Sanjay Gaikwad : `...एकनाथ शिंदेंना जीव मारण्याचा कट`, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
गुजराती फलक तोडफोडप्रकरणी, ठाकरे गटाच्या 3 शिवसैनिकांना अटक
Vandalism of Gujarati board : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये गुजराती बॅनर तोडल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या तीन शिवसैनिकांना अटक करण्यात आलीय. मुंबई महापालिकेच्या तक्ररीवरून ही अटकेची कारवाई करण्यात आलीय. घाटकोपरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्यानातील गुजराती भाषेत लिहिलेला बोर्ड फोडला. घाटकोपर पूर्वेत उद्यानात 'मारू घाटकोपर' या बोर्डवरून संताप व्यक्त होत होता. या बोर्डवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. हे नाव काढून टाकण्याची मागणी मनसेनेही केली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत हा बोर्ड फोडून टाकला आणि माझं घाटकोपर असं ठसठशीत मराठीत लिहिलेला बोर्ड झळकावला होता.
ललीत पाटीलचं खासदार हेमंत गोडसेंसोबत संबंध- सुषमा अंधारे
Sushma Andhare on Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्यानंतर सुषमा अंधारेंनी आता शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनाही लक्ष्य केलंय. ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा हेमंत गोडसेंसोबत फोटो असून याचीही माहिती समोर यायाला हवी असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलंय. ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमध्ये 9 महिने अॅडमिट होता त्याला नेमका कोणता आजार होता? कुणाच्या आशीर्वादानं त्याला रूग्णालयात इतके दिवस ठेवण्यात आलं असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ड्रग्ज माफियाला ललित पाटीलला पोलिसांची मदत?
Lalit Patil Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी नवं सीसीटीव्ही फुटेज पुणे पोलिसांच्या हाती लागलंय.. ललित पाटील स्वतःहून पळाला की, त्याला पळायला पोलीस कर्मचा-यांनी मदत केली, असा सवाल हे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर उपस्थित होतोय... ससून हॉस्पिटलमधून पळून ललित ज्या हॉटेलमध्ये पोहोचला, त्याच हॉटेलमध्ये अवघ्या एका तासात काळे नावाचा पोलीस कर्मचारी पोहोचल्याचं नव्या सीसीटीव्हीतून स्पष्ट होतंय... आपल्या हाताला झटका देऊन ललित पळाल्याचा दावा काळेनं केला होता... मात्र या सीसीटीव्हीमुळं पोलीस कर्मचारीच संशयाच्या भोव-यात सापडलाय. २ ऑक्टोबर रोजी संध्याकाली ७ वाजून ४७ मिनिटाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. ससूनमधील पोलिसांना मॅनेज करून ललित पाटील अनेकदा त्याच हॉटेलमध्ये जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... याच प्रकरणावरुन पुण्यातले आमदार रवींद्र धंगेकर यांनीही प्रश्न उपस्थित केलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात रोमन साम्राज्यातील दागिने
Tuljabhavani Khajina : तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात रोमन साम्राज्यातील दागिने आढळून आले आहेत. हे दागिने आठव्या शतकातील असल्याचं सांगण्यात येतंय. यात सर्वोच्च कॅरेटचा हिराही आढळलाय. तसच शिवकालीन जगदंबा लिहिलेला अलंकारही सापडलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे उद्या वाहतुकीसाठी बंद
Mumbai-Pune Expressway : मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर उद्या दुपारी १२ ते १ या वेळेते वाहतूक बंद राहणार आहे. गँट्री बसवण्याचं काम असल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते १ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. गँट्री बसवण्याचं काम पूर्ण झाल्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूक खुली कऱण्यात येईल
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शिंदे गटाचा दसरा मेळावा क्रॉस मैदानात
