Solapur Rada : सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीचा प्रयत्न, खासगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीचं आंदोलन
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी 2 RTO अधिकाऱ्यांना अटक
Samruddhi Highway Accident Case : संभाजी नगरमध्ये समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आर टी ओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचं प्रथम दर्शनी सिद्ध झालंय.. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी 2 आर टी ओ अधिका-यांना अटक केलीय.. प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर अशी या आरटीओ अधिका-यांची नाव आहेत.. असिस्टंट इन्स्पेक्टर पदावर ते कार्यरत होते. त्या दोघांनाही सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आलंय.. याप्रकरणी ट्रक चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय... समृद्धी महामार्गावरील या अपघाता १२ जणांचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झालेत... समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास आरटीओ एका ट्रकचा पाठलाग करत असताना हा अपघात घडला...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीचा प्रयत्न
Solapur Rada : सोलापुरात भीम आर्मीचा राडा केलाय. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाई फेकण्याचा प्रयत्न झालाय. खासगीकरणाच्या विरोधात भीम आर्मी संघटनेनं आवाज उठवला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी भीम आर्मीचा शहर अध्यक्ष अजय मैंदर्गीकरला अटक केलीय. मागच्या वेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनं भंडारा उधळला होता, खबरदारीचा उपाय म्हणून त्या कार्यकर्त्याला पालकमंत्री येण्याअगोदरच ताब्यात घेण्यात आलं होतं.
लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडर स्फोट, एकाचा मृत्यू
Latur Cylinder Blast : लातूरमध्ये फुग्यात हवा भरताना सिलेंडर स्फोट झाल्यानं एक जण ठार तर सात मुलं गंभीर जखमी झाली आहेत. लातूरच्या तावरजा कॉलनीत ही दुर्घटना घडलीय. फुगे विक्रेता फुग्यात हवा भरत असताना सिलेंडरला स्फोट झाला. यात फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भयानक होता की जवळच्या गाडीचाही चक्काचूर झाला. सर्व जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
नवी मुंबईत व्यावसायिक इमारतीला भीषण आग
Navi Mumbai Fire : नवी मुंबईत एका व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागलीय. महापे इथं पेट्रोलपंपाशेजारी ही सात मजली इमारत आहे. इमारतीच्या तिस-या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ती चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. या इमारतीमधील काही कार्यालयं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुट्टीचा वार असल्यानं अनेक कार्यालयं बंद आहेत. इथं कुणीही अडकलं नसल्याची माहिती मिळतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'कंत्राटी पोलीस भरती राज्यासाठी घातक', 'असे निर्णय घेणारं सरकार बदलण्याची वेळ', 'या सरकारनं खासगीकरण सुरू केलंय', कंत्राटी भरतीवरून शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका.
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आपल्या पक्षातील काहींनी वेगळा मार्ग स्वीकारला', 'वेगळा मार्ग स्वीकारणाऱ्यांनी वेगळा अध्यक्षही निवडला', 'ही बैठक आत्मविश्वास वाढवणारी', 'संपूर्ण देशात भाजपा सोबत लोक जायला इच्छुक नाहीत'.' देशपातळीवर विचार केला तर बहुतेक राज्यात भाजपा विरोधी सत्ता आहे', 'सत्ता जनतेसाठी वापरायची असते' शरद पवार यांचा भाजपला टोला.
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'भाजपला कुणाचीही गरज वाटत नाही', 'मोदी स्टेडियममध्ये पाक खेळाडूंवर फुलांचा वर्षाव', 'ते आता विरोधकांच्या तोंडावर मास्क लावू लागलेत', 'आता होऊ जाऊ द्या चर्चा कार्यक्रम', 'मोदींनी चर्चेचं नंतर वाटोळं केलं', '2012मध्ये करून दाखवलं शब्दानं आम्हाला जिंकवलं','आताही आम्ही करू दाखवणारच', उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'शिवसेनेत सगळ्यात महत्त्वाचा गटप्रमुख', 'केडर आहे तर डर कशाला?', 'समाजवादीने दिशा दाखवली','लढाई विचारांची असते', 'संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात संघ कुठे होता?','समाजवादी, मुस्लीम माझ्यासोबत','आम्ही प्रवाहाविरोधात उडी मारली','देशावर प्रेम करणारे समाजवादी, मुस्लीम सोबत', 'स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय?','फुलेंच्या प्रयत्नांनी देशाला महिला राष्ट्रपती', उद्धव ठाकरे यांचं विधान.
Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'मला कुटुंबप्रमुख म्हटल्याचा आनंद','माजी लाडके मुख्यमंत्री असं कुणी नाही','मी आहे तसा आहे, स्वीकारा किंवा नाकार','मी मुखवटा घालत नाही, आहे तसाच राहतो','माझ्यासोबत 21 पक्ष','ठाकरे-अत्रे वाद असला तरी अत्रे कायम मोठेच','आपले विचार वेगळे मात्र उद्देश एक आहे', उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.
नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
Chhagan Bhujbal : नाशिकमधीन भुजबळांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय...दोन दिवसांपूर्वी भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आली होती...आज भुजबळांचा वाढदिवस असल्याने अनेक कार्यकर्ते त्यांना भेटायला येत आहेत...त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भुजबळांना भेटायला आलेल्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जातेय.
ते पालकमंत्री 'दादा' कोण?
Sanjay Raut & Nana Patole : मीरा बोरवणकरांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यायत...फडणवीसांसह तपास यंत्रणा आता काय करणार?...फडणवीसांनी कुणासोबत सत्ता स्थापन केलीय याचा विचार करावा असा सवार राऊतांनी केलाय...तर बोरवणकरांनी केलेल्या आरोपात वास्तव आहे असं म्हणत पटोलेंनी निशाणा साधलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ते पालकमंत्री 'दादा' कोण?
Meera Borwankar : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी आपल्या मॅडम कमिश्नर या पुस्तकातून गौप्यस्फोट केलाय...अजित पवारांचं नाव न घेता बोरवणकरांनी गंभीर आरोप केलाय...‘दादा’ म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मात्र मी म्हणाले देणार नाही...असा बोरवणकरांनी गौप्यस्फोट केलाय...हे प्रकरण 2010 सालातील आहे...त्यावेळी अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते...पुण्यातील पोलिसांच्या जागेचा लिलाव पालकमंत्र्यांनी केला...जमीन हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात मला त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं...मात्र, मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला’, असं बोरवणकरांनी पुस्तकात लिहिलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुंबईत काँग्रेसला धक्का बसणार?
Milind Deora : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.. मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मिलिंद देवरा यांच्या यासंदर्भात आतापर्यंत दोन भेटी झाल्याचीही माहिती मिळतेय.. मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी वाढल्यामुळे ते नाराज असल्याचीही चर्चा आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
RTOमुळेच समृद्धी महामार्गावर अपघात?
Vijay Wadettiwar & Sanjay Raut : सरकारच्या घाईमुळे समृद्धी महामार्गावर निष्पापांचा बळी जातोय असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.. जोपर्यंत समृद्धीवरची कामं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत वाहतूक थांबवावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केलीय.. तर समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
समृद्धीवरील अपघाताच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Cm Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची आता चौकशी केली जाणार आहे.. अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी करुन, दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत.. मुख्यमंत्र्यांनी स्वत: या अपघाताची माहिती घेतली.. तसंच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केलीय.. जखमींवर शासकीय खर्चात योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुण्याच्या ससून रुग्णालयाची समितीकडून चौकशी
Pune Sasoon Hospital : पुण्यातल्या ससून रुग्णालयाची सरकारी समितीकडून चौकशी सुरु झालीय.. ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी ही चौकशी सुरु करण्यात आलीय. ससून रुग्णालयाच्या डीनपासून ते शिपाईपर्यंत सर्वांचीच कसून चौकशी करण्यात येतेय.. शुक्रवारी या समितीने डीन, वैद्यकीय अधीक्षक तसंच वॉर्ड क्रमांक 16 मधल्या कर्मचा-यांची चौकशी केली.. तसंच 2022 पासून ससूनमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाची माहितीही समितीने सादर करण्यास सांगितलं आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
नांदेडमधील सावकाराची पोलीस चौकशी होणार
Nanded Women : सावकाराच्या त्रासाला कंटाळून किडनी विकण्याची जाहिरात देणा-या महिलेची बातमी दाखवताच पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय...कर्ज देऊन अधिकचे पैसे उकळणा-या सावकाराची आता पोलीस चौकशी होणाराय...2 लाख रुपयांची परतफेड करूनही सावकाराने पैशांसाठी तगादा लावल्याने महिलेनं कंटाळून किडनी विकण्याची जाहिरात दिली होती...सावकारावर कारवाई करा नाहीतर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी या महिलेनं जिल्हाधिका-यांकडे केली...ही बातमी झी 24 तासवर दाखवताच पोलिसांनी या महिलेला बोलावून चौकशी केली...त्यानंतर पोलिसांनी सावकाराविरोधात तक्रार दाखल करून घेत सावकाराची चौकशी सुरू केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
इस्रायल हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार
Israel-Hamas War Update : इस्रायली लष्कराला मोठं यश मिळालंय. हमास दहशतवाद्यांचं नेतृत्व करणारा एअरफोर्स प्रमुख अली कादी इस्रायलच्या हल्ल्यात ठार झालाय. अली कादीसह एक दहशतवाद्यांचा कमांडरही ठार झाल्याचा दावा इस्रायलनं केलाय. 7 ऑक्टोबरपासून हमासनं सुरू केलेल्या नरसंहाराचं नेतृत्व अली कादी करत होता. इस्रायलनं हमासच्या मुखालयाला लक्ष्य केलं. याच हल्ल्यात दहशतवाद्याचा कमांडर अबु मुराद ठार झालाय. हमासचे दहशतवादी पॅराग्लायडींग करत इस्रायलमध्ये घुसले होते. याच नेतृत्व अबु मुरादनं केलं होतं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुणे रेल्वे स्टेशनवर 90 किलो गांजा जप्त
Pune Ganja Seized : पुणे रेल्वे स्टेशनवर सर्वात मोठी कारवाई करण्यात आलीय... कस्टम विभागाने 90 किलो गांजा जप्त केलाय... ओडिशावरुन पुण्याला येणा-या कोणार्क एक्स्प्रेसमध्ये ही गांजाची तस्करी सुरु होती.. कस्टम विभागाने सापळा रचत 27 लाखांचा गांजा जप्त केला आणि दोन आरोपींना बेड्या ठोकल्या... पुण्यात गेल्या काही काळापासून ड्रग्स तस्करीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय... गेल्या 10 महिन्यांमध्ये पुण्यात 12 कोटी 22 लाख रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलंय...तर या वर्षभरात पुण्यातून 1 हजार 38 किलो गांजा तर 120 किलो अफीम जप्त करण्यात आलंय.. परदेशातून नायजेरिया, घानातून तर देशातून गोवा, राजस्थान, आंध्रप्रदेशमधून पुण्यात ड्रग्सची तस्करी केली जातेय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मुंबईतील वातावरणात प्रदूषणयुक्त धुकं
Mumbai Climate : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात प्रदुषणयुक्त धुकं पसरलंय...सकाळपासून मुंबईसह उपनगर धुक्यात हरवलंय...धुक्यामुळे मुंबईतल्या भल्यामोठ्या इमारती हरवून गेल्यायत...हवेचा वेग कमी असल्याने धुक जास्त दिसत आहे...यामुळे आद्रता आणि उकाडा सुद्धा वाढलाय...या प्रदुषणयुक्त धुक्यामुळे मुंबईकरांचे आजार वाढण्याची शक्यताय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विद्यार्थ्यांसाठी आधारसारखा 'अपार' आयडी
