Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय मूदतीपूर्वीच लागणार?

Mon, 11 Dec 2023-10:51 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • उद्यापर्यंत उलट तपासणी पूर्ण करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय मूदतीपूर्वीच लागण्याची शक्यता आहे. 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपूर्वीच निकाल येण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत उलट साक्ष पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या वकिलांना दिले आहेत. उद्या शिंदे गटाचे दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि अखेर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात येणार आहे. 13 ते 15 डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार असून 16 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. तर 20 डिसेंबरनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सुप्रीम कोर्टानं 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुदतपूर्व निकाल येण्याची शक्यता आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • महाराष्ट्रातील कॅसिनो नियंत्रण कायदा रद्द करत असल्याची फडणवीसांची घोषणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Fadanvis on Casino Act : महाराष्ट्रातील कॅसिनो नियंत्रण कायदा अखेर रद्द करण्यात आलाय... उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली... 1976 साली याबाबतचं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही... आता कॅसिनो नियंत्रण कायदा रद्द करत असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • गोळीबारात गजानन तौर यांचा मृत्यू झाल्याची माहिती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jalna Firing : जालन्यात गजानन तौर यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडलीये. गजानन तौर हे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शहरातील मंठा चौफुलीवर काही अज्ञातांनी गजानन तौर यांच्यावर गोळीबार केलाय. या गोळाबारात तौर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने येत होते. पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेनं गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या.

    बातमीचा  व्हिडीओ पाहा -

     

  • आमदारांच्या बैठकीत मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तब

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    New CM of Madhya Pradesh : मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत... भोपाळमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. मोहन यादव मध्य प्रदेशात माजी उच्च शिक्षणमंत्री होते. दक्षिण उज्जैनमधून मोहन यादव आमदार आहेत. ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • कोर्टाचा आजचा निर्णय हा मैलाचा दगड- फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Fadanvis Live | Marathi News LIVE Today : 370चा निर्णय कायम राहिल्यानं भारताचा विजय असल्याची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. हा काश्मीरच्या लोकांचा विजय, भारताचा विजय झालाय असं फडणवीस यांचं वक्तव्य.
    जम्मू-काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असं फडणवीस म्हणाले. कोर्टाचा आजचा निर्णय हा मैलाचा दगड, भारताचा मुकूट चमकत राहिल असं फडणवीस यांचं विधान.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • तुळजाभवानीचं सोनं-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेला हायकोर्टाची स्थगिती

     

    HC on Tuljabhavani Gold : तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी अर्पण केलंलं सोनं आणि चांदी वितळवण्याच्या प्रक्रियाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. विधी आणि न्याय विभागानं या प्रक्रियेला परवानगी दिली होती. मात्र त्याला काही भाविक आणि पुजाऱ्यांनी विरोध केलाय. 2009 पासून तुळजाभवानी देवीच्या चरणी 207 किलो सोनं आणि 2 हजार 570 किलो चांदी जमा आहे. कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत प्रक्रियेला स्थगिती दिलीय, पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणारंय.

  • मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

     

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती बिघडलीय. धाराशिवमधल्या माकणीमध्ये जरांगेंची सभा सुरू होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडलीय. भाषण सुरू असताना जरांगेंना चक्कर आली. जरांगे यांना अशक्तपणा जाणवतोय. जरांगेनी अखेर व्यासपीठावर खाली बसून भाषण केलं. डॉक्टरांनी व्यासपीठावर येऊन जरांगेंची तपासणी केली. जरांगेंना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. जरांगेंनी पुढचे 5 दिवस विश्रांती घेतली नाही, तर किडनीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'ठाकरेंबद्दल सामंतांचा दावा खोटा', खासदार संजय राऊतांचं वक्तव्य

     

    Sanjay Raut on Uday Samant : आमदार अपात्रता सुनावणीत उदय सामंतांनी गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय...2019 साली मविआ सरकारमध्ये शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं...शिंदेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंना भेटलो त्यावेळी आश्वासन दिल्याने मी मंत्रिमंडळात सामील झाल्याचा दावा सामंतांनी केलाय...यावर राऊतांनी प्रतिउत्तर दिलंय...कोणतंही सरकार आलं तरी सत्तेत राहणं हाच सामंतांचा हेतू आहे...आमचं सरकार आल्यावर ते आमच्याही दारात येतील...मात्र, त्यांना आम्ही घेणार नसून, त्यांचा दावा खोटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय...

