Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
विराट-अनुष्काला पुत्ररत्नाचा लाभ
Virat Kohli, Anushka Sharma blessed with baby boy : विराटच्या घरी दुस-यांदा पाळणा हललाय... विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुस-यांदा आई-बाबा बनले आहेत.. अनुष्का शर्माने गोंडस मुलाला जन्म दिलाय.. विराट कोहलीनेच सोशल मीडियावरुन ही गोड बातमी दिलीय.. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही यासंदर्भात गोड बातमी दिली होती. मात्र त्यानंतर त्याने यू-टर्न घेतला होता. .आता मात्र विराटने सोशल मीडियावरुन स्वत:ची याची घोषणा केलीय.. विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाह 2018 मध्ये झाला होता. त्यांना वामिका नावाची मुलगी आहे, जीचा जन्म 2021 मध्ये झालाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
भाजपच्या मंचावर मनसेचे बाळा नांदगावकर
Bala Nandgaonkar : राज्यात भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा पुन्हा सुरु झालीय.. कारण मनसेचे नेते आज थेट भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते... मनसे नेते बाळा नांदगावकर तसंच नितीन सरदेसाई आज धन्यवाद देवेंद्रजी या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते... गृहनिर्माण सोसायटींच्या वर्षानुवर्षांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे सुटल्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. मात्र कालच आशिष शेलार आणि राज ठाकरेंची भेट झाली होती.. त्यानंतर आता मनसे नेते थेट देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत.. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या दिशेने वाटचाल करतायत का याचीच चर्चा आता सुरु झालीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मराठांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू- राज ठाकरे
Raj Thackeray on Maratha Reservation : निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीय. मराठा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद आहे मात्र समाजानं जागरुक रहावं असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार आहेत का? असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर
Maharashtra Assembly Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर... 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अधिवेशन...कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
अॅड. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाला आव्हान देणार
Gunaratna Sadavarte on Maratha Reservation : विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण विधेयकाला अॅड. गुणरत्न सदावर्ते कोर्टात आव्हान देणार आहेत. लवकरच सदावर्तेंच्या बाजूनं कोर्टात याचिका दाखल करण्यात येईल. विधानसभेत मंजूर झालेलं मराठा आरक्षण बेकायदेशीर असल्याची भूमिका सदावर्तेंनी मांडलीय.न्यायमूर्ती शुक्रे यांचा अहवाल सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकषांच्या विरुद्ध आहे असा दावाही सदावर्तेंनी केलाय.. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत..
चंदीगड महापौरप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Chandigarh Mayor Poll : चंदीगड महापौर प्रकरणी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय. महापौरपदी आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांची निवड सुप्रीम कोर्टानं वैध ठरवली आहे. ज्या 8 मतांवरून वाद निर्माण झाला होता ती मतं वैध ठरवावीत असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी स्वतः या 8 मतपत्रिका तपासल्या. त्यानंतर वादग्रस्त निवडणूक अधिकाऱ्यांनं दिलेला निकाल बाद ठरवला. त्यामुळे अखेर चंदीगड महापालिका आपच्या ताब्यात आलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत माहित नाही- शरद पवार
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत माहित नाही...कोल्हापूरच्या जागेबाबत एकटा निर्माण घेऊ शकत नाही.....मराठा आरक्षणाचं कोर्टात काय होईल सांगता येत नाही...आमच्या सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टानं नाकारलं..शरद पवार यांचं वक्तव्य
बातमीचा व्हिडीओ पाहा-
'राज्यात कुणबीकरण सुरू, खोटे सर्टिफिकीट वाटप', छगन भुजबळांचा आरोप
Chhagan Bhujbal Live | Marathi News LIVE Today : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको...कुणबीकरणाला आमचा तीव्र विरोध...राज्यात कुणबीकरण सुरू, खोटे सर्टिफिकीट वाटप... छगन भुजबळ यांचा राज्य सरकारवर आरोप..
छत्रपती शाहू महाराज लोकसभा लढणार?
Sharad Pawar visiting Chhatrapati Shahu Maharaj : शरद पवार छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीसाठी आले आहेत. कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसवर ही भेट होतीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्वपूर्ण मानली जातीय. शरद पवार गटाकडून शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता शरद पवार शाहू महाराजांच्या भेटीसाठी आल्यानं जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10%आरक्षण','दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर', 'मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा','ओबीसी आरक्षणाला धक्का नाही', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मतांसाठी मराठा समाजाला फसवं आरक्षण- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीत मतं घेण्यासाठी सरकारने फसवणूक केलीय असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय...मराठा समाजाच्या हितासाठी हे सरकार नाही...दोन वेळा मराठा आरक्षण टिकलं नाही...आणि आता तिस-या वेळीही कायद्याच्या निकषात टिकणारं हे आरक्षण नाही, असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय...मात्र, कायद्याच्या नियमात राहिल असं हे विधेयक असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर
Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय. या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं आपल्याला समाधान असल्याचं शिंदेंनी म्हंटलंय.
मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम
Manoj Jarange Patil : सरकारनं मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालं असलं तरी मनोज जरांगे मात्र आंदोलनावर ठाम आहेत. या विधेयकानं मराठा समाजाचं कल्याण होणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षणच द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. सगेसोय-यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही आहेत. आपलं आंदोलन सुरूच राहिल अशी घोषणाही त्यांनी केलीय. सरकारचा निषेध म्हणून त्यांनी सलाईनही काढून टाकले. आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी उद्या मराठा बांधवांची अंतरवाली सराटीत बैठकही बोलावलीय.
मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर
Chief Minister Eknath Shinde : मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर झालाय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय. या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं आपल्याला समाधान असल्याचं शिंदेंनी म्हंटलंय.
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं निवेदन
Eknath Shinde LIVE : मराठा आरक्षण विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत मांडलं. मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलाय. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली. तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं आश्वासन शिंदेंनी विधानसभेत दिलं.
मविआचं मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र
MVA Meeting Update : मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीने मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती यांना पत्र लिहिलंय...या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे आरक्षणाबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आलीय...यात मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार?...ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण कसे देणार?...सगेसोयरे अधिसूचना बाबत स्पष्टता द्या अशी मागणी मविआने केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर
J.P.Nadda Visit Mumbai : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उद्या मुंबई दौ-यावर आहेत. मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं उद्या संमेलन असेल. संध्याकाळी 6 वाजता अंधेरीत कार्यकर्त्यांना नड्डा मार्गदर्शन करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची प्रमुख उपस्थिती असेल. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईतील कार्यकर्त्यांना भाजप संबोधित करणार आहे..
सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली - मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : सरकारनं मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. आम्ही वेगळ्या आरक्षणाची मागणी केली नव्हती. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय असं जरांगे म्हणालेत. सग्यासोय-यांच्या कायद्याची अंमलबजावणी करायची नव्हती तर अधिवेशन कशाला बोलावलं असा सवाल उपस्थित केलाय. कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा उद्यापासून पुन्हा आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय.
बातमी पाहा - 'आम्हाला दुसरं ताट का देता? ओबीसीतूनच आरक्षण हवं' मनोज जरांगेंची मागणी
मराठा आरक्षण अहवालाला कॅबिनेटमध्ये मंजुरी
Cabinet Meeting : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्यासंबंधी अहवालाला मंजुरी मिळालीय.. मराठा समाजाला राजकीय आरक्षण नसेल असंही अहवालात नमूद करण्यात आलंय.. मराठा आरक्षण विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मराठा आरक्षण अधिसूचना मसुदा, हरकतींवर बैठकीत चर्चा होतेय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची जागा?
