Jarange insists on hunger strike : मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणावर ठाम

Tue, 24 Oct 2023-11:45 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मुख़्यमंत्री शिंदेंनी शपथ घेतल्यानंतरही जरांगे उपोषणावर ठाम

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jarange insists on hunger strike : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यात शिवरायांची शपथ घेतल्यानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही मराठा समाजासाठी चांगली बाब आहे. मात्र आपण आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

     

  • Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'सत्तेसाठी हिंदूत्वाला तिलांजली''मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंनी संधीसाधूपणाट,'2024ला पुन्हा मोदीच सत्तेत येणार','राज्यातून45+ जागा जिंकून देणार','मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार','इतरांवर अन्याय होऊ देणार नाही', मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शिवरायाची शपथ.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'विमा कंपन्या सरकारला जुमानत नाहीत','1 रुपयात पीकविमा, पण भरपाई नाही मिळाली','पीकविमा कंपन्यांना घेरावा घाला','पाक खेळाडूंना भाजपमध्ये घ्या', उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'हिंमत असले तर पीएम केअर फंडाची चौकशी करा', 'उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर बुडबून दाखवलं','पीएम केअर फंडात घोटाळा','रतन टाटांनी दिलेले पैसे कुठे गेले?','ज्यांच्या घशात धारावी घातली तो कोण?','आता धारावीदेखील गिळायला निघाले','मला माहित नाही मी अडाणी नाही', उद्धव ठाकरे यांचा अदानीवर हल्लाबोल.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'उद्या आपलं सरकार येणार','आपलं सरकार आल्यानंतर उलट टांगू','मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दरात','मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डोळा','मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे करू','सुरत लुटलं म्हणून महाराष्ट्राची लूट','सुरतला पळता यावं म्हणून बुलेट ट्रेन','शिवरायांनी सुरत लुटलं, हे सुरतला पळाले', उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'मोदी घराणेशाहीवर टीका करतात', 'हो, मी घराणेशाहीचा पाईक','मला माझ्या कुटुंबाचा अभिमान','जो कुटुंब मानत नाही त्याला काय कळणार?','माझा महाराष्ट्रचं माझं कुटुंब','कोरोना काळात हे कुटुंब जपलं', उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'हे दोन हाफ कमळा पसंदवाले','जरांगेंचा लढा योग्य पद्धतीनं सुरू','जालन्याचा डायर कोण आहे? चौकशी करा','पोलीस एवढे रानटी कसे होऊ शकतात','मराठा आंदोलकांवर निर्घृण अत्याचार','कोर्टानं अध्यक्षाचे कान फोडले''कोर्टानं कान फोडले तरी निर्लज्जम सदासुखी', उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना टोला.

  • Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'रामाला रावणाचा वध करावा लागला','रावण माजला होता म्हणून त्याचा वध','मशालीनं खोक्याची लंका दहन करणार','सरकारमध्ये कमळा पसंदवाले','शाहरुख, अजय, अक्षय कमला पसंतवाले', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल.

  • Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'शाह अजित पवारांना उलटे लटकवणार होते','घाबरून अनेक घोटाळेबाज भाजपसोबत','अमित शाह म्हणतात उलटे लटकवू','भाजप सरकारकडून महाराष्ट्राची लूट' संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल.

  • Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'अब की बार ठाकरे सरकार','राज्यातच नव्हे, दिल्लीतही ठाकरे सरकार', मुश्रीफांनी आजच कबुली दिली','भाजपच्या दबावामुळे तुरुंगात जाणार होते','एकनाथ शिंदे हा एक मोठा घोटाळा', खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला.

  • Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'जातीला न्याय देण्यासाठी आंदोलन उभं केलं','मराठा आणि धनगरांचं दु:ख एकच','धनगरांची लाट उसळल्यास कुणी रोखणार नाही','प्रत्येक सरकार नवनवीन आश्वासन देतं','सरकारनं अनेक डाव टाकलं आपण डाव उधळले','सरकारला आरक्षण द्यावंच लागेल','धनगरांना पेटून उठावं लागेल','आम्ही धनगरांच्या पाठिशी', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.

  • Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'धनगर बांधवांनी मनावर घेतलं तर आरक्षण मिळालंच समजा', 'सरकार खडबडून जागं व्हायला हवं','आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही', 'धनगरांनी मनावर घेतल्यास आरक्षण मिळणारच','छाताडावर बसणार, पण आरक्षण घेऊनच राहणार', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा.

  • लातूरमध्ये देशमुख कुटुंबाचा ताफा अडवला

     

    Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदींचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याचा फडका लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनाही बसलाय. माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीप देशमुख लातूरच्या रेणा सहकारी कारखान्यावर जाताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा रस्त्यात अडवला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित देशमुखांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता. 

  • Pankaja Munde Live | Marathi News LIVE Today : 'पंकजा मुंडेंची निष्ठा लेचीपेची नाही ','पदं न मिळता निष्ठा काय असते विचारा','माझ्या आयुष्यात नितीमत्ता','जिंकण्यासाठी गहाण ठेवू शकत नाही','आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू','मी कर्जदार तुमची आहे','मी जनतेची कर्जदार, माझ्यावर मालकी जनतेची','दुसऱ्याचं हडपून खाणाऱ्यातलं मी नाही','मी जनतेची ताईसाहेब नाही, मी आई आहे''मुंडेंच स्मारक अजून सरकार बनवू शकलं नाही', पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

  • Pankaja Munde Live | Marathi News LIVE Today : 'हारले तरी मी तुमच्या नजरेतून उतरले नाही','माझा आवाज कुणी दाबू शकणार नाही''राज्यात अनेक गंभीर प्रश्न','मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर','ओबीसी आरक्षणाबाबतही अस्वस्थता','माझ्या मुलाआधी तुमची जबाबदारी','मला तुम्ही प्रेम दिलं'.,'गोरगरिबांना न्याय मिळवून देणारच', पंकजा मुंडे यांचं वक्तव्य.

     

  • Pankaja Munde Live | Marathi News LIVE Today : 'सर्व समाजाकडून माझं स्वागत','पूर्ण देशात आवाज पोहोचला पाहिजे','कारखान्यासाठी 11 कोटी जमवलात','कारखान्यावर छापा पडला तेव्हा तुम्ही पैसे जमा केले','2 दिवसांत कारखान्यासाठी 11 जमवलेत','कातड्याचे जोडे करूनही उपकार फेडणं अशक्य','ऊसतो़ड कामगारांना पैसे वाढवून द्या', पंकजा मुंडे यांची मागणी.

  •  माजी खासदार निलेश राणे राजकारणातून निवृत्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nilesh Rane : माजी खासदार निलेश राणेंनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय.. राजकारणात आता मन रमत नाही असं निलेश राणेंनी X या सोशल मीडियावर जाहीर केलंय.. राजकारणात खूप काही शिकायला मिळालं.. मात्र आता निवडणूक लढवणं वैगरे यात मला रस नाही असं म्हणत निलेश राणेंनी निवृत्तीची घोषणा केलीय.. निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे चिरंजीव तर आमदार नितेश राणे यांचे मोठे भाऊ आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli Accident : दसरा मेळाव्यासाठी मुंबईला येणा-या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला भीषण अपघात झालाय.. या दुर्घटनेत शिंदे गटाचा एक पदाधीकारी जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत..  कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणा-या रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण इथं हा अपघात झाला.. ट्रकनं या पदाधिका-यांच्या गाडीला मागून धडक दिली... या गाडीमध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • निवडणुकीत मतांसाठी भडकावलं जाईल-सरसंघचालक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Mohan Bhagwat : निवडणुकीवेळी समाजात फूट पाडणा-यांपासून दूर राहा असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय...येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतील...त्यावेळी निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मतं मिळवण्याचे प्रयत्न होत असतात...त्यामुळे समाजात फूट पाडणाऱ्यांपासून दूर राहा...असं आवाहन सरसंघचालकांनी जनतेला केलंय... 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्यानं घ्यावा - मनोज जरांगे-पाटील