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'शेतीसाठी नाशिक जिल्हा महत्त्वाचा','धोरण ठरवण्यांकडून मात्र शेतीला किंमत नाही','शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही','कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत नाही','कांदा पिकवणारा शेतकरी लहान आहे','नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल','अर्थव्यवस्थेत नाशिकच्या शेतकऱ्यांची नोंद','त्याला काही पैसा मिळाला तर दंगा करायचं कारण नाही','महाग आहे तर कोण  म्हणतो मग तुम्हाला कांदा खा?','आंदोलनाशिवाय दिल्लीला कळत नाही','कांदा निर्यातबंदी सरकारनं उठवलीच पाहिजे', शरद पवार यांचं वक्तव्य.

  • Vijay Wadettiwar Live | Marathi News LIVE Today : 'राज्यात दुष्काळ जाहीर करावा','दुष्काळ जाहीर करण्यासाठी पत्रं दिली','वारंवार मागणीनंतर दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर','40 तालुकेच फक्त दुष्काळ घोषित केले','बैल गेला आणि झोपा केला','सत्ताधारी आमदार पाहून दुष्काळ जाहीर होतो ','विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप.

  • 'मुंबई महापालिकेत ठाकरेंनी हातसफाई केली', मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Shinde on Aditya Thackeray : मुंबई महापालिकेत ठाकरेंनी हातसफाई केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय.. येत्या निवडणुकीत जनताच ठाकरेंची सफाई करणार असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय... मुंबईतल्या डीप क्लिनिंग कॅम्पेनमध्ये मुख्यमंत्र्यांनी कचरा वाहून ट्रॅक्टर चालवला. त्यावरु आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. त्यावरच आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार पलटवार केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचा भाव घसरला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pimpalgaon Onion Rate : कांदा निर्यात बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर सरासरी 1500 रुपयांनी उतरलेयत...तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने जाणारा कांदा आज अडीच हजार रुपये दराने विकला जातोय...सध्या उत्पादित होणारा लाल कांदा जास्त टिकू शकत नसल्याने शेतकऱ्याला तातडीने विकणे भाग असते...त्यामुळे मिळेल तो भाव पदरात पाडून घेण्याचा कल शेतकऱ्यांचा दिसून आलाय...आज दुपारी लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव सुरू होणार आहे...त्यानंतर टप्प्याटप्प्यांना सर्वच बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीला सुरुवात होईल...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच- सुप्रीम कोर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Supreme Court Verdict on Article 370: जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय...सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठातील सरन्यायाधीशांसह तीन न्यायमूर्तींनी हा निर्णय दिलाय...
    केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतील ‘कलम 370’ रद्द केलं...आणि या राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केली...केंद्राचा हा निर्णय संविधानाला धरूनच असून, जम्मू-काश्मीरला भारताचंच संविधान लागू असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय...या निकालानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'ठाकरेंनी भाजपशी युतीचं आश्वासन दिलेलं', उदय सामंत यांचा दावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणीत उदय सामंतांनी दोन गौप्यस्फोट केलेयत...व्हीप हा केवळ सभागृहाच्या कामकाजासाठी जारी केला जातो..मात्र, मला दाखवलेला कागद व्हीप नसून पत्र असू शकतं, असं पत्र खाजगी कार्यक्रमासाठी दिलं जाऊ शकतं...त्यावरील सही माझी नसल्याचा दावा सामंतांनी केलाय...तर त्याआधी मविआ सरकारमध्ये शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं...शिंदेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंना भेटलो होतो असं सामंतांनी म्हटलंय...ठाकरेंनी आश्वासन दिल्याने मी मंत्रिमंडळात सामील झाल्याचा दावा सामंतांनी केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'कांदा प्रश्नावर गोयल यांच्याशी चर्चा','नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार','युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे आदेश','पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार','इथेनॉलसंबंधी दिल्लीत चर्चा करणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.

     

  • पीडित महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

     

    Victimized Woman : हिवाळी अधिवेशनात महिला धोरण आणण्याआधी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय...बलात्कार आणि अॅसिड हल्ल्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मनोधैर्य योजनेचा निधी 10 लाखांपर्यंत वाढवलाय...यासोबतच पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाक गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थाचा समावेश करून मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेयत...याआधी 1 लाखांची मदत मिळायची...मात्र, आता 10 लाख रुपये मदत मिळणार आहे...योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, तसेच वन स्टेप सेंटरचे केंद्र प्रशासक यांचा समावेश असेल...

  • Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कांद्यासंदर्भात नितीन गडकरींना भेटलो','दिल्लीत अमित शाहांची भेट घेणार','फडणवीसांसोबत अमित शाहांची भेट घेणार','शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढणार','शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकार निर्णय घेईल', 'कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसणारा निर्णय घेणार', मराठा आरक्षणासंदर्भात  अजित पवार यांची प्रतिक्रिया.

     

  • गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gopichand Padalkar : भाजप नेते गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करणा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. मराठा समाजाच्या 10 ते 15 अज्ञात आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत.. इंदापूरच्या प्रशासकीय भवनासमोर दूध दरवाढीच्या मागणीसाठी दीपक काटे उपोषणाला बसले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी गोपीचंद पडळकर आले होते. तेव्हा मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर चप्पलफेक केली तसंच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली होती..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी उदय सामंतांची आज साक्ष नोंदवणार

     

    MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय... मंत्री उदय सामंत यांची आज उलटतपासणी सुरु आहे... मंत्री दीपक केसरकरांची आज उलटतपासणी केली जाणार होती.. मात्र त्याऐवजी आता उदय सामंत आज आपली साक्ष नोंदवतायत. याआधी झालेल्या सुनावणीत खासदार राहुल शेवाळेंची उलटतपासणी करण्यात आली... शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदेच असल्याचा दावा या सुनावणीवेळी राहुल शेवाळेंनी केला होता.. राहुल शेवाळेंची उर्वरित उलटतपासणी आता मंगळवारी होणार आहे...

  • पिंपळगाव  बाजार समितीत आजपासून कांदा लिलाव

     

    Pimpalgaon Market Committee : आजपासून पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू होणार आहे...कांदा निर्यातबंदी केल्यानं गेल्या तीन दिवसांपासून कांदा लिलाव बंद होता...मात्र, पिंपळगाव बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालीय...त्यामुळे कांदा खराब होऊ नये यासाठी शेतक-यांच्या हितासाठी व्यापा-यांनी कांदा लिलावाचा निर्णय घेतलाय...नाशिक जिल्ह्यातील ठप्प झालेल्या बाजार समित्या आजपासून खुल्या होतायत...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • उद्धव ठाकरे आज अधिवेशनात उपस्थित राहणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत.. दुपारी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल होतील.. तर संध्याकाळी उद्धव ठाकरे बैठकही घेणार आहेत.. या बैठकीला विदर्भातल्या महिला आघाडीच्या प्रतिनिधी उपस्थित असतील.. त्यानंतर रात्री ठाकरे गटाच्या आमदारांसोबत उद्धव ठाकरे स्नेहभोजन करणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • काँग्रेसचा मोर्चा आज अधिवेशनावर धडकणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Congress Andolan : शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली असून आज अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे... अवकाळीने राज्यात शेतक-यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतक-यांच्या मदत देण्याच्या मागणीसाठी हा हल्लाबोल करण्यात येणार आहे.. तसंच वाढलेली महागाई आणि बेरोजगारीविरोधातही काँग्रेसचा हा मोर्चा असेल... दिक्षाभूमीवरुन काँग्रेसच्या या मोर्चाला सुरुवात होऊन तो अधिवेशनावर धडकेल...हजारो काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • UIDAIकडून आधार कार्ड संदर्भात मोठा बदल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aadhar Card :  फिंगरप्रिंट शिवायही आता आधार कार्ड बनवता येणारेय. UIDAIनं हा सर्वात मोठा बदल केलाय. ज्यांचे बोटांचे ठसे व्यवस्थित उमटत नाहीत, ज्यांना हातच नाही अशा व्यक्तींना आधार कार्ड काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यांच्यासाठी UIDAI नं आयरिस स्कॅनचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. आयरिस स्कॅनमध्ये डोळे स्कॅन केले जातात. त्यामुळे ज्यांच्या फिंगरप्रिंट घेण्यात अडचणी आहेत. त्यांचे डोळे स्कॅन करून आधार कार्ड बनविण्यात येईल. UIDAI नं यासंदर्भात एक्स हँडलवर माहिती दिलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • अवकाळीवर आज विधानसभेत चर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     Nagpur Winter Session : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज विधानसभेत चर्चा होणाराय.. प्रश्नोत्तराच्या तासानंतर अवकाळीच्या मुद्यावर अल्पकालीन चर्चा होणाराय...अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात अडकलाय...अवकाळीने प्रचंड नुकसान झालं असून, शेतक-यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चेची दाखवली होती.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अखेर चर्चेला परवानगी दिलीय... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link