State Cabinet Expansion Soon : राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

Sat, 07 Oct 2023-11:22 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • शिवसेना-भाजपातील 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State cabinet expansion soon : मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार होणार आहे. घटनस्थापना झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय.शिवसेना-भाजपातील 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती मिळतेय, त्याजागी 2 नवीन मंत्र्यांचा समावेश होणार असल्याचं समजतंय.. शिवसेना-भाजपचा 6/8 चा फॉर्म्युला तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

     

  • टोस्ट, खारी स्वस्त होणार, जीएसटी 12 वरून 5 टक्क्यांवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    GST on Toast-Khare : टोस्ट आणि खारी आता स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारनं टोस्ट खारीवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय़ घेतलाय. टोस्ट खारीवर आता 12 टक्क्यांवरून 5 टक्के जीएसटी करण्यात आलाय. त्यामुळे टोस्ट खारीचे भाव कमी होणार आहेत. दिल्लीतल्या जीएसटी बैठकीनंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी ही माहिती दिलीय. काही नियोजित कारणांमुळे अर्थमंत्री अजित पवार दिल्लीतल्या बैठकीला हजेरी लावू शकले नाहीत असं केसरकरांनी सांगितलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

     

  • शिवसेना आमदार संजय शिरसाटांना समज देण्याची शक्यता- सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Shirsat Statement : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे कान टोचले जाण्याची शक्यता आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांनाच राज्यात ठेवावं असं विधान संजय शिरसाट यांनी केलं होतं. शिरसाट यांच्या विधानामुळे महायुतीतील नेते नाराज आहेत. त्यामुळेच महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिरसाटांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान फडणवीसांनी दिल्लीला जावं की राज्यात राहावं याबाबतचा निर्णय दिल्लीचं नेतृत्व घेईल, शिरसाटांनी औकातीत बोलावं असं भाजप नेते आमदार प्रविण दरेकरांनी म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'सप्तश्रृंगी गडावर सुविधा देणार', '81 कोटी 86 लाखांचा तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर करणार', 'सोमवारी आराखडा मंजूर करणार', उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा.

  • देवेंद्र फडणवीस डमरु वाजवतात, 2 माकडे नाचतात- संजय राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या माकड टीकेवरुन राज्याचं राजकारण तापलंय... देवेंद्र फडणवीस हे मदारी आहेत. ते डमरु वाजवतात आणि दोन माकडं नाचतात अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.. त्यावरच आता भाजप आमदार नितेश राणेंनीही जोरदार पलटवार केलाय.. संजय राऊतांचे मदारी कोण हे त्यांनी स्पष्ट करावं असं आव्हान नितेश राणेंनी दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • राज्यात भाजपच ज्येष्ठ पक्ष, बॉस वगैरे नाही- चंद्रशेखर बावनकुळे

     

    Chandrashekhar Bawankule vs Ambadas Danve : राज्यात भाजपच ज्येष्ठ पक्ष आहे, मात्र बॉस वगैरे नाही असं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय...यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय...यांचे सर्वांचे बॉस पातशाह केंद्रातच बसलेयत...त्यामुळे यांनी कितीही डराव डराव केले तरी केंद्राचं ऐकणार असा टोला दानवेंनी लगावलाय...

  • नवाब मलिकांचा अजित पवारांना पाठिंबा?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nawab Malik's support to Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. निवडणूक आयोगाच्या सुनावणी अजित पवार गटाने आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तो बेचाळीसावा आमदार कोण याचीच चर्चा सुरु झाली होती.. नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात सत्तेत असलेल्या अजित पवारांचा मोठा वाटा असल्याची चर्चाही आहे. कालच अजित पवार गटाच्या समीर भुजबळांनीही मलिकांची भेट घेतली होती.. तेव्हा ते बेचाळीसावे आमदार नवाब मलिक असल्याचीच चर्चा आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • मालाड, गोरेगाव, कांदिवलीत पाणीपुरवठा बंद

     

    Mumbai Water : मालाड, गोरेगाव, कांदिवलीमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद राहणारेय. मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आऊटलेटवरील दहा झडपा नव्यानं बसवण्यात येणारेय.हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणारेय. त्यामुळे या काळात पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय. 

  • अजित पवारांच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचा फोटो

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar Banner : शरद पवारांनी अजित पवार गटाला फोटो वापरण्यास मनाई केल्यानं आता अजित पवार गटाने नवी खेळी केलीय...पवारांचे गुरू असलेले यशवतंराव चव्हाण यांचे फोटो अजित पवारांच्या बॅनरवर लावण्यात आलेयत...उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत...यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या होल्डिंगवर यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आलेयत...शरद पवार यांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये असं सुनावलं होतं...त्यानंतर आता पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो नाशिकमधील बॅनरवर झळकलेयत...

    बातमीचा व्हि़डीओ पाहा-

  • नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Farmers : नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला. नाशिकमध्ये कांदा, टोमॅटो उत्पादत शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ईडीची मुंबईत रेड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी ईडीने मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी केलीय.. बॉलिवूडमधलं मोठं प्रोडक्शन हाऊस अशी ओळख असलेल्या कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर रेड टाकण्यात आलीय.. महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे.. ईडीकडून आर्थिक तपशीलांबाबत माहिती घेतली जात आहे.. महेश मांजरेकर यांच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातही कुरेशी प्रॉडक्शन हाऊसची महत्वाची भूमिका आहे.. तर अनेक दिग्गज बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांसोबत कुरेशीचे फोटोसुद्धा पाहायला मिळतात.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मालेगावमध्ये सिनेमागृहात फोडले फटाके

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Malegaon Theater : नाशिकच्या मालेगावमध्ये शाहरुख खानच्या अतिउत्साही चाहत्यांनी सिनेमागृहात फटाके फोडून धुडगूस घातलाय...प्रेक्षकांनी सिनेमागृह भरलेला असतानाही सुतळी बॉम्बसारखे घातक फटाके फोडण्यात आले...शाहरुख खानच्या जवान सिनेमाचा शेवटचा शो मालेगावच्या कमलदीप सिनेमागृहात पार पडला...त्यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी गर्दी केली होती...त्याचवेळी अतिउत्साही चाहत्यांनी फटाके फोडून गोंधळ घातला...याचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी चार ते पाच संशयित चाहत्यांना ताब्यात घेतलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • Vijay Wadettiwar Live | Marathi News LIVE Today : 'शिवसेनेच्या 16 आमदारांवर कारवाई होणार','भ्रष्टाचारी मंत्र्यांना घरी जावंच लागेल', 'मुश्रीफांना पदावर राहण्याचा अधिकार नाही','राज्यात 3 लुटारुंच सरकार', 'राज्यातील 9 मंत्री भ्रष्टाचारी', 'कारवाईच्या भीतीनं वेळकाढूपणा सुरू', विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारला टोला.

  • Chandrashekhar Bawankule Live | Marathi News LIVE Today :  'फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं','फडणवीसांबाबत भाजप कार्यकर्त्यांची इच्छा','राजकारणात काहीही होऊ शकतं','अजितदादांसोबत आलेल्यांना मोदींचं नेतृत्व मान्य','राज्यात बॉस वगैरे कोणी राहात नाही','आम्ही मित्रपक्षांना कधीही सोडणार नाही','विरोधकांना उमेदवारच भेटणार नाही','लोकसभेसाठी 45+चं भाजपचं टार्गेट','शिंदेंना रोजच जनतेचं समर्थन मिळतंय','निवडणुका जवळ येत जातील तसं अजितदादांना समर्थन वाढत जाईल','राज्यात आम्ही ज्येष्ठ मोठा भाऊ म्हणून सगळं करणार', चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान.

  • मराठा आरक्षणासाठी हालचाली?

     

    Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हालचाली सुरू झाल्यायत...मराठा आरक्षण समिती 11 ऑक्टोबरपासून मराठवाडा दौ-यावर जाणार आहे...कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी समिती गठीत करण्यात आलीय...या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती सदस्यांसह 11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मराठवाडा दौ-यावर आहेत...या दौ-यादरम्यान ही समिती मराठवाड्यातील नागरिकांकडील उपलब्ध कागदपत्र तपासण्याचं काम करणार आहे...जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन करण्यात आलंय...यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे...

  • नागपूर विमानतळावर 72 लाखांचं सोनं जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gold Seized at Nagpur Airport : नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणा-या महिलेला अटक करण्यात आलीये. तिच्याकडून 72 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय.. या महिलेनं पेस्टच्या स्वरुपात बेल्टमध्ये हे सोनं लपवलं होतं.. शारजावरुन ही महिला नागपुरात आली.. त्यावेळी सीमाशुल्कविभागाच्या अधिका-यांनी तिला अटक केली.. तिची तापासणी केली असता तिच्याकडे 1.279 किलो सोनं आढळून आलं..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • आशियाई​ गेम्समध्ये भारताची 100 पदकांची कमाई

     

    Asian Games : आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमने फायनलमध्ये धडक दिलीय.. फायनलमध्ये आता टीम इंडियाची गाठ अफगाणिस्तानसोबत पडेल. टीम इंडियानं सेमी फायनलमध्ये बांग्लादेशचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत बांग्लादेशला फक्त 96 रन्समध्येच गुंडाळलं.. 97 रन्सचं हे लक्ष्य कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा या जोडीनं 10 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. तिलक वर्माने नाबाद 55 तर कॅप्टन ऋतुराज गायकवाडने नाबाद 40 रन्सची खेळी साकारली.. तेव्हा अफगाणिस्तानला फायनलमध्ये लोळवत गोल्ड मेडल जिंका अशीच अपेक्षा आता क्रिकेट फॅन्स करतायत...

  • आशियाई  गेम्समध्ये तिरंदाजीत ओजस देवताळेची सुवर्ण कामगिरी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    Asian Games : भारताच्या ओजस देवताळेने इतिहास रचलाय. आशियाई  गेम्समध्ये तिरंदाजीत ओजस देवताळेने सुवर्ण पदक पटकावलं. आशियाई  गेम्समध्ये तिसरं सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम त्याने केलाय. ओजसने तिरंदाजी कम्पाऊण्डमध्ये भारताच्या अभिषेक वर्माविरोधात विजय मिळवला. त्यामुळे या प्रकारात भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळालं. ओजसने याआधी एशियन गेम्समध्ये टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाऊंडमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. ओजस आणि अभिषेकच्या या सुवर्ण आणि रौप्य मेडलमुळे भारताची मेडल टॅली 99 वर गेलीय. ओजसच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपूरमध्ये त्याच्या राहत्या घरी दिवाळी साजरी केली जातेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • पुण्यात दारूच्या नशेत कारचालकानं अनेक वाहनांना उडवलं

     

    Pune Accident : पुण्यातील झेड ब्रिज जवळ मोठा अपघात झालाय...नारायण पेठ परिसरात दारूच्या नशेत असलेल्या कार चालकाने 3 ते 4 वाहनांना उडवत पादचाऱ्यांना धडक दिली...यामध्ये 2 रिक्षांचा समावेश असून, अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 ते 4 जण जखमी झालेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link