AAPAR ID For Students : शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सर्वात मोठी बातमी... आता शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आधारसारखाच अपार आयडी मिळणार आहे... राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन, वन स्टुडंट आयडी धोरण आखलंय.. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला आधारसारखाच कायमस्वरुपी युनिक क्रमांक मिळणार आहे.. या आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती डिजिटली साठवता येणार आहे.. तसंच त्याच्या शैक्षणिक प्रवासही मॉनिटरिंग करता येणार आहे. पालकांच्या समंतीनेच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरुन अपार आयडी तयार केला जाईल.. विद्यार्थ्यांची ही माहिती मात्र गोपनीय ठेवली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीच्या कामामुळे आधीच शिक्षक तसंच मुख्याध्यापक वैतागलेले आहेत.. तेव्हा अपार आयडी तयार करण्याचं काम दिल्यास शिक्षकांकडून विरोध होण्याची शक्यता दिसतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात
Navratri 2023 : आज घटस्थापना..शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. आजपासून नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात, देवीच्या दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. महाराष्ट्रभरात नवरात्रीचे हे नऊ दिवस उत्साह असतो. देवीची साडेतीन पिठं आता भक्तांनी फुलून जातील.. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी, माहूलची रेणूका आणि वणीची सत्पशृंगी मातेच्या दर्शनाला भाविक गर्दी करु लागलेत. भाविकांची कोणतिही गैरसोय होऊनये यासाठी प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.. या मंदिरांसह राज्यतील आदिशक्तीच्या प्रत्येक मंदिरांत जागर, गोंधळ आणि गरब्याचा उत्सव रंगणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा
मराठा आंदोलकांचा समृद्धी महामार्गावर गोंधळ
Nashik Toll : अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या सभेनंतर मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर गोंधळ घातला.. टोल न भरताच त्यांनी वाहने दामटली.. टोलनाक्यावर बार हाताने बाजुला करुन त्यांनी गाड्या समृद्धी महामार्गावर आणल्या.. कार्यकर्त्यांच्या या गोंधळामुळे समृद्धीच्या टोल वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात शांत राहणे पसंत केले. विशेष म्हणजे औरंगाबाद ते सराटी दरम्यान चालणाऱ्या सर्व वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाचा टोल सुद्धा पूर्णपणे खुला करून देण्यात आला होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
राज्यात सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक
Mahavitran : ऑक्टोबर हीटमुळे घामाच्या धारा निघत असतानाच सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक बसलाय... महावितरणने इंधन समायोजन शुल्क आकारून वीज दरवाढ केलीय... घरगुती ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट 35 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.. तर कृषी जोडणीसाठी प्रति युनिट 10 आणि 15 पैसे तसंच उद्योगांना प्रति युनिट 20 पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरु राहणार आहे.. दारिद्र्य रेषेखालील घरगुती ग्राहकांवरही याचा परिणाम होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 मृत्यू, 20 जखमी
Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय... टेम्पो ट्रॅव्हलर बस रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झालाय.. तर 20 प्रवासी जखमी झाले आहे.. या अपघातामध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीय.. वैजापूरजवळच्या जांबर गाव टोलनाक्यावर पोलिसांनी ट्रकला थांबवून बाजुला घेतलं.. तेव्हाच पाठीमागून भरधाव वेगाने येणारी बस ट्रकली धडकली.. बसमधले सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातल्या पाथर्डी आणि इंदिरानगरचे रहिवासी असल्याची माहिती मिळतेय.. हे प्रवासी सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. जखमींवर वैजापूर तसंच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत..
बातमी पाहा - समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू; सैलानी बाबाच्या दर्शनास गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला
बातमीचा व्हिडीओ पाहा -