Shinde Group on Dasra Melava : शिवसेना शिंदे गटाचा यंदाचा दसरा मेळावा मुंबईतील क्रॉस मैदानात होणाराय... झी २४ तासनं पाच दिवसांपूर्वीच याबाबतची बातमी दिली होती... त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब झालं... शिवसेनेचा दसरा मेळावा क्रॉस मैदानावर घेण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतलाय.. गेल्यावर्षी बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला होता. मात्र मेट्रोच्या कामामुळं यंदा दसरा मेळाव्यासाठी क्रॉस मैदानाची जागा निश्चित करण्यात आलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
संभाजीनगरमध्ये 300 वर्ष जुन्या भांड्यांवर जातीचा उल्लेख
Kunbi Certificate : संभाजीनगरमध्ये शिंदे समितीची बैठक झाल्यानंतर नागरिकांनी कुणबी जातीचे पुरावे असल्यास ते द्यावे असं आवाहन केलं होतं, त्यानुसार संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात लोक पुरावे घेऊन येतायेत. कुणी जुने कागद आणतायेत तर कुणी निजामकाली दस्तऐवज सादर करतायेत..संभाजीनगरच्या बेगमपुरात भागात राहणा-या लोकांनी चक्क 300 वर्ष जुनी भांडी पुरावे म्हणून आणली आहेत, त्यावेळी भांड्यावर जात लिहिण्याची पद्धत होती असा त्यांचा दावा आहे. त्या भांड्यांवर जातही लिहण्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
उद्धव ठाकरेंविरोधात असे आरोप सहन करणार- चंद्रकांत खैरे
Chandrakant Khaire : उद्धव ठाकरेंविरोधात असे आरोप सहन करणार नसल्याचा इशारा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलाय. एकनाथ शिंदेचं असले कटकारस्थानं करत फिरतात असा पलटवार त्यांनी केलाय. तर गायकवाडांचा आरोप खोटा असल्याचं आमदार संजय पाडवी यांनीही म्हटलंय.
Z+सुरक्षा देऊ नका, ठाकरेंनी सांगितलं- शंभूराज देसाई
Shambhuraj Desai : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता, या संजय गायकवाडांच्या आरोपांना तत्कालिन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दुजोरा दिलाय... शिंदेंना Z+ सुरक्षा देण्याबाबत बैठक झाली... मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. अशाप्रकारे Z+ सुरक्षा देता येणार नाही, असं ठाकरेंनी सांगितलं, अशी माहिती देसाईंनी झी २४ तासशी बोलताना दिली...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट- संजय गायकवाड
Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे खासदार संजय गायकवाड यांनी केलाय. शिंदे बाहेर पडले नसते तर शिंदेंचा घात झाला असता. शिंदेंना ठाकरेंनी Z+ सुरक्षा का नाकारली? असा सवाल खासदार संजय गायकवाड यांचा सवाल.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
भारताचा मोस्ट वॉन्टेड पाकिस्तानात दहशतवादी ठार
Terrorist Killed in Pathankot : भारताला हवा असणाऱ्या दहशतवाद्याला पाकिस्तानात गोळ्या घालून ठार करण्यात आलंय. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या शाहिद लतिफ या दहशतवाद्यावर सियालकोटमध्ये गोळीबार करण्यात आला. सात वर्षापूर्वी पठाणकोट वायूदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा तो सूत्रधार होता. तो NIA च्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. एका मशिदीत शाहिदची हत्या करण्यात आलीय. दोन हल्लेखोर मोटारसायकलवरून आले. त्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Supriya Sule Live | Marathi News LIVE Today : 'हेडगेवारांच्या नावानं मतं मिळत नाहीत, त्यांना कळलं', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. 'देशमुखांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं', 'पालकमंत्री ठरवायला शिंदे दिल्लीत जातात', 'फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हे वाढतात', 'राज्याची परिस्थिती गंभीर', सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला.
10वी-12वी परीक्षा शुल्कात 10% वाढ
SSC-HSC Exam : दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्के वाढ करण्यात आलीय.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतलाय..पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेत ही शुल्क वाढ होणारंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नबाम रेबिया केसचा सुप्रीम कोर्ट पुनर्विचार करण्यास तयार
Nabam Rebia Case : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार झालंय...उद्या सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाने तेव्हा हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडे जावं अशी विनंती केली होती. एका अविश्वास प्रस्तावाच्या नोटीसने विधानसभा अध्यक्षांचे अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत याचा फैसला होणार आहे...शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असेल...मात्र, यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी आता लांबणीवर जाणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नागपुरात सापडली देवीची मूर्ती?
Nagpur : नागपूरच्या समता नगर परिसरात खोदकाम करताना देवीची मूर्ती सापडल्याचा दावा करण्यात आलाय.. देवीचा मुखवटा असलेली मूर्ती आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.. खोदकामादरम्यान आढळलेली मूर्ती बाहेर काढून लोकांनी पूजा करायलाही सुरुवात केलीय. दर्शनासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने घटनास्थळी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.. मूर्तीबाबत अनेक प्रकारचे दावे करण्यात येत असले तरी झी २४ तास या व्हिडिओची कोणतीही पुष्टी करत नाही...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
हमास-इस्रायल युद्धावरील पोस्ट मिया खलिफाला भोवली
Mia Khalifa : हमास-इस्रायल युद्धावरील पोस्ट करणं पॉर्नस्टार मिया खलिफाला चांगलंच भोवलंय..मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती...त्यानंतर सोशल मीडियावर वेगळचं वॉर सुरू झालं... तिच्या पोस्टमुळे प्लेबॉय कम्युनिटीने मियासोबतचं नातं संपवलंय...तिचं चॅनलही डिलीट केलंय....एवढंच नाही तर कॅनडाचा ब्रॉडकास्टर शापिरोनेही मियाला डीलमधूनही बाहेरचा रस्ता दाखवलाय...शापिरोचा मिया खलिफासोबतचा करार अंतिम टप्प्यात होता...मात्र एका वक्तव्यामुळे तीचं कोट्यवधींचं नुकसान झालंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शिवसेना आमदार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी
Thackeray Vs Shinde : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत उद्याच सुनावणी होणार आहे...विधानसभा अध्यक्षांकडून वेळापत्रकात बदल करण्यात आलाय...ही सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार होती...मात्र, एकदिवस आधीच ही सुनावणी घेतली जाणार आहे...सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या अशी मागणी ठाकरे गटाने केलीय...यावर उद्या दुपारी दोन वाजता विधान भवनात सुनावणी होणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
महादेव अॅपनंतर लायन बुक ईडीच्या रडारवर
Lion Book App on ED's radar : सट्टेबाजी अॅपचे नवे बॉलिवूड कनेक्शन उघड झालंय...महादेव अॅपनंतर आता लायन बुक ईडीच्या रडारवर आलंय...लाय बुक अॅपच्या सक्सेस पार्टीला अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टीसह अभिनेत्री डेझी शहा, सोफी चौधरी या कलाकारांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आलीय...महादेव अॅपनंतर आता हे नवे अॅप समोर आलं असून, त्यात झालेले व्यवहार, त्यातील बॉलिवूडचा सहभाग या गोष्टींचा तपास आता ईडीच्या अजेंड्यावर आलाय...लायन बुक असं या अॅपचं नाव असून, महादेव अॅपप्रमाणेच भारत आणि पाकिस्तानात या अॅपच्या माध्यमातून सट्टेबाजी चालत असल्याचं समोर आलंय...महादेव अॅपप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यंत 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय...तसेच सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस देखील जारी केलीय...या दोघांनी आणखी काही वेबसाईट आणि अॅप तयार केल्याचा ईडीला संशय आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात नवीन याचिका दाखल
Maratha Reservation : मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात नवी याचिका दाखल करण्यात आलीय. आरक्षणाचं आश्वासन राज्य सरकार उपोषणकर्त्यांना कशाच्या आधारे देतंय? आरक्षण कसं देणार आहात? याचा आराखडा राज्य सरकारनं कोर्टासमोर सादर करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केलीय. मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा सुप्रीम कोर्टाचा निकाल असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन राज्य सरकार आंदोलनकांना का देतंय असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. या याचिकेत राज्य सरकारसह, मुख्य सचिव आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनाही प्रतिवादी करण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
आश्रमशाळेतील मुलाचा मृत्यू कशामुळं?
Nanded Boy Death : नांदेडच्या माहुर तालुक्यातल्या शासकीय आश्रमशाळेत एका आठ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू झालाय. रोहित मुकाडे असं या मुलाचं नाव आहे. तो दुसरीत शिकत होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. माहुरच्या पांडवलेणी इथल्या आश्रमशाळेत रोहित शिकत होता. काल दुपारी त्याची तब्येत बिघडली. शिक्षक आणि कर्मचा-यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्याला दुस-या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रोहितचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याच्या चौकशीची मागणी नातेवाईकांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
IND vs AFG Live Score Updates: भारत-अफगाणिस्तान पीच रिपोर्ट
अरुण जेटली स्टेडियमच्या पीचवर सामान्यत: जास्त धावा केल्या जातात. गेल्या सामन्यात या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेने 400 धावांचा टप्पा ओलांडला होता.
तलाठी भरती परीक्षेचा 15 डिसेंबरला निकाल
Talathi Exam : तलाठी भरती परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर ठरलीये.. 15 डिसेंबरला तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचं भूमी अभिलेख विभागानं ठरवलंय.. या सर्व उत्तिर्ण उमेदवाराना नव्या वर्षात 15 ऑगस्टला नियुक्तिपत्र देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीनं नियोजन करण्यात आलंय.. तलाठी भरती परीक्षेनंतर उत्तरतालिकांवरील हरकती घेण्याची मूदत 8 ऑक्टोबरला संपली. या हरतकी टीसीएस कंपनी कडून एकत्र केल्या जात आहेत. यातील योग्य हरकतींचं 3 नोव्हेंबरपर्यंत निराकरण केलं जाणार आहे. ही सर्व प्रक्रीया पार पडल्यानंतर 15 डिसेंबरला परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
लेझर शोविरोधात ग्राहक पंचायतीची हायकोर्टात धाव
Grahak Panchayat In High Court : मिरवणुकीत घातक लेझर बीमच्या विरोधात ग्राहक पंचायतीने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीये. गणेशोत्सवात डीजे आणि लेझर बीममुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यासंदर्भात राज्य शासन जोपर्यंत नियमावली विकसित करत नाही आणि त्याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी धोकादायक लेझर बीम विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी आणावी, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा
High Court On Sarpanch Reservation : राज्यातल्या दोन हजारांवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. कारण सध्या असलेल्या आरक्षणानुसारच ग्रामपंचायत निवडणुका घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.. राज्यभरातल्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने निश्चित करा आणि हे आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाऊ देऊ नका असे आदेशही हायकोर्टाने दिलेत.. नागपूर जिल्ह्यात सरपंचपदाचं आरक्षण 50 टक्क्यांवर केल्याने हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. त्यावर हायकोर्टाने हा निर्णय दिला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
महायुतीत समित्यांचं वाटप ठरलं
Mahayuti Formula : सरकारमधील तीन पक्षांमध्ये महामंडळ, विधिमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय...भाजपला 50% तर शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 25% जागा मिळणार आहेत...काल झालेल्या बैठकीत समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांची नावं निश्चित झाली असून विधिमंडळ समिती अध्यक्षांची यादी अध्यक्षांकडे देण्यात आलीय...समित्यांच्या सदस्यांमध्ये फक्त सत्तारूढ पक्षाच्या आमदारांचा समावेश न करता विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही स्थान देण्याची भूमिका घेण्यात आलीय...तसंच समिती आणि महामंडळांचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता महायुती निवडणुकांच्या तयारीला लागलीय...मविआच्या वज्रमूठ सभेप्रमाणे महायुतीचे संयुक्त मेळावे घेतले जाणार आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -