Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Mon, 23 Oct 2023-9:09 pm,

महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मविआचं मराठवाड्यात जागावाटपाचं सूत्र ठरलं?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics : मविआचं मराठवाड्यातल्या जागावाटपाचं सूत्र ठरल्याचं कळतंय. ठाकरे गट, शऱद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस मराठवाड्यातल्या आठ लोकसभा निवडणुका लढवणार आहेत. यामध्ये बीड आणि हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गट, नांदेड आणि लातूर काँग्रेस, तर परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जागा ठाकरे गट लढवणार आहे. फक्त जालना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बोलणी सुरू आहे. जालन्याच्या जागेवरून बीडबाबतही बदल होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • जुनी पेन्शन योजना लागू होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Old Pension : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झालेले असताना सरकारने आता नवीन पर्याय शोधल्याचा माहिती सूत्रांनी दिलीय...कर्मचा-याला निवृत्तीवेळीच्या वेतनाच्या 30 ते 35% पेन्शन दरमहा देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे...लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी घोषणेची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय...कर्मचा-यांना सामाजिक सुरक्षितता देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे...असं असलं तरी सध्या वेतनातून होणारी कपात कायम राहणार आहे...त्यामुळे सरकारचा हा निर्णय शासकीय कर्मचा-यांना मान्य होणार का...? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • आमदार अपात्रतेचं नवं वेळापत्रक दसऱ्यानंतर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक दस-यानंतर तयार होणाराय.. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याच आठवड्यात महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफांसोबत चर्चा करणार आहेत. दस-यानंत ते दिल्ली दौ-यावर जाणार आहेत. तिथं ते अॅडव्होकेट जनरल तुषार मेहतांची भेट घेणार आहेत... या दोघा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून सुनावणीचं नवं वेळापत्रक तयार केलं जाणाराय... येत्या ३० ऑक्टोबरला याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणाराय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मोखाड्यात ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Drugs Seized in Mokhada : सोलापूर, नाशिक, संभाजीनगरनंतर आता पालघर जिल्ह्यातही ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. पालघरच्या मोखाडा तालुक्यातील ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारखान्यावर मिरा भाईंदर गुन्हे शाखेनं कारवाई केलीय. कारवाईत कोट्यवधी रुपयांचं साहित्य जप्त केलंय. एका फार्म हाऊसमध्ये हा कारखाना चालू असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला वसईमधून अटक केलीय. मात्र याचे धागेदोरे तपासण्याचे काम सुरूय. या कारवाईबाबत गोपनीयता पाळण्यात आलीय.दरम्यान स्थानिक पोलिसांकडे या धाडीसंदर्भात कुठलीही माहिती नाही.

     

  • पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोला मान्यता

     

    Pune Metro : आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. राज्य सरकारने पिंपरी मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास मंजुरी दिलीय. मेट्रो पिंपरी ऐवजी निगडीपासून असावी अशी आग्रही मागणी होती. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आलीय. त्यामुळे मेट्रोचा निगडी पर्यंतचा प्रवास सुरू होईल. मेट्रो निगडीपर्यंत जाणार असल्यानं शहरातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणारंय. 

  • मराठा आरक्षणासाठी वेळ लागू शकतो - गिरीश महाजन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Girish Mahajan : मराठा आरक्षणासाठी वेळ लागू शकतो असं मोठं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. टिकणारं मराठा आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तेव्हा हातघाईवर येऊ नका असा सबुरीचा सल्ला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटील यांना दिलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारला इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar : तीन पिढ्यांचा पुरावा असल्याशिवाय सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही... सरकारनं धाडस केल्यास न्यायालयीन लढाई लढणार असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आम्ही दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही','फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही','जरांगेच्या मागणीवर शिंदे समिती काम करतेय','ओबीसी समाजामध्ये 350 जाती','चव्हाण मुख्यमंत्री असताना 16 टक्के आरक्षण','52 % आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्याचा प्रयत्न','सगळ्या समाजनं 2 अपत्यांनंतर थांबलं पाहिजे','मराठा आरक्षण कोर्टात टिकलं नाही','गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विधान.

