Sunetra Pawar MP Banner : सुनेत्रा अजित पवार भावी खासदार?
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
सुनेत्रा अजित पवार बारामतीच्या भावी खासदार? मंत्रालय परिसरात पोस्टर
Sunetra Pawar MP Banner : सुनेत्रा अजित पवार यांची बारामतीच्या भावी खासदार म्हणून मुंबईत पोस्टर्स लागलीत. मंत्रालय परिसरात ही पोस्टर्स लावण्यात आलीत. राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघ लढवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती... त्यानंतर मुंबईत ही पोस्टरबाजी सुरू झालीय. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात वहिनी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा यानिमित्तानं पुन्हा रंगलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सागरी सामर्थ्य ही छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी- मोदी
Prime Minister Modi in Sindhudurga : नौदलातील पदांची नावं भारतीय परंपरेनुसार बदलणार असल्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय... सिंधुदुर्गात आयोजित नौदल कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते यावेळी छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. जिथं नौदलाचा जन्म झाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत नौदल दिन साजरा होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. नौदलाच्या राजमुद्रेत शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा जपण्याची ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
Prime Minister Modi in Sindhudurga : पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनाच्या निमित्तानं कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर तारकर्लीमधे होणाऱ्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण
Prime Minister Modi in Sindhudurga : पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्गात दाखल. नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी कोकणात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिराला मोदींनी दिली भेट.. शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर ते तारकर्लीमधे होणाऱ्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात होणार सहभागी. यावेळी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करतील.
लक्ष्मण हाकेंचा मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा
Laxman Hake : मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्यांनी राजीनामा दिलाय. मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिलाय. वैचारिक मतभेदामुळे राजीनामा दिल्याचं पत्र हाकेंनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना पाठवलंय. दोन महिन्यात मागासवर्ग आयोगाच्या चार सदस्यांनी राजीनामे दिलेत. बालाजी किल्लारीकर, लक्ष्मण हाके, बबनराव तायडे आणि संजय सोनवणे यांनी राजीनामा दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना कानमंत्र
Prime Minister Narendra Modi : संसदेचं हिवाली अधिवेशन आजपासून सुरु झांलय.. हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.. यावेळी त्यांनी विरोधकांना कानमंत्रही दिला.. पराभवाचा राग विरोधकांनी काढू नका...नकारात्मक दृष्टीकोन बदलून सकारात्मक व्हा, असा सल्ला मोदींनी विरोधकांना दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik In Rajyasabha : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडण्यात आला... अवकाली पावसानं शेतीच्या झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केलाय. त्याला लवकरच मंजुरी द्यावी आणि शेतक-यांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केलीये.. राज्यातील 96 तालुक्यांत अवकाळी पावसानं शेतीच मोठं नुकसान झाल्याचं या अहवालात म्हटलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बीडमध्ये आढळल्या सर्वाधिक कुणबी नोंदी
Beed Kunbi Proof : मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्यात.. जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजारांहून अधिक नोंदी सापडल्याच दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय. यातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटपही करण्यात आलंय.. आठ दिवसापूर्वी बीडमध्ये दहा हजार नोंदी सापडल्या होत्या त्यानंतर आठ दिवसांच्या तपासणीत पुन्हा 3000 हून अधिक नोंदी मिळाल्यात. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कुणबी नोंदींचा आकडा 13 हजारांच्या पुढे गेलाय.. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
तेलंगणात हवाई दलाचं विमान कोसळलं
Telangana IAF Plane Crash : तेलंगणामध्ये हवाई दलाचं विमान कोसळून दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झालाय. दिंडीगुलच्या एअर फोर्स अकॅडमीमध्ये हा प्रकार घडलाय. प्रशिक्षण सुरू असताना सकाळी 8 वाजून 55 मिनिटाला विमान कोसळलं. पिलॉट्स ट्रेनर एअरक्राफ्टने उड्डान घेतल्यानंतर ते कोसळलं. त्यानंतर विमानाला आग लागली. यात प्रशिक्षण घेत असलेल्या दोन्ही पायलटाच मृत्यू झालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सिनेट,पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची रणनीती
BJP New Slogan : सिनेट, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसलीय...मुंबई आमचीच" म्हणत भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरलंय...निवडणूक जिंकण्यासाठी "मुंबई आमचीच" नावाचा विशेष कक्ष भाजपने स्थापन केलाय...भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणुका जिंकण्यासाठी ही रणनीती आखलीय...निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
गिरीश महाजन यांनी दिलेला शब्द पाळावा - मनोज जरांगे
Manoj Jarange On Girish Mahajan : जळगावातल्या सभेपूर्वी जरांगेंनी गिरीश महाजांना इशारा दिलाय.. 'मराठा समाजाला नडण्याचं काम करु नये' महाजनांनी दिलेला शब्द पाळावा असं म्हणत जर शब्द पाळला नाही तर रेकॉर्डिंग व्हायरल करु असा इशारा जरांगेंनी दिलाय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
Congress : 4 राज्यातील निकालामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यताय...काँग्रेसला चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा होती...मात्र, अपेक्षित बहुमत न मिळाल्याने इंडिया आघाडीत काँग्रेस पक्षाचं महत्व कमी होऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिलीय...राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लोकसभा जागा वाटपात वरचढ ठरू शकतात...यामुळे निकालामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्येही चलबिचल असल्याचं सूत्रांनी म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अवकाळीमुळं मिरची उत्पादक संकटात
Nandurbar Chilly Crop : नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय...मिरची पिकावर चुरडा मुरडा आणि डावणी या रोगांचा प्रादुर्भाव झालाय...रोगांमुळे मिरचीचा आकार बदलतोय... झाड मरण्याचे प्रमाण अधिक आहे...त्यामुळे मिरचीचं पोषण होत नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यताय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
Gold Price Hike : सोन्याच्या दरातही विक्रमी वाढ झालीये.. वायदा बाजारात सोन्याला प्रति तोळा 64 हजारांचा दर मिळतोय..शुक्रवारच्या तुलनेत तोळ्यामागे सोन्याचे दर 580 रुपयांनी वाढलेत.. लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालीये.. तसंच डॉलरच्या किंमतीचाही सोन्यावर परिणाम झालाय.... सोन्याचे दर आणखी वाढू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुण्यात भोंदूबाबाचा तरुणाला गंडा
Pune Superstition : पैसे पाडण्याचं आमिष दाखवत भोंदूबाबाने तरूणाला 18 लाख रुपयांना गंडा घातलाय...पुण्याच्या हडपसर परिसरात ही घटना घडलीये...भोंदूबाबा आईरा शॉब याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे या चौघांनी विनोद परदेशीला लुटलं....विनेदला मित्रामार्फत पैशाचा पाऊस पाडण्याचं सांगत 18 लाख रुपये ठेवून पूजा मांडायला लावली...पूजेच्या ठिकाणी तोतया पोलिसांनी धाड मारत तरूणाला मारहाण केली...आणि 18 लाखांसह भोंदूबाबाला घेऊन पोबारा केला...या प्रकरणी फसवणूक झालेल्या विनोदने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस भोंदूबाबासह तिघांचा शोध घेत आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?
State Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...या विस्तारात राहिलेल्या मंत्रिमंडळातील सर्व जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे...मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे...विस्तारात अजित पवार यांच्या गटाकडून सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे...अशी माहिती सूत्रांनी दिलीय...लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाण्याआधी विस्तार झाला तर कार्यकर्त्यांमध्ये चांगला मेसेज जाऊ शकतो...त्यामुळं विस्तार व्हावा अशी अनेक आमदारांची वरिष्ठांकडे मागणी केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा धोका
Cyclone Michaung : 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय... बंगालच्या उपसागरात आज हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे... हे वादळ उद्या आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणारेय. यावेळी वा-याचा वेग ताशी 100 किलोमीटर राहू शकतो. चक्रीवादळामुळे तामिळनाडू सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. तसंच रेल्वेनं 188 गाड्याही रद्द केल्यात... वादळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय... चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 पथकं तैनात केल्या आहेत. आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
एल निनोमुळे भारतावर दुष्काळाचं सावट?
El Nino : वारंवार येणा-या एल निनोचा मोठा फटका भारताला बसणार आहे.. एल निनोच्या प्रभावामुळे देशावर दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता आहे.. तसंच यंदा थंडीचं प्रमाण कमी होणार आहे.. एल निनोच्या प्रभावामुळे पुढच्या वर्षी पावसाच्या प्रमाणातही कमालीची घट होणार आहे.. मान्सूनच्या आगमनाला एल निनोचा अडथळा निर्माण होणार असल्यानं पिकांसाठी अपेक्षीत गारवा मिळणार नाही.. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊ महागाई वाढण्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विधानसभेत जिंकलेल्या खासदारांसमोर पेच
BJP MP Membership May be Cancelled : विधानसभा निवडणुका लढवून त्यात विजय मिळवणा-या खासदारांना येत्या 14 दिवसांत विधानसभा की संसदेचे सदस्यत्व कायम ठेवायचे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे...तसा निर्णय न घेतल्यास त्यांचे संसद सदस्यत्व रद्द होऊ शकते....भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, फग्गनसिंह कुलस्ते यांच्यासह 21 खासदारांना विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरविलं होतं...राज्यघटनेच्या कलम 101 मधील तरतुदीनुसार कोणताही लोकप्रतिनिधी एकाच वेळी दोन सभागृहांचा सदस्य असू शकत नाही...त्याने दोनपैकी एका सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा तसे न केल्यास त्या लोकप्रतिनिधीचे संसद सदस्यत्व रद्द होऊ शकते...संसद सदस्यत्व रद्द झालेली व्यक्ती विधानसभेचा सदस्य म्हणून कार्यरत राहू शकते...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
अर्ज न केलेल्या शिक्षकांना बदलीची संधी
Teacher Transfer : अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी संधी मिळणार आहे...जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सुरू झालाय...2022 साली अर्ज केलेल्या अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करता येणारे...ग्रामविकास विभागाने तसा नवीन आदेश काढलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पीक विम्यासाठी केंद्राकडे धाव
Farmer Crop Insurance : नुकसानग्रस्त शेतक-यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे...नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने केंद्राकडे धाव घेतलीये...विमा कंपन्यांना केंद्राने आगाऊ रक्कम त्वरीत देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आलीये...राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईपोटी 2 हजार 55 कोटींपैकी 1 हजार 245 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे...सुमारे 850 कोटींची रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आलीये...याबाबत कृषी विभागाने केंद्राला पत्र लिहिले आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर
Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौ-यावर येणार आहेत.. नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी त्यांचा हा कोकण दौरा आहे .. या दौ-या दरम्यान त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल.. त्यानंतर ते सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिराला भेट देतील.. शिवाजी महाराजांच्या दर्शनानंतर ते तारकर्लीमधे होणा-या नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.. यावेळी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करतील.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या निमित्त मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठ बंद राहणार आहेत. त्याशिवाय, पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर वाहतूक प्रतिबंध असणार आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -