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • जालन्यात शरद पवार घेणार मराठा आंदोलकांची भेट 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : शरद पवार थोड्याच वेळात जालन्याला रवाना होणार. जालन्यात शरद पवार घेणार मराठा आंदोलकांची भेट.  अंतरावली सराटी गावात पवार भेट देणार. आंदोलकांना पवार करणार शांततेचं आवाहन

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalna Maratha Andolan Update : उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. आता जीव गेला तरी माघार नाही. मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलीय. रात्री पुन्हा 11.30 वाजल्यापासून सगळेजण उपोषणाला बसलेयत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण

     

    Jalna Maratha Andolan : जालन्याच्या अंतरावली सराटी इथे काल मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मात्र आज परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी तुफान जाळपोळ केली. आंदोलकांनी 15 बसगाड्या जाळल्या. आंदोलकांच्या दगडफेकीत 5 अधिकारी आणि 32 पोलीस कर्मचारी जखमी झाले. रात्रीच्या तणावानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. जाळलेली वाहनं पोलिसांनी दूर करून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सुरू केलाय. काल आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीमार केला. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखर करण्याची आवश्यकता होती. त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी पोलीस गेले असता आंदोलकांनी त्यांनी अडवलं आणि दगडफेक केली, त्यातून लाठीमार झाला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link