Rohit Pawar : राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता अजित पवारांची जागा शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी घेतल्याची चर्चा आहे.. कारण ठरलंय मंचर-कळंब इथली बॅनरबाजी.. वादा तोच पण दादा नवा अशी टॅगलाईन घेत रोहित पवारांच्या समर्थनार्थ पुणे-नाशिक महामार्गावर बॅनरबाजी करण्यात आलीय. उद्या शरद पवारांची मंचर इथे सभा आहे. या सभेसाठी मी येतोय असा संदेश एकीकडे दिला जातोय तर दुसरीकडे अजित पवारांची जागा रोहित पवारांनी घेतल्याचा संदेशही देण्या आलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल
Dharashiv Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत... बैलांचा छळ आणि चक्काजाम केल्याचा आरोप करीत सांजा आणि येडशी येथील 200 पेक्षा अधिक आंदोलकावर गुन्हे नोंदवण्यात आलेत.. बैलगाड्या आणि ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करुन चक्का जाम करणं.. बैलांना डांबरी रस्त्यावर तीन दिवस उन्हात बांधून ठेवणं.. त्यांना वेदना होतील असा छळ करणं.. असे आरोप या आंदोलकांवर ठेवण्यात आलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुण्यात 100 कोटीहून जास्त किमतीचं ड्रग्ज जप्त
Pune Drugs Seized : पुणे ड्रग्ज प्रकरणी मोठी माहिती उघड झालीये.. पुण्यात जप्त करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्सचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झालंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 52 किलोपेक्षा अधिक मेफेड्रॉन जप्त केलंय.. विश्रांतवाडी भागात छापा टाकून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. धक्कादायक म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकमध्ये पावडर टाकून त्याची विक्री करण्यात येत होती.. हे ड्रग्ज मुंबईला पाठवलं जाणार होतं.. या ड्रग्जची विक्री देशातील विविध भागात तसंच परदेशात होणार होती.. याप्रकरणी सोमवारी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केलीय.वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख अशी या तिघांची नावं आहेत.. हे ड्रग्ज पॉल आणि ब्राऊन या मुंबईतील ड्रग्ज पेडलर्सकडे पाठवलं जाणार होतं..
बातमी पाहा - Pune News : पुणे पोलिसांची धडक कारवाई; 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त
माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर?
Sanjay Nirupam : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. निरुपम अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यात ते आता भाजपत प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. मुंबईत भाजपकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याचा हा प्रयत्न मानला जातोय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विशेष अधिवेशनाकडे ओबीसी महासंघाचं लक्ष - तायवाडे
Nagpur Babanrao Taiwade : मराठा आरक्षणासाठीच्या अधिवेशनाकडे ओबीसी समाजही लक्ष ठेवून आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा ओबीसी महासंघानं दिलाय. तसंच ओबीसी आमदार काय भूमिका घेतात याकडेही लक्ष असल्याचं ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
लोकसभेसाठी महायुतीच्या नव्या फॉर्म्युलाची चर्चा
Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आलीय...महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असून, 32-12-4 असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातंय...भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे...या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
सगे-सोयरे मागणीवर मनोज जरांगे ठाम
Manoj Jarange Patil : आजच्या अधिवेशनातच सगेसोय-यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी...नाहीतर मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही असा इशाराच जरांगेंनी दिलाय...आम्ही मागत असलेलं ओबीसीतूनच आरक्षण द्या...त्यासाठी मराठा आमदार आणि मंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आवाज उठवावा...आणि जो आमदार आवाज उठवणार नाही तो विरोधी समजला जाईल...असं जरांगेंनी म्हटलंय...तर 2 ते 3 जणांचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करू नका...सगे सोयरे विषय अधिवेशनाच्या सुरूवातीच पटलावर घ्या...नाहीतर उद्यापासून शांततेत आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
गायकवाडांच्या केबल ऑफिसची तोडफोड
Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीय.. आमदार गायकवाड गोळीबारप्रकरण ताज असतानाच त्यांच्या भावाच्या ऑफिसची काहींनी तोडफोड केलीय.. कल्याण पूर्वच्या तिसाई परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू अभिमन्यू गायकवाड यांचं केबलचं ऑफिस आहे. या केबल कार्यालयात कार आणि टू व्हीलरवरुन पाच ते सहाजण आले आणि त्यांनी केबल कार्यालयात घुसून कर्मचा-यांना मारहाण केली. कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून किंवा व्यावसायिक वादातून झालाय का याचा तपास सुरु आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन
Vidhimandal Special Session For Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. कारण मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलंय... मात्र या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसतंय.. सामाजिक न्याय विभागाकडे मराठा आरक्षणाबाबत तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सूरू आहे.. लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे आजच्या अधिवेशनात हरकतींवर चर्चा होण्याची शक्यता कमीच दिसतेय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -