Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 12 Dec 2023-9:59 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रकात बदल 

     

    MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शनिवारी, रविवारी सुनावणी रद्द करण्यात आली आहे. 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करणार असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस लेखी उत्तरं घेणार.

  • सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्याला विरोध- नितेश राणे

     

    Nitesh Rane : 'मुख्यमंत्र्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये', अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत केली... सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला आमचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rajya Magasvargiya Aayog​ : राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आता सेवानिवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलीय..न्या. आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं आता त्यांच्या जागी न्या. शुक्रे यांना नेमण्यात आलंय.. त्याशिवाय मागासवर्ग आयोगाच्या तिघा सदस्यांनीही राजीनामे दिले होते. त्यांच्या जागी आता डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. मारूती शिकारे आणि प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे यांची नवे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आलीय..

     

  • 'जुन्या पेन्शनसाठी पेन्शन नको, सरकारला टेन्शन द्या', उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Uddhav Thackeray : जुन्या पेन्शनसाठी आक्रोश करावा लागत असेल तर सरकारला पेन्शन नाही, टेन्शन देण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच आपण मुख्यमंत्री असतो, तर जुन्या पेन्शनसाठी मोर्चाच काढावा लागला नसता, असं ठाकरेंनी म्हटंलय. उद्धव ठाकरेंनी आज नागपुरात सरकारी कर्मचा-यांच्या मोर्चाला भेट दिली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT स्थापन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची SIT चौकशी होणारेय. त्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय. एसआयटीत अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय बंसल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश आहे. याप्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा असं आवाहन त्यांनी दिलंय. तर एसआयटी लावायची असेल तर लावा आम्ही देखील आमच्याकडची माहिती उघड करू अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • नागपुरात युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली

     

    Nagpur Youvah Sangharsh Yatra : नागपुरात युवा संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकलीये. पोलिसांनी  युवा संघर्ष यात्रा अडवली आहे. बॅरिकेड्स टाकून कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं आहे.

  • Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक','जुन्या पेन्शनबाबत तोडगा काढणार','अहवालावर चर्चा करून निर्णय घेऊ','कुणाची स्क्रिप्ट वाचतात, ते लक्षात येईल','राज्य मागासवर्ग आयोगावर दबाव नव्हता','राजीनामे दिल्यानंतर पवारांची भेट घेतली','पोलिटिकल मास्टरनं सुपारी दिलीय', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप.

  • Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'मी पवार साहेबांचा चेला आहे','मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, शरद पवारांचा चेला','आम्ही झुकलो नाही, वाकलो नाही','एक फूल आणि 2 डाऊटफूल',संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका.'मध्य प्रदेशची हवा महाराष्ट्राला लागणार नाही','आता देश सांगतोय मोदी आया, तो देश गया',मोदी 2024 ला येत नाहीत ही आमची गॅरंटी', संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल.

  • चंदेरी पापलेटला मिळणार जीआय मानांकन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pomfet Fish Got GI Nomination : मासे खवय्यांच्या आवडत्या पापलेटला आता जीआय मानांकन मिळणार आहे... मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली.. तव्यावरचं पापलेट फ्राय असो किंवा झणझणीत कालवण असू दे, पापलेट म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं... पापलेट हा महाराष्ट्रातला सर्वाधिक निर्यात होणारा मासाही आहे.. मात्र महाराष्ट्रात पापलेटचं उत्पादन घटतंय.. तेव्हा पापलेटच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने त्याला राज्य मासा हा दर्जा दिला होता.. आणि आता लवकरच त्याला जीआय मानांकनही मिळणार आहे.. नव्या निर्णयामुळे पापलेट संवर्धनास मदत होण्याची आशा आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rajasthan New CM : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत.... वसुंधरा राजेंनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. भाजप आमदारांच्या आणि पक्ष निरीक्षकांच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आहेत. ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस होते. छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि मध्य प्रदेशात ओबीसी चेहरा दिल्यावर राजस्थानात मुख्यमंत्रीपदी भाजपनं ब्राह्मण चेहरा दिलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • परळी विधानसभा लढण्यास पंकजा मुंडे इच्छुक?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pankaja Munde : काही दिवसांपूर्वी बीड लोकसभेची जागा पंकजा मुंडे लढवणार अशी चर्चा रंगली होती...मात्र, आता परळी विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत पंकजा मुंडेंनी दिलेत...परळीच्या जागेचा निर्णय वरिष्ठ घेतील, असं विधान पंकजांनी केलंय...तर फडणवीस आणि आपल्यात मतभेद असले तरी मित्रत्त्वाचे नातं असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • वंध्यत्वाने निराश दाम्पत्यांसाठी दिलासा?

     

    IVF Proposal : आई बाबा होण्याची इच्छा असलेल्या दाम्पत्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी.. IVF उपचार पद्धतीच्या खर्चासाठी आता सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे... अपत्य प्राप्तीसाठीचे IVF किंवा सरोगसी हे उपचार खार्चिक आहेत.. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत त्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलाय.. या योजनेची मर्यादा पाच लाखांपर्यंत करण्यात आल्याने IVF किंवा सरोगसीचा यात समावेश होऊ शकतो.. राज्य सरकारने हा प्रस्ताव मंजूर केल्यास वंधत्वामुळे अपत्य प्राप्तीपासून वंचित असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळणार आहे

  • अर्थखात्याची दोरी फडणवीसांकडे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar & Devendra Fadanvis : अजित पवार अर्थमंत्री असले तरी फडणवीसांच्या हाती अर्थखात्याची दोरी आहे...अर्थखात्याची प्रत्येक आधी फडणवीसांकडे फाईल जाणार...अमित शाहांच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतरच अजित पवारांना अर्थखातं मिळाल्याची माहिती मिळतेय...फडणवीसांचं वर्चस्व मान्य केल्यावरच अजित पवारांना अर्थखातं मिळालं...असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अर्थखात्याची चावी देवेंद्र फडणवीसांकडे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar & Devendra Fadanvis : अजित पवार अर्थमंत्री असले तरी फडणवीसांच्या हाती अर्थखात्याची दोरी आहे...अर्थखात्याची प्रत्येक आधी फडणवीसांकडे फाईल जाणार...अमित शाहांच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतरच अजित पवारांना अर्थखातं मिळाल्याची माहिती मिळतेय...फडणवीसांचं वर्चस्व मान्य केल्यावरच अजित पवारांना अर्थखातं मिळालं...असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • जागावाटपाबाबत राष्ट्रवादीची नवी भूमिका-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar Camp : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अजित पवार गटाची नवी भूमिका मांडल्याची माहिती अजित पवार गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. लोकसभेत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी खराब कामगिरी असलेल्या खासदारांना डच्चू देण्यात यावा अशी भूमिका अजित पवार गटानं घेतलीय. लवकरच महायुतीची बैठक घेण्यात येणार असून त्या  बैठकीत खासदारांच्या कामगिरीबाबत चर्चा करणार असल्याचंही अजित पवार गटाच्या सूत्रांनी सांगितलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • लक्ष्मण हाके यांना कारणे दाखवा नोटीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Laxman Hake : राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांना नोटीस बजावण्यात आलीय. ठाकरे गटाचे प्रवक्ते असल्याचे कारण देत मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांना मागासवर्ग आयोगानं कारणे दाखवा नोटीस दिलीय. हाके यांनी राज्य सरकारवर विविध आरोप करत राजीनामा दिला होता. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बीएमसीचं ऑडिट, ठाकरे अडचणीत?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sachin Ahir Vs Atul Bhatkhalkar : तर बीएमसीच्या ऑडिटवरून राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यायत...राजकीय हेतूतून बीएमसीची चौकशी होत असून, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची चौकशी करा अशी मागणी सचिन अहिर यांनी केलीय...तर कर नाही तर ठाकरेंना डर कशाला?...भ्रष्टाचाराचा एक एक रुपया बाहेर काढून मुंबईकरांना देऊ अशी प्रतिक्रिया भातखळकरांनी दिलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई महापालिकेचे गेल्या 25 वर्षांचं ऑडिट होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BMC Audit : मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षातील आर्थिक कारभाराचे ऑडिट होणार आहे... उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिलीय...ऑडिटसाठी सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, नियोजन, नगरविकास, वित्त विभागाचे सचिव चौकशी समितीत आहेत...पुढील अधिवेशनात समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे...यामुळे गेली 25 वर्षे बीएमसीवर सत्ता असलेल्या ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय...मात्र, ऑडिटमुळे मिरच्या का झोंबतायत? नागपूर, पुणे महापालिकेची चौकशी करायची असेल तेव्हा करू अशी प्रतिक्रिया सामंतांनी दिलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Winter Session : अवकाळीने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी शुक्रवारी मदतीची घोषणा होणार.. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांची माहिती.. मुख्यमंत्री आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आरक्षण न देण्यासाठी एका नेत्याचा सरकारवर दबाव - जरांगे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मराठा आरक्षण न देण्यासाठी एका नेत्याचा सरकारवर दबाव असून, एकाच्या दबावामुळे मराठ्यांच्या पोरांवर सरकार अन्याय करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय...भुजबळांचं नाव न घेता जरांगेंनी गंभीर आरोप केलाय...कितीही काही झालं तरी आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केलाय...जरांगेंची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...मात्र, आजच्या नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याची माहिती जरांगेंनी दिलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच SIT स्थापन होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Disha Saliyan : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होणारेय. कारण दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राज्य सरकार आजच एसआयटी स्थापन करणारेय. सरकार एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश आजच जारी करणारेत. त्यासंदर्भात राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना आदेश दिलेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • छगन भुजबळांविरोधातील याचिका ईडीकडून मागे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chagan Bhujbal : ईडीने छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घेतलीय... महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या भुजबळांना दोन वर्षांनी जामीन मंजूर झाला होता. भुजबळांना त्यानंतर परदेशात जाण्यासाठीही मंजुरी देण्यात आली.. मात्र यालाच ईडीने हायकोर्टात आव्हान दिलं होतं.. हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आलं होतं.. मात्र ही याचिका कशासाठी केली ते आठवत नसल्याचा अजब दावा ईडीकडून करण्यात आला होता. या दाव्यावर आश्चर्य व्यक्त करत हायकोर्टाने ईडीला वेळ दिला होता. नुकतीच याप्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा ईडीने ही याचिका मागे घेतली.. तसंच त्यांचा पुतण्या समीर भुजबळांविरोधातही याचिकाही मागे घेतलीय... मात्र त्यांचा मुलगा पंकजा भुजबळांविरोधातली याचिका कायम ठेवण्यात आलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता नर्सरी आणि केजीचं शिक्षण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Government Starts KG & Nursary : राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता नर्सरी-केजीचं शिक्षण मिळणार आहे...2023-24 या शैक्षणिक वर्षात बालवाडी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय...यामुळे सरकारी शाळेची पटसंख्या वाढेल...तसेच, शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय...शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'शाळेत चला अभियान' राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त होणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Backword Class Commission : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त होणार आहे...मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडेंचा राजीनामा मंजूर झालाय...त्यामुळे आता मागासवर्ग आयोग बरखास्त होणार आहे...शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन राजीनामा दिल्याचं निरगुडेंनी पत्रात म्हटलंय...निरगुडेंच्या आधी 4 सदस्यांनी राजीनामे दिलेयत...10 पैकी 5 जणांनी राजीनामे दिल्याने आयोग बरखास्त होणार आहे...आज विधीमंडळात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे...त्याआधीच आयोग बरखास्त होणार असल्याची बातमी समोर आल्याने विधीमंडळात गोंधळ होण्याची शक्यताय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सात सार्वजनिक प्रकल्पांमुळे मुंबईत प्रदूषण?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Air Pollution : मुंबईतल्या सात सार्वजनिक प्रकल्पांमुळे शहरात धुळीचं साम्राज्य पसरलंय. हे प्रकल्प हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याच्या बातम्यांची दखल हायकोर्टानं घेतलीय. या प्रकल्पांमुळे प्रदूषण होत आहे की नाही याची संयुक्त पाहणी करण्याचे आदेश महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेत. वांद्रेमधल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण, मेट्रो, बुलेट, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि मधुपार्क मार्ग हे प्रकल्प राबवणा-या कंत्राटदारांकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं उघड झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगलीतील ऊस दर कोंडी अखेर फुटली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangali Raju Shetty : सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याची ऊस दर कोंडी अखेर फुटलीये...36 तासांपासून सुरू असलेलं आंदोलन राजू शेट्टींनी मागे घेतल्याची घोषणा रात्री केली...एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्याचं दत्त इंडियाकडून पत्र देण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी काटा बंद आंदोलन मागे घेतलंय...मात्र, इतर 15 कारखान्यांविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे...त्याचबरोबर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना शिराळा तालुक्यातील दालमिया साखर कारखान्यावर धडकणार असून तेथे आंदोलन करण्यात येणार असल्याचं राजू शेट्टी म्हणालेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • छगन भुजबळांविरोधातील याचिका ईडीकडून मागे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Chagan Bhujbal : ईडीने छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घेतलीय... महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या भुजबळांना दोन वर्षांनी जामीन मंजूर झाला होता. भुजबळांना त्यानंतर परदेशात जाण्यासाठीही मंजुरी देण्यात आली.. मात्र यालाच ईडीने हायकोर्टात आव्हान दिलं होतं.. हे प्रकरण सप्टेंबर महिन्यात सुनावणीसाठी आलं होतं.. मात्र ही याचिका कशासाठी केली ते आठवत नसल्याचा अजब दावा ईडीकडून करण्यात आला होता. या दाव्यावर आश्चर्य व्यक्त करत हायकोर्टाने ईडीला वेळ दिला होता. नुकतीच याप्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा ईडीने ही याचिका मागे घेतली.. तसंच त्यांचा पुतण्या समीर भुजबळांविरोधातही याचिकाही मागे घेतलीय... मात्र त्यांचा मुलगा पंकजा भुजबळांविरोधातली याचिका कायम ठेवण्यात आलीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Tuljabhawani Crown Found : बातमी झी २४ तासच्या इम्पॅक्टची... तुळजाभवानी देवीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट अखेर सापडलाय. देवीला वाहिलेल्या दागिन्यांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल देण्याआधीच हा मुकूट गायब झाल्याचं समोर आलं होतं. झी २४ तासनं ही बाब समोर आणल्यानंतर समितीकडून तातडीनं फेरपाहणी करण्यात आली. त्यामध्ये जुना आणि नवीन दोन्ही मुकूट आढळून आले. हा मुकुट डबा क्रमांक तीनमध्ये नोंदीप्रमाणे सापडलाय. संबंधित मुकुटाची तपासणी करताना त्यावरची नक्षी, त्यावरील कलाकुसर, मुकुटातील हिरे-मोती तेच आहेत का? याची खात्री समितीने केलीय. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवार आज वाढदिवस साजरा करणार नाहीत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar : शरद पवार आज आपला वाढदिवस साजरा करणार नाहीयत. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांवरचं संकट आणि आरक्षणाचा मुद्दा या सर्व गोष्टींमुळे शरद पवारांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. आज शरद पवार कुणाच्याही शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. किंवा कुणाच्याही भेटी घेणार नाहीत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे...आज अवकाळी पाऊस, शेती नुकसान, मराठा आरक्षण आणि मोर्चाने गाजण्याची शक्यताय...अवकाळी पाऊस, शेती नुकसान यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यताय...मुख्यमंत्री शिंदे पीक नुकसान याबाबत मदत जाहीर किती करतात याकडे लक्ष लागलंय...पुरवणी मागणी चर्चा यावर उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देणार आहे. आज पुरवणी मागणी मंजूर करणारे विनियोजन विधेयक मंजूर केले जाईल...तसंच मराठा आरक्षण चर्चा विधानसभेत होणार आहे...मराठा नेते यावर भाषण करणार आहेत...त्याचवेळी छगन भुजबळ हेदेखील बोलणार आहेत...त्यामुळे भुजबळ जरांगे वादावर नेमके सभागृहात काय बोलतात याकडे लक्ष आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link