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन आज संपतेय.. मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी झी २४ तासच्या माध्यमातून राज्य सरकारला केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला पक्के आहेत.. ते मराठा आरक्षण देतीलच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय.. नाहीतर 25 तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मंत्री गिरीश महाजनांनी फोन केल्याची माहितीही जरांगे पाटील यांनी दिलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • दसरा मेळाव्याचा राजकीय आखाडा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dasara Melava : दस-याच्या दिवशी आज राजकीय आखाडा पाहायला मिळणार आहे.. कारण दस-यानिमित्त मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय मेळाव्यांचा झंझावात पाहायला मिळेल.. मुंबईच्या ऐतिहासिक  शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडेल.. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी शिवाजी पार्कवरचे दसरा मेळावा गाजले.. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्याच आझाद मैदानावर होणार आहे.. त्यासोबतच भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होईल. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी हा परंपरा सुरु केली होती. तीच परंपरा पंकजा मुंडे पुढे घेऊन जाताना दिसतायत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. या यात्रेचा शुभारंभ आज पुण्यात होणार आहे. यानिमित्त होणा-या सभेत शरद पवार संबोधित करणार आहेत.. तेव्हा आजच्या या सर्व दस-या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे आणि शरद पवार काय राजकीय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सीएसएमटी-मडगाव वंदे भारत दररोज धावणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai-Goa Vande Bharat Express : कोकणात तसंच गोव्याला जाणा-यांसाठी आनंदाची बातमी.. कारण सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आता दररोज धावणार आहे.. राज्यातून मान्सूनने निरोप घेतल्याची अधिकृत घोषणा झाली. त्यामुळे आता 1 नोव्हेंबरपासून गैर मान्सून वेळापत्रकानुसार वंदे भारत धावेल.. सध्या ही एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावते. मात्र आता ती शुक्रवार वगळता दररोज धावेल. तेव्हा दिवाळी सुट्टी तसंच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.. त्यासोबतच कोकण रेल्वेवर राजधानीसह 88 गाड्यांचा वेगही वाढणार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • डेंग्यूवर मिळालं पहिलं औषध

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dengue Medicine : जगभरात धुमाकूळ घालणा-या डेंग्यू या रोगावर पहिलं औषध मिळालंय.. मानवी चाचणीत हे औषध यशस्वी झाल्याचा दावा जॉन्सन अँड जॉन्सननं केलाय.. 10 लोकांवर या औषधाची चाचणी करण्यात आली.. त्यांना सलग 21 दिवसात 21 गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती तर वाढली, शिवाय विषाणूचे म्युटेशनही रोखण्यात आले... आता या औषधाची दुसरी चाचणी यशस्वी झाल्यास 3 विविध देशांमध्ये हे औषध  उपलब्ध होणार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नाशिकमध्ये ड्रग्ज मोठा साठा जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Drugs Seized : ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी मुंबई पोलीस आणि देवळा पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केलीय...ललित पाटीलचा सहकारी सचिन वाघने नदी पात्रात लपवलेलं ड्रग्ज हस्तगत करण्यात आलंय...ठेंगोडा गावाजवळ गिरणा नदीपात्रातून पोलिसांनी तब्बल 15 किलो ड्रग्ज जप्त केलंय...ललित पाटीलवर कारवाई झाल्यानंतर कारखान्यातील ड्रग्ज लपवून ठेवण्यासाठी सचिन वाघने ड्रग्ज नदीत लपवून ठेवलं...मात्र, त्याची ही युक्ती जास्त काळ टिकू शकली नाही...मुंबई पोलिसांनी वेगानं तपास करून लपवलेलं ड्रग्ज ताब्यात घेतलंय...यासाठी मुंबई पोलिसांनी स्कुबा ड्रायव्हिंगची मदत घेतली...आणि रात्रभर नदीपात्रात शोध घेऊन ड्रग्जचा साठा हस्तगत केलाय..

    बातमी पाहा -  नाशिकमधील गिरणा नदीत सापडले कोट्यवधीचे ड्रग्ज, ललित पाटील प्रकरणात धक्कादायक खुलासा, संशय येऊ नये म्हणून...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link