  • ड्रग्जमाफिया ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी 

     

    Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह इतर आरोपींना अटक केल्यानंतर आज पोलीस कोठडी संपली होती. त्यानंतर ललित पाटीलला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलीय.  

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Madha Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माढ्यातल्या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला... एका कार्यकर्त्याने अजित पवारांना काळं कापडही दाखवलं.. तसंच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली... माढातल्या पिंपळनेरमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता.. मात्र मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांच्या या दौ-याला विरोध केला होता.. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसतायत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महिला मतांसाठी 'कमल मित्र'

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BJP Planning For Election : मुंबईतील महिला मतांसाठी भाजपचं कमल मित्र' सरसावलंय...प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपची किमान एक महिला कार्यकर्ती कमल मित्र' म्हणून काम करणार आहे...भाजप मुंबई महिला मोर्चाकडून यासाठी एका महिला प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आलीय...कमल मित्र महिलांपर्यंत केंद्र आणि राज्याच्या योजना पोहचवणार आहेत...महिलांसाठी सरकारने जाहीर केलेल्या योजना, एसटीमध्ये 50 टक्के सवलत, मातृ वंदना, लेक लाडकी योजना अशा विविध योजनांची माहिती महिलांना दिली जाणार आहे...यासाठी भाजपकडून कमल मित्रला विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय...आगामी निवडणुकांत महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्य सरकारच्या जाहिरातीवर संजय राऊतांचा निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut On State Government : राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीवरुन संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलंय. मराठा तरुण आत्महत्या करतोय. मात्र सरकार जाहिरातीत दंग असल्याची टीका राऊतांनी केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्य सरकारची मराठा आरक्षणावर पुन्हा जाहिरात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Government Advertisement : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला मनोज जरांगेंनी दिलेल्या डेडलाईनची मुदत 24 तासांनी संपणार आहे... मात्र त्याआधीच राज्य सरकारने मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध केलीय. मराठा आरक्षणाचं वचन पूर्ण करण्याचं धोरण आखल्याची माहिती या जाहिरातीतून देण्यात आलीय.. मराठा समाजाच्या हक्काचे आणि संविधानाच्या चौकटीत तसंच न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार बांधील असल्याचं आश्वासन या जाहिरातीत दिलंय.. कालही EWS आरक्षणाचा मराठा समाजाला मोठा फायदा झाला अशी जाहिरात राज्य सरकारने दिली होती. मात्र मराठ्यांसाठी जे आरक्षण मागितलंय तेच द्या अशी मागणी मनोजर जरांगे पाटील यांनी केलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबईत 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    October Heat : मुंबईत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसणारेय. हवामान विभागानं असा अंदाज वर्तवलाय. समुद्रावरून येणारे वारे शहरात दुपारनंतर वाहत असल्यामुळे तापमानात वाढ झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिलीय. आज तापमानाचा पारा 37 अंशापर्यंत राहण्याची शक्यताय. त्यानंतर आठवडाभर मुंबईत 35 अंशावर तापमान कायम राहणारेय.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मुंबई लोकलमध्ये महिला सुरक्षा ऐरणीवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Local Women Safety : मुंबई लोकलने प्रवास करणा-या महिलांची सुरक्षा धोक्यात आलीय...लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात एक तरुण नशा करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय...हा तरुण महिलांच्या डब्ब्यात दरवाज्यात उभं राहून नशा करत होता...त्याच्या हातामध्ये रुमाल दिसतोय...अंगाला लावायचा बाम, तसेच व्हाईटनरची बाटली फोडून तो रुमालाने ओढून नशा करतोय...हा सगळा प्रकार सुरू असताना डब्यातील महिला घाबरल्याचं व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय...मात्र, यावेळी डब्यात पोलीस नव्हते का...? हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते समजू शकलेलं नाही...या नशेबाजाला पकडून कठोर कारवाईची मागणी केली जातेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमली पदार्थाविरोधात मुंबई पोलीस आक्रमक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Police : अमली पदार्थ निर्मिती, पुरवठयाचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय. सातत्यानं राज्यभरात अमली पदार्थ सापडल्याची चर्चाही होतेय. मात्र मुंबई पोलिसांनी गेल्या 2 वर्षांत अमली पदार्थाविरोधात मोठ्या कारवाया केल्यायत. मुंबई पोलिसांनी 2 हजार 635 किलो एमडी जप्त केलंय. त्याची किंमत 5 हजार कोटींहूनही अधिक आहे. नाशिक, सोलापूर, नालासोपारा, कोल्हापूरमध्ये एमडी निर्मिती करणारा प्रत्येक एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने अशा एकूण 6 कारखान्यांवर छापे टाकून ते सील करण्यात आलेत. मुंबई पोलिसांनी गेल्या दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी आणि विक्रीबाबत जवळपास पाचशे गुन्ह्यांची नोंद केलीय. त्यात 718 आरोपींना अटकही करण्यात आलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संजय राऊतांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना आज मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेयत...मंत्री दादा भुसेंवर गैरव्यवहाराचे आरोप करणं राऊतांना भोवलंय...दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी जमा केलेल्या शेअर्समध्ये 178 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊतांनी केला होता...यावर भुसेंनी नोटीस पाठवून आरोपाबाबत पुरावे तसेच माफी मागण्यास सांगितलं...मात्र राऊत यांनी कुठलाही खुलासा न केल्याने राऊतांविरोधात खासगी फौजदारी गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेयत...यामुळे राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहणार की वकिलांमार्फत आपलं म्हणणं मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरचा भव्यदिव्य पुतळा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार आहे.. 1 नोव्हेंबरला भव्यदिव्य कार्यक्रमात वानखेडे स्टेडियवर सचिनच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल.. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी 14 फुटांचा ब्राँझपासून बनवलेला सचिनचा हा पुतळा तयार केलाय.. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिनचे आपल्या करिअरमधले अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले. याच स्टेडियमवर सचिन सचिन असा फॅन्सचा जयघोष ऐकायला मिळाला. याच स्टेडियमवर सचिनने त्याच्या करिअरमधला सर्वोच्च क्षण अनुभवला होता.. 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेटर्सनी सचिनला खांद्यावर मिरवत वानखेडेला फेरी मारली होती.. सचिनने आपल्या करिअरची अखेरची मॅचही याच स्टेडियमवर खेळली.. आणि आता लवकरच याच स्टेडियमवर आपल्या लाडक्या सचिनचा पुतळा उभा राहणार आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nana Patole : सरकारने दिलेल्या EWS जाहिरातीवरून नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधलाय...EWS ची जाहीरात म्हणजे सरकारी पैशांची उधळपट्टी आहे...दहा वर्षात भाजप सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत, ते आता काय सोडवणार...जाहिरात देवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का...? असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शरद पवार आणि अजित पवार आज माढ्यात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar Vs Ajit Pawar : दौंडनतर शरद पवार आणि अजित पवारही आज माढ्यात आहेत.. दोघांच्याही कार्यक्रमाची वेळ ही दहाचीच आहे.. तेव्हा अचूक राजकीय टायमिंग कोण साधणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, माळशिरसचे उत्तम जानकर, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासारखे अनेक मातब्बर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेले आहेत. शरद पवार 2009 मध्ये माढा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र आज माढ्यात शरद पवार गटाची अवस्था दयनिय झाल्याचं दिसून येतंय. तेव्हा शरद पवारांनीच पुन्हा माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केलाय.  तेव्हा माढा लोकसभा मतदारसंघावर शरद पवारांनी लक्ष केंद्रीत केलंय. सुप्रिया सुळे तसंच शरद पवारांनीही माढ्यात दौरे वाढवले आहेत.. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कोणता नवा डाव टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link