Uddhav Thackeray Group State Leaders Meeting : उद्धव ठाकरे गट विधानसभा संपर्कप्रमुखांची उद्या बैठक

Wed, 12 Jun 2024-5:17 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर

Latest Updates

  • द. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू

     

    Kuwait Fire : दक्षिण कुवेतमध्ये एका इमारतीला भीषण आग लागलीय.. यात 41 लोकांचा दुर्देवी मृत्यू झालाय.. मृतांमध्ये बहुतांश भारतीयांचाही समावेश आहे.. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत भारतीय मजूर राहत असल्याची माहिती मिळतेय. मंजफ शहरात ही घटना घडलीय. आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे... या आगीत 50 पेक्षा जास्त जण जखमी झालेत..

  • पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Parth Pawar :  पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय...पार्थ पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात गेले होते...तेथे त्यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली...राज्यसभेसाठी छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी आणि आनंद परांजपेही इच्छुक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रस्सीखेच दिसून येतेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'बजरंग सोनवणेंनी अजित पवारांना फोन केला', आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Mitkari on Bajrang Sonwane : बीडमधले शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा गौप्यस्फोट, अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. बीडच्या बाप्पाचा दादांना फोन अशी पोस्ट अमोल मिटकरींनी एक्स समाजमाध्यमावर करुन याबाबतची माहिती दिली. तसंच सोनवणेंनी अजित पवारांना फोन केला असून, मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता, मिटकरी यांनी वर्तवली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • उद्धव ठाकरेंनी बोलावली उद्या सर्व 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray Group State Leaders Meeting : उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्व 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपर्कप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. उद्या दुपारी साडेबारा वाजता सेना भवनात ही बैठक होणार आहे. यात राज्यभरातील संपर्कप्रमुखांकडून विधानसभानिहाय आढावा घेतला जाणार आहे.

     

  • लोकसभा निवडणुकीतील यशानिमित्त उद्धव ठाकरे गटाचा उद्या मेळावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray Group Meeting : शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा. बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन, आदित्य ठाकरेंसह प्रमुख नेतेही राहणार उपस्थित. लोकसभा निवडणुकीत मुंबईत मिळालेल्या चांगल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन. विधानसभा आणि बीएमसी निवडणूक तयारीसाठी सज्ज राहण्याचे दिले जाणार आदेश. मुंबईतील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचा उद्या सायंकाळी 5 वाजता मेळावा.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • सुनेकडून सासऱ्याच्या हत्येची 1 कोटीची सुपारी, तपासात कट उघड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Hit and Run Case : नागपूरच्या हिट अँड रन केसमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनंच सास-याच्या हत्येची 1 कोटी रुपयांना सुपारी दिल्याचं, पोलीस तपासात उघड झालं. विशेष म्हणजे सुपारी म्हणून तब्बल 1 कोटी रुपये, तसंच जागेसहित बारचं लायसन्स देण्याचं ठरलं होतं. सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीवर सून अर्चना पुट्टेवार हिचा डोळा होता. यासाठी तिनं नवऱ्याच्या ड्रायव्हरलाच हत्येची सुपारी दिली होती. तर 17 लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून दिले गेले होते. त्यानुसार नागपूरच्या बालाजीनगर परिसरात झालेल्या 22 मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना गाडीखाली चिरडण्यात आलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा सारा प्रकार अपघात म्हणून दाखवण्यात आला. मात्र नागपूर क्राईम ब्रँचच्या युनिट चारनं कसून तपास करुन, सूत्रधार सून अर्चनासह 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. अर्चना ही सरकारी कर्मचारी आहे.

     

  • चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrakant Patil On Uddhav thackeray : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरेंनी घेतली...आजारपणा असताना ते खूप फिरले आणि 9 सीट मिळवल्या...भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय...2019 ला सरकार कंटिन्यू झाल असतं तर युती कंटिन्यू झाली असती...मात्र उद्धव ठाकरेंनी देखील याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे असा सल्ला पाटलांनी दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Supreme Court On Neet Exam : सुप्रीम कोर्टात आज NEET परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणा-या याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं NEET परीक्षा आयोजित करणा-या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' म्हणजेच NTA ला नोटीस बजावली आणि पेपर फुटीबाबत उत्तर मागितलंय. एनटीएच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, त्यामुळे आम्हाला उत्तर हवं असल्याचं कोर्टानं म्हटलं. नीट परीक्षेच्या निकालाबाबत वाद सुरूच आहे. याप्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान निकालाच्या आधारे समुपदेशनावर बंदी घालण्यासही सुप्रीम कोर्टानं नकार दिला. उत्तर मिळाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 4 जून रोजी NEET UG-2024 परीक्षेचा निकाल जाहीर केला होता आणि त्यात 67 विद्यार्थी टॉपर्स आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी निकालात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे...असा अंदाज दिसतोय... असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय...सरकारकून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरु आहे...जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठे यांना चांगला कचका दाखवतील असा इशाराही जरांगे यांनी दिलाय...दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात पालेभाज्यांचे दर गगनाला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Vegetable Price : पालेभाज्यांचे दर गगनाला भिडलेत. कोथिंबिरीचा दर  प्रतिजुडी 100 रुपयांवर गेलाय. तर इतर पालेभाज्यादेखील महागल्यात. महिना भरापासून भाज्यांची दरवाढ सुरुच आहे. महिनाभरापूर्वी नाशिक जिल्ह्याचं तापमान चाळिशीपार गेलं होतं. त्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाज्यांची आवक कमी होतेय. पुढील दोन ते तीन आठवडे पालेभाज्यांचे दर असेच चढे राहण्याची शक्यताय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On Devendra Fadanvis : ईडी, सीबीआय, आयटी बाजूला ठेवून मैदानात या...ईडी, सीबीआयशिवाय आमच्यासमोर 1 मिनिटदेखील मैदानात दिसणार नाही, असं आव्हान खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिलंय...मी पळणारा नाही, लढणारा व्यक्ती आहे, असं विधान फडणवीसांनी केलं होतं...त्यावर राऊतांनी आता फडणवीसांना चॅलेंज दिलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jayant Patil : पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात चार महिन्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय...पक्षांतर्गत जाहीर वक्तव्यावर बोलत असताना जयंत पाटील यांनी माझे महिने अनेकांनी मोजले आहेत...मी केवळ चार महिनेच अध्यक्षपदावर राहणार आहे...माझ्याबद्दल काही तक्रार असल्यास पवार साहेबांना येऊन सांगा...मात्र जाहीर बोलू नका असं बोलून पवारांसमोरच जयंत पाटलांनी खदखद बोलून दाखवली...काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी ट्विट करुन नाराजी व्यक्त केली होती. आता जयंत पाटलांचा रोख त्यांच्याकडेच नाही ना असा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यामुळे निर्माण होतोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jayant Patil : पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात चार महिन्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय...पक्षांतर्गत जाहीर वक्तव्यावर बोलत असताना जयंत पाटील यांनी माझे महिने अनेकांनी मोजले आहेत...मी केवळ चार महिनेच अध्यक्षपदावर राहणार आहे...माझ्याबद्दल काही तक्रार असल्यास पवार साहेबांना येऊन सांगा...मात्र जाहीर बोलू नका असं बोलून पवारांसमोरच जयंत पाटलांनी खदखद बोलून दाखवली...काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी ट्विट करुन नाराजी व्यक्त केली होती. आता जयंत पाटलांचा रोख त्यांच्याकडेच नाही ना असा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यामुळे निर्माण होतोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

     

  • विधानसभेत पवार वि. पवार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Baramati : आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय...अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केलीय...युगेंद्र पवारांचे युवा कार्यकर्ते आज शरद पवारांना भेटले...त्यावेळी त्यांनी  बारामतीचा दादा बदला अशी मागणी केली...युगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष घालत आहेत...एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली...त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना होण्याची शक्यताय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भाजप चालवण्यात विनोद तावडेंची खूप मोठी भूमिका - चंद्रकांत पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chandrakant Patil On Vinod Tawade : भाजप पक्ष चालवण्यात विनोद तावडेंची खूप मोठी भूमिका आहे...तावडे कर्तुत्त्ववान नेतृत्त्व असून, जिथे पाठवू तिथे यश कसं मिळेल यासाठी बारकाईने विचार करतात...असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय...विनोद तावडेंसाठी खूप ऑप्शन्स चर्चेत आहेत...त्यामुळे विनोद तावडे मोठे झाल्यास मला खूप आनंद होईल असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jaikwadi Dam Water Level : मराठवाड्याला काहीसा दिलासा देणारी बातमी... पहिल्याच पावसानं जायकवाडीच्या पाणीसाठ्यात महिनाभर पुरेल एवढी वाढ झालीय. धरणाच्या पाणीसाठ्यात अर्धा टक्के वाढ झालीय. धरणाचा पाणीसाठा रविवारी 3.90 टक्के होता आणि सोमवारी 4.50 टक्क्यांवर पोहचलाय. धरणात 4 हजार 837 क्युसेक पाण्याची आवक सुरूये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुलवामात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pulwama Ammunition Seized : पुलवामात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळला.. सहा किलोच्या दोन IED, एके-४७ रायफल आणि पिस्तुल जप्त .. लश्कर आणि सीआरपीएफच्या तपासात शस्त्रसाठा आढळला  ..दहशतवाद्यांना मदत करणा-याकडे हा स्फोटकांचा साठा आढळला .

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस झालाय. माजलगाव अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आलाय. तर लेंढि नदीसह अनेक नद्या ओसंडून वाहतायेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी झालंय. जूनच्या दुस-या आठवड्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • धाराशिवच्या उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय. माडज, वाघदरी, गुगळगाव या भागात नदी-नाले दुथडी भरून वाहतायत. पहिल्याच पावसात उमरग्यात पाणीच पाणी झालं. रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. पावसामुळे बळीराजा सुखावलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई शहर,उपनगरांत आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    IMD Alert On Mumbai : मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 24 तासांत ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलीय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर पालघर , ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • NEET परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

     

    NEET Exam Hearing : कथित पेपर लीकमुळे NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी करणा-या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणाराय...न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे...नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याने निकालाची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आलीय...याबाबत झी मीडियाने विद्यार्थ्यांची बाजू लावून धरल्यानंतर नीटची परीक्षा घेणारी NTA संस्थेनं यात गैरप्रकार झालं नसल्याचं स्पष्ट केलं...मात्र, विद्यार्थ्यांचा रोष पाहता याची चौकशी करण्यासाठी NTAने चौकशी समिती नेमली...धक्कादायक बाब म्हणजे NTAने प्रदीप कुमार जोशी यांना स्वतःच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष केलं...यामुळे संस्थेचा प्रमुख त्याच्या संस्थेवरील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीचा प्रमुख कसा असू शकतो, असा प्रश्न विचारला जातोय...

  • मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे...गेले 3 दिवस जरांगे पाटलांची डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली...मात्र, त्यांनी उपचार घेतलेले नाहीत...त्यामुळे जरांगे यांची प्रकृती आज चौथ्या दिवशी काहीशी खालावलीय...राज्य सरकारने मराठा समाजाच्या सगे सोयरे कायद्यासह इतर मागण्यांबाबत तातडीनं कारवाई करावी...अन्यथा लोकसभेला यांची थोडी फजिती झाली विधानसभा निवडणुकीत यांचे सगळे उमेदवार पाडून टाकू असा गंभीर इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.दरम्यान आज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रशासन किंवा राज्य सरकारचं शिष्टमंडळ येतं की नाही...? याबाबत मराठा आंदोलकांना प्रतिक्षा